President Bhagirath Shetye Dainik Gomantak
Live Updates

Goa Live Updates: उर्दू प्रश्नपत्रिका घोळ, गोवा बोर्डचीच चूक : अध्यक्ष भगिरथ शेट्ये

Goa Latest News in Marathi: जाणून घ्या गोव्यातील ताज्या घडामोडी

गोमन्तक डिजिटल टीम

उर्दू प्रश्नपत्रिका घोळ, गोवा बोर्डचीच चूक : अध्यक्ष भगिरथ शेट्ये

इयत्ता नववीतील उर्दू विषयाच्या प्रथम सत्र परिक्षेत प्रश्नपत्रिकेसमवेत उत्तरपत्रिका पोहचण्याची चूक ही गोवा बोर्डची आहे. गोवा बोर्ड अध्यक्ष भगिरथ शेट्ये यांच्याकडून चूक मान्य. गोमन्तक टीव्हीने ही बातमी सोशल मिडियाच्या माध्यमातून प्रसारित केली होती.

तिवीकरांचा खासगी विद्यापीठाविरोधात निदर्शने!

खासगी विद्यापीठाच्या प्रकल्पाला तिवीवासीयांसह खरगली ग्रामस्थांचा विरोध. या प्रकल्पामुळे संसाधनांवर, जमिनीच्या अधिकारांवर आणि भावी पिढ्यांवर परिणाम होईल, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

राज्यातील नेत्यांच्या नावाचा गैरवापर करुन गोमंतकीयांची फसवणूक; पोलिस तक्रार दाखल!

नेत्यांच्या नावांचा गैरवापर करुन लोकांना व्हाट्सअॅपद्वारे टार्गेट करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. कृषीमंत्री रवी नाईक, वाहतूकमंत्री मॉविन गुदिन्हो यांच्यानंतर आता अज्ञाताने आमदार जीत आरोलकर आणि निलेश काब्राल यांची नावे वापरुन लोकांची फसवणूक सुरु केल्याचे उघड. पोलिसांत तक्रार दाखल.

धार्मिक तेढ करणाऱ्या व्यक्तीच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या!

बरभाट, शंकरवाडी -ताळगाव येथे पालखी मिरवणूकीवेळी अडवणूक करुन धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेतले.

गोवा बोर्डच्या प्रश्नपत्रिकेत घोळ!

इयत्ता नववीच्या उर्दू विषयाच्या प्रश्नपत्रिकेत घोळ. प्रथम सत्र परिक्षेच्या प्रश्नपत्रिकेसमवेत उत्तरपत्रिका. डिचोलीतील शाळांनी प्रकार उघडकीस. गोवा बोर्डाचा निष्काळजीपणा उघड्यावर.

तळीत बुडून महिलेचा मृत्यू!

बेतोडा पंचायत क्षेत्रातील मनकटेमळ - निरंकाल येथील प्रभा प्रकाश सामंत (६८) या वृद्ध महिलेचा बागायतीतील तळीत बुडून मृत्यू.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Fraud Alert: सावधान! फसवणूक करणाऱ्यांकडून नेत्यांच्या नावांचा गैरवापर; व्हॉट्सॲपला बनवलं हत्यार

55th Iffi Festival In Goa: इफ्फीत ऑस्ट्रेलियाला “कंट्री ऑफ फोकस” नामांकन; सिनेरसिकांना होणार ऑस्ट्रेलियन चित्रपटांच्या जागतिक योगदानाची ओळख!

Goa Crime: स्वतःच्या मुलीसोबत भांडण केल्‍याच्‍या रागातून पालकांची शाळकरी मुलीला मारहाण

Bhutani Project: भूतानी प्रकल्पाचा परवाना रद्द करा, सांकवाळवासीय मागणीवर ठाम; प्रेमानंद नाईकांचे उपोषण सुरुच

Diwali 2024: यंदा दिवाळी कधी? वसुबारस ते भाऊबीज सर्व माहिती जाणून घ्या एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT