Goa Assembly Session Dainik Gomantak
गोवा

Goa Assembly: गोव्याच्या पर्यटन क्षेत्रात वाढ, जून 2025 पर्यंत 54.5 लाख पर्यटकांची नोंद, मंत्री रोहन खंवटेंची माहिती; वाचा दिवसभरातील घडामोडी

Goa Marathi Breaking News Day 7th: जाणून घ्या गोवा पावसाळी अधिवेशनाच्या ताज्या आणि ठळक घडामोडी.

गोमंतक ऑनलाईन टीम

गोव्याच्या पर्यटन क्षेत्रात वाढ, जून 2025 पर्यंत 54. 5 लाख पर्यटकांची नोंद; मंत्री रोहन खंवटेंची माहिती

गोव्याच्या (Goa) पर्यटन क्षेत्रात (Tourism Sector) सकारात्मक वाढ झाल्याचे समोर आले आहे. पर्यटन मंत्री रोहन खंवटे (Rohan Khaunte) यांनी दिलेल्या माहितीनुसार, जानेवारी ते जून 2025 या सहा महिन्यांच्या कालावधीत गोव्यात एकूण 54.5 लाख (5.45 Million) पर्यटकांनी (Tourist Arrivals) भेट दिली. यात 51.8 लाख (5.18 Million) देशांतर्गत (Domestic) पर्यटक आणि 2.7 लाख (0.27 Million) आंतरराष्ट्रीय (International) पर्यटकांचा समावेश आहे.

गोव्यात पर्यटक घटले! सरकारने आत्मचिंतन करावे- विरोधी पक्षनेते युरी आलेमाव

गोव्यात (Goa) पर्यटकांच्या संख्येत घट होत असल्याबद्दल विरोधी पक्षनेते (Leader of Opposition) युरी आलेमाव यांनी चिंता व्यक्त केली आहे. सरकारने यामागची कारणे शोधून आत्मचिंतन (Introspect) करावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.

समुद्रकिनाऱ्यांवरून बेकायदेशीर दलाल आणि मार्गदर्शकांना हटवा

आमदार मायकल लोबो म्हणाले की, समुद्रकिनाऱ्यांवरून बेकायदेशीर दलाल आणि मार्गदर्शकांना हटवावे आणि समुद्रकिनाऱ्यावर काम करणाऱ्या लोकांसाठी ओळखपत्रे अनिवार्य करावीत.

CRZ नियमांनुसार मच्छिमारांसाठी व्यापक योजना 2025 पूर्वी पूर्ण करण्याचे आवाहन

आमदार जित आरोलकर यांनी सरकारला CRZ नियमांनुसार मच्छिमारांसाठी व्यापक योजना १५ ऑगस्ट २०२५ पूर्वी पूर्ण करण्याचे आवाहन केले आहे. या योजनेमुळे मच्छिमारांच्या घरांचे, शेडचे संरक्षण होईल आणि भरती-ओहोटीच्या रेषेपासून १००-२०० मीटर अंतरावर कायदेशीर घरे उपलब्ध होतील.

"गोवा विद्यापीठाच्या प्रकरणावर सभागृह समिती स्थापन करा" युरी आलेमाव

विरोधी पक्षनेते युरी आलेमाव म्हणाले की, गोवा विद्यापीठाच्या पेपरफुटी प्रकरणातील न्यायमूर्ती आर.एम.एस. खांडेपार्कर यांच्या अध्यक्षतेखालील चौकशी समितीचे निष्कर्ष हे सामान्य निरीक्षण नाहीत. ते विद्यापीठाच्या कामकाजाचा आरसा आहेत. सरकारने तातडीने स्वतंत्र नियामक ऑडिट टीम नियुक्त करावी. सभागृह समिती स्थापन करा.

गोवा विद्यापीठ कायद्यात सुधारणा करण्याची गरज आहे

मी जेव्हा गोवा विद्यापीठ कायद्यात बदल सुचवले होते तेव्हा विरोधकांनी त्यांना फक्त विरोध केला होता. आता आम्ही गोव्याचे राज्यपाल असलेल्या नवीन कुलगुरूंशी चर्चा करू आणि आवश्यक सुधारणा करू. शैक्षणिक ऑडिट आणि दीर्घकालीन दृष्टीकोन देखील केला जाईल: मुख्यमंत्री प्रमोद सावंत

वास्कोचे आमदार कृष्णा साळकर यांनी केटीसी बस सेवा चांगली करण्याची मागणी केली

वास्कोचे आमदार कृष्णा साळकर यांनी विशेषतः वास्कोहून सकाळी येणाऱ्या प्रवाशांसाठी केटीसी बस सेवा चांगली करण्याची मागणी केली आहे. साळकर यांनी अधोरेखित केले की केटीसी पर्यटकांना प्राधान्य देत असल्याने विद्यार्थी, शिक्षक आणि कार्यालयात जाणारे सध्या गैरसोयीचे आहेत, ज्यामुळे स्थानिक रहिवाशांना खाजगी बस ऑपरेटरवर अवलंबून राहावे लागत आहे. मंत्र्यांनी चौकशी करण्याचे आणि आवश्यक ती कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.

मंत्री माविनचे 'सांबा', 'कालिया' काय करतात हे त्यांना माहित नाही"

बाहेर जाणार्‍या दारूच्या बाटल्यांवर आता 'होलोग्राम'!

गोव्यातून बाहेर जाणार्‍या दारूच्या बाटल्यांवर लवकरच लावणार 'होलोग्राम'. गोव्यातून 'डुप्लिकेट' दारू बाहेर गेल्याचे प्रकरण आतापर्यंत समोर आलेले नाही : डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री

आलेमाओ यांनी सभागृहाला स्ट्रीट प्रोव्हिडन्सच्या वापर प्रमाणपत्राची माहिती दिली

विरोधी पक्षनेते युरी आलेमाओ यांनी मंगळवारी सभागृहाला माहिती दिली की 'स्ट्रीट प्रोव्हिडन्स' ने महिला आणि बाल विकास संचालनालय आणि अपंग व्यक्तींच्या सक्षमीकरण विभागाला निवारा गृहांसाठी 'उपयोग प्रमाणपत्रे' सादर केली आहेत. त्यांनी संबंधित कागदपत्रे सभागृहात मांडली. सोमवारी त्यांनी 'स्ट्रीट प्रोव्हिडन्स' द्वारे बेघरांसाठी घरे चालवण्याचा आणि त्यांच्या निधीचा मुद्दा उपस्थित केला होता.

टॅक्सी व्यवसाय नींज गोयंकर यांच्या हातात राहिला पाहिजे

आमदार केदार नाईक यांनी कडक शब्दांत सांगितले की, टॅक्सी मालकांना "टॅक्सी माफिया" म्हणणारे कोणीही आम्ही सहन करणार नाही. टॅक्सीचा प्रश्न हा राज्याचा प्रमुख प्रश्न आहे आणि सरकारने टॅक्सी मालकांना आणि किनारपट्टीवरील आमदारांना विश्वासात घेऊन तो लवकरात लवकर सोडवावा. टॅक्सी व्यवसाय नींज गोयंकर यांच्या हातात राहिला पाहिजे कारण ते स्वातंत्र्यापासून पर्यटनाचे खरे ब्रँड अँबेसेडर आहेत.

राज्यात अनेक घर फोड्या करून सोन्याचे दागिने व रोख रक्कम लंपास केलेल्या आरोपीला अटक

राज्यात अनेक घर फोड्या करून सोन्याचे दागिने व रोख रक्कम लंपास केलेल्या गेबी पाऊलू फर्नांडिस (आंबेउदक - सावर्डे ) याला अटक करण्यात फोंडा पोलिसांना यश. राज्यातील अनेक भागात घरफोड्या प्रकरणी त्याच्या विरुद्ध अनेक पोलीस स्थानकात गुन्हे नोंद.

तांत्रिक अडचणीमुळे फ्लाय91 पुणे-गोवा सकाळच्या विमान उड्डाणाला विलंब

फ्लाय९१ च्या पुणे ते गोवा सकाळच्या विमानात धावपट्टीवर पोहोचताच तांत्रिक बिघाड झाला. प्रवाशांना विमानातून खाली उतरवण्यात आले आणि पुन्हा एकदा सुरक्षा तपासणी करण्यास सांगण्यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Theft: रात्री दुकान फोडून घुसले चोरटे, हाती लागली फक्त चिल्लर, कोल्ड्रिंक पिऊन पळाले; पेडण्यात चोरांची झाली फजिती

Goa Tourism: 350 कोटींचे नवे प्रकल्‍प, पर्यटक वाढ; रशियातून विमान; पर्यटनमंत्री खंवटेंनी मांडला लेखाजोखा

Rashi Bhavishya 30 July 2025: प्रवासाची शक्यता,आर्थिक निर्णय विचारपूर्वक घ्या; फसवणुकीपासून सावध राहा

बॅटरीचा राजा येतोय! Redmi 15 5G लाँचिंगसाठी सज्ज, 7000mAh बॅटरी करणार कमाल; जाणून घ्या अफलातून फीचर्स

IND vs ENG: भारतासाठी ओव्हल 'लकी' की 'अनलकी'? कसा आहे टीम इंडियाचा रेकॉर्ड? गिल सेना करणार मोठा चमत्कार

SCROLL FOR NEXT