चिंबल येथील प्रस्तावित 'युनिटी मॉल' प्रकल्पाविरोधात ग्रामस्थांनी पुकारलेल्या उपोषणाने आता राजकीय वळण घेतले आहे. नुकत्याच झालेल्या जिल्हा पंचायत निवडणुकीत चिमबेल मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर विजयी झालेल्या गौरी कामत यांनी या प्रकरणावर आपली पहिली अधिकृत प्रतिक्रिया दिली आहे.
"मी या प्रकरणाचा प्रथम सविस्तर अभ्यास करेन आणि त्यानंतरच भाष्य करेन. मात्र, मी नेहमी बहुमताच्या (Majority) बाजूने उभी राहीन," असे त्यांनी स्पष्ट केले.
श्री संस्थान गोकर्ण पर्तगाळी जीवोत्तम मठाचा ५५० वा ऐतिहासिक वर्धापन सोहळा नुकताच मोठ्या उत्साहात पार पडला. या भव्य सोहळ्यानंतर आता मठाच्या पायाभूत सुविधा आणि सौंदर्यीकरणाची प्रलंबित कामे पूर्ण करण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली आहे. याच पार्श्वभूमीवर, येत्या २ जानेवारी २०२६ पासून मठाचा परिसर भाविक, पर्यटक आणि सर्व अभ्यागतांसाठी तात्पुरत्या स्वरूपात बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
नावेली येथील 'फर्स्ट दांडो' परिसरात राहणारे एक कुटुंब २४ डिसेंबरच्या मध्यरात्री नाताळच्या प्रार्थनेसाठी गेले असताना, तीन संशयित चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. घरातील सदस्य चर्चमधून परतल्यानंतर हा चोरीचा प्रकार उघडकीस आला.
या घरात गेल्या २० वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या तक्रारदाराने पोलिसांत दिलेल्या माहितीनुसार, चोरट्यांनी घराची पूर्णपणे झडती घेऊन मौल्यवान वस्तू चोरल्या आहेत.
नुकत्याच झालेल्या जिल्हा पंचायत निवडणुकीत निर्भेळ यश मिळवल्यानंतर, भाजपने उत्तर गोवा जिल्हा पंचायतीच्या धुरा कोणाकडे सोपवायची, याचा निर्णय घेतला आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी या नावांची अधिकृत घोषणा केली.
प्रमुख नामांकने:
अध्यक्ष: रेश्मा संदीप बांदोडकर
उपाध्यक्ष: नामदेव चारी
उत्तर गोव्यासोबतच दक्षिण गोव्यासाठीही भाजपने नावे निश्चित केली आहेत:
अध्यक्ष: सिद्धार्थ गावस देसाई
उपाध्यक्ष: अंजली वेळीप
चेंज ऑफ झोन या प्रकरणी आम्ही आंदोलनही उभारले होते. आपली पूर्ण मतदार संघात चेंज ऑफ झोनं जमीन बदलण्यास आपला विरोध आहे ज्या पद्धतीने हरमल येथील जागृत पर्यावरण प्रेमींनी मशाल मिरवणूक काढली आपण त्यांच्यासोबत असणार असल्याची ग्वाही आमदार जीत आरोलकर यांनी दिली.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी आमदार ॲग्नेलो फर्नांडिस यांनी आपल्याच पक्षाच्या कार्यपद्धतीवर जोरदार हल्ला चढवला आहे. उत्तर गोवा काँग्रेसचा ब्लॉक सध्या अशा व्यक्तीकडून चालवला जात आहे, जो डान्स बार आणि वेश्याव्यवसायासारख्या अवैध कृत्यांना समर्थन देतो, असा खळबळजनक आरोप त्यांनी केला आहे.
अॅग्नेलो फर्नांडिस यांनी स्पष्टपणे सांगितले की, पक्षाच्या प्रतिमेला तडे देणाऱ्या अशा प्रवृत्तींकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यांनी असा इशारा दिला की, "जर पक्षाने यावर पुरावे मागितले, तर मी ते सादर करण्यास तयार आहे आणि संबंधित व्यक्तीचे नावही जाहीरपणे उघड करेन."
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.