Mumbai Indians vs Delhi Capitals Dainik Gomantak
क्रीडा

WPL 2023: आता मिशन फायनल! युपीच्या विजयानं गुजरात-आरसीबी बाहेर, तीन संघात नंबर-1 साठी शर्यत; पाहा समीकरण

वूमन्स प्रीमियर लीगच्या प्लेऑफमधील तीन संघ निश्चित झाले असून त्यांच्या अव्वल स्थान मिळवून फायनल गाठण्यासाठी स्पर्धा असेल.

Pranali Kodre

Women's Premier League 2023 Playoffs Equation: वूमन प्रीमियर लीग 2023 स्पर्धेत सोमवारी युपी वॉरियर्सने गुजरात जायंट्सला 3 विकेट्सने पराभूत केले. त्यामुळे या विजयासह युपी वॉरियर्सने प्लेऑफमध्ये स्थान पक्के केले. त्यामुळे प्लेऑफमध्ये पोहचणारा युपी वॉरियर्स तिसरा संघ ठरला.

यापूर्वी मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्सने प्लेऑफमध्ये प्रवेश मिळवला आहे. पण, यामुळे आता गुजरात जायंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचे आव्हान अधिकृतरित्या संपले आहे. कारण हे दोन्ही संघ 8 गुणांपर्यंत आता पोहचू शकत नाही आणि मुंबई, दिल्ली आणि युपी या तिन्ही संघांनी 8 गुण मिळवलेले असल्याने त्यांचे प्लेऑफमधील स्थान पक्के झाले.

गुजरातचा हा साखळी फेरीतील अखेरचा सामना होता आणि आता ते 8 सामन्यांतील केवळ 2 विजयांसह अखेरच्या स्थानावर राहिले. तसेच बेंगलोर संघाचा एक सामना बाकी असला तरी त्यांचे आत्तापर्यंत 7 सामन्यांत दोन विजय मिळवले असल्याने 4 गुण आहेत. त्यामुळे पुढील सामना जिंकला तरी ते 6 गुणांपर्यंतच पोहचू शकतात.

अव्वल स्थानासाठी शर्यत

आता मुंबई, दिल्ली आणि युपी या तिन्ही संघात अव्वल स्थान मिळून थेट अंतिम सामन्यात पोहचण्यासाठी शर्यत असेल. कारण या स्पर्धेच्या गुणतालिकेत अव्वल क्रमांकावर राहणारा संघ थेट अंतिम सामन्यात प्रवेश करणार आहे. त्यामुळे अव्वल क्रमांक मिळवण्यासाठी आता या तिन्ही संघांमध्ये चूरस असेल.

गुणतालिकेत दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर राहणारे संघ एलिमिनेटरचा सामना खेळतील. या सामन्यात विजय मिळवणारा संघ अंतिम सामना खेळेल.

दरम्यान, 17 सामन्यांनंतर 6 सामन्यात 5 विजय मिळवून 10 गुणांसह मुंबई इंडियन्स अव्वल क्रमांकावर आहेत. तसेच दुसऱ्या क्रमांकावर 6 सामन्यांत 4 विजय मिळवून 8 गुणांसह दिल्ली कॅपिटल्स आहेत. युपी वॉरियर्स 7 सामन्यात 4 विजय मिळवून 8 गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर आहेत.

WPL 2023 Points Table

या स्पर्धेतील 18 वा सामना मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स संघात सोमवारीच खेळवला जात आहे. त्यामुळे या सामन्यात जर मुंबई इंडियन्सने विजय मिळवला, तर ते अव्वल स्थान मिळवण्याबरोबरच अंतिम सामन्यातील स्थानही निश्चित करतील.

पण हा सामना दिल्लीने जिंकला, तर मात्र अव्वल स्थानासाठी चूरस वाढेल. कारण मग या सामन्यानंतर मुंबई, दिल्ली आणि गुजरात या तिन्ही संघांचा प्रत्येकी 1 सामना बाकी राहिल. अशा परिस्थितीत दिल्ली आणि गुजरातला आशा असेल की मुंबई इंडियन्स बेंगलोरबरोबर होणारा त्यांचा अखेरचा साखळी सामना पराभूत होईल.

पण त्याचबरोबर दिल्ली आणि युपी यांच्यात होणाऱ्या अखेरच्या साखळी सामन्यात दिल्ली कॅपिटल्स विजय मिळवून थेट अंतिम सामना गाठण्याचा प्रयत्न करतील. पण युपी देखील विजय मिळवून मग नेट रनरेटवर निकाल नेऊन ठेवू शकतात. त्यामुळे आता अव्वल स्थान मिळवण्याच्या दृष्टीने पुढील उर्वरित तिन्ही साखळी सामने महत्त्वाचे ठरणार आहेत.

या स्पर्धेतील एलिमिनेटरचा सामना 24 मार्चला पार पडणार आहे, तसेच अंतिम सामना 26 मार्चला होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Tenant verification: भाडेकरू, पर्यटक पडताळणी हवीच; दक्षिण गोवा जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश जारी

Goa Politics: 'सभापती सरकारच्या हातचे बाहुले' सरदेसाईंच्या वक्तव्याचा भाजपकडून निषेध; अपुऱ्या माहितीच्या आधारे आरोप करू नयेत, फळदेसाईंचा सल्ला

Beti Ferry Boat: 'बेती' का बुडाली? तपास पुन्हा 'बंदर कप्तान'कडे, प्राथमिक चौकशीत मानवी चुकीने दुर्घटनेचा निष्कर्ष

Comunidade Land: कोमुनिदादच्या जमिनीत हस्तक्षेप नकोच! आसगाव येथे पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत सरकारच्या निर्णयाला कडाडून विरोध

Goa Fake Police: तोतया पोलिसांचा सुळसुळाट; भरदिवसा दोघांचे दागिने हातोहात लंपास, ज्‍येष्‍ठांसह महिला 'टार्गेट'वर

SCROLL FOR NEXT