w t c.jpg
w t c.jpg 
क्रीडा

WTC Final: विराट कोहलीला रिकी पॉटिंगचा विक्रम मोडण्याची संधी

गोमंन्तक वृत्तसेवा

टीम इंडिया (Team India) वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेच्या अंतिम (WTC Final) सज्ज झाली आहे. टीम इंडियाच्या खेळांडूचा बायो बबलमध्ये सराव सुरु आहे. या मेहनतीचं भारतीय संघाला योग्य फळं मिळावं यासाठी क्रिकेट चाहते प्रार्थना करत आहेत. तर दुसरीकडे टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीच्या (virat kohli) शतकाकडे त्याच्या चाहत्यांचे लक्ष लागून आहे. अंतीन सामन्यामध्ये विराटला विक्रम प्रस्थापित करण्याची संधी आहे. न्यूझीलंडविरुध्द (New Zealand) शतकी खेळी केल्यास कर्णधार म्हणून सर्वाधिक शतके ठोकण्याचा विक्रम विराटच्या नावावर नोंदवला जाणार आहे. सध्या हा विक्रम ऑस्ट्रेलियाचा (Australia) माजी कर्णधार रिकी पॉटिंग (Ricky Ponting) आणि विराट कोहलीच्या नावावर बरोबरीने आहे. विराट आणि रिकी पॉटिंग या दोघांच्या नावावर एकूण 41 शतके आहेत. (WTC Final Virat Kohli gets a chance to break Ricky Pottings record)

आतापर्यंत विराट कोहलीने 200 सामन्यामध्ये भारताचं प्रतिनिधित्व केले आहे. या सामन्यात विराटने 62.33 च्या सरासरीने 12 हजार 343 धावा काढल्या आहेत. त्यामध्ये 41 शतके  आणि 54 अर्धशतकांचा समावेश यामध्ये आहे. तर दुसरीकडे ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉटिंगने ऑस्ट्रेलियाचं 324 सामन्यामध्ये नेतृत्व केले आहे. यात त्याने 45.54 च्या सरासरीने 15 हजार 440 धावा काढल्या आहेत. रिकी पॉटिंगच्या नावावर 41 शतके आणि 88 अर्धशतके आहेत.

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरने (Sachin Tendulkar) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके झळकावली आहेत. त्याने एकूण 100 शतके झळकावली आहेत. त्यामध्ये कसोटीमधील 51 आणि एकदिवसीय सामन्यातील 49 शतकांचा समावेश आहे. तसेच रिकी पॉटिंगच्या नावावर एकूण 71  शतके आहेत. तो या क्रमावारीमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर विराटच्या नावार एकूण 70 शतके आहेत. त्यात 27 कसोटी शतके आणि 43 वन डे सामन्यातील शतके आहेत.

बांग्लादेशविरुध्द (Bangladesh) विराटने शेवटचे डे नाईट कसोटी सामन्यात नोव्हेंबर 2019 मध्ये शतक झळकावले होते. कोलकात्यात त्याने 136 धावांची धडाकेबाज खेळी केली होती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bodgeshwar Temple Theft: बोडगेश्वर मंदिरात चोरी करणारी टोळी जेरबंद; चौघांना सावंतवाडीतून अटक

UEN For Goa Students: गोव्यात बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना मिळणार पर्मनंट एज्यूकेशन नंबर, कसा होणार फायदा?

‘या’ देशाच्या माजी मंत्र्याच्या पत्नीची निर्घृण हत्या, खळबळजनक खुलासा; व्हिडिओ पाहून तुम्हालाही बसेल धक्का

Loksabha Election 2024 : एनडीए आघाडीला २०० पार होणेही मुश्कील : डॉ. शशी थरूर

Supreme Court: राष्ट्रीय ग्राहक आयोगाच्या सदस्यांना कोर्टाने फटकारले; आदेशाच्या उल्लंघनबाबत बजावली अवमानाची नोटीस

SCROLL FOR NEXT