Yuzvendra Chahal Dainik Gomantak
क्रीडा

IPL 2023: यजुवेंद्र चहलने रचला इतिहास, ब्राव्होला मागे टाकत बनला IPL मधील नंबर 1 गोलंदाज

IPL 2023: आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळणारा फिरकीपटू युजवेंद्र चहलने इतिहास रचला आहे.

Manish Jadhav

IPL 2023: आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळणारा फिरकीपटू युजवेंद्र चहलने इतिहास रचला आहे.

कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध सुरु असलेल्या सामन्यात एक विकेट घेताच चहल आयपीएलमधील नंबर-1 गोलंदाज बनला.

त्याने वेस्ट इंडिजचा अनुभवी गोलंदाज ड्वेन ब्राव्होचा विक्रम मोडला. ज्याने 161 सामन्यात 183 विकेट घेतल्या होत्या. एक विकेट घेताच चहलने 184 विकेट्ससह त्याला मागे टाकले. त्याने 143 सामन्यात या विकेट घेतल्या आहेत.

दरम्यान, आयपीएलच्या (IPL) इतिहासातील सर्वोत्तम गोलंदाजांपैकी एक, फिरकी जादूगार चहलने आयपीएलच्या 56 व्या सामन्यात हा विक्रम केला. चहलने यापूर्वी सवाई मानसिंग स्टेडियमवर सनरायझर्स हैदराबाद (SRH) विरुद्ध ब्राव्होच्या विक्रमाची बरोबरी केली होती.

सध्या सुरु असलेल्या आरआर सामन्यात चहलने केकेआरचा कर्णधार राणाला बाद करुन ब्राव्होचा हा विक्रम मोडला. चहलने 21.59 च्या सरासरीने आणि 7.66 च्या इकॉनॉमीने या विकेट घेतल्या आहेत.

चतुर चहलचा डबल धमाका

या सामन्यात एक विकेट घेऊन यजुवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) आयपीएलच्या इतिहासातील सर्वात जास्त बळी घेणारा गोलंदाज ठरला. त्याचबरोबर त्याने या मोसमात या डावात चार विकेट घेत एकूण 21 बळी घेतले.

विशेष म्हणजे, त्याने पर्पल कॅपही जिंकली. या मोसमात तिसऱ्यांदा एका डावात चार विकेट्सही त्याने घेतल्या. यासह त्याच्या नावावर आता 143 सामन्यात 187 विकेट्स झाल्या आहेत.

आयपीएलमध्ये सर्वाधिक विकेट्स

184 - यजुवेंद्र चहल

183 - ड्वेन ब्राव्हो

174 - पियुष चावला

172 – अमित मिश्रा

171 – रविचंद्रन अश्विन

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT