Mumbai Indians WPL 2023 Dainik Gomantak
क्रीडा

WPL 2023: आजपासून रंगाणार थरार! पहिलाच सामना मुंबई वि. गुजरात; कुठे अन् केव्हा पाहणार स्पर्धा घ्या जाणून

पहिल्या वूमन्स प्रीमियर लीग (WPL) हंगामाला आजपासून सुरुवात होणार आहे.

Pranali Kodre

Women's Premier League 2023: शनिवारपासून (4 मार्च) वूमन्स प्रीमियर लीगच्या (WPL) पहिल्या हंगामाला सुरुवात होत आहे. हा पहिलाच हंगाम असल्याने ऐतिहासिक ठरणार आहे. या हंगामाचा पहिलाच सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध गुजरात जायंट्स संघात डीवाय पाटील स्टेडियमवर संध्याकाळी 7.30 वाजता सुरु होईल. त्याआधी स्पर्धेचा उद्घाटन सोहळा पार पडणार आहे.

डब्ल्यूपीएलच्या पहिल्या हंगामात मुंबई इंडियन्स, दिल्ली कॅपिटल्स, गुजरात जायंट्स, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि युपी वॉरियर्स हे पाच संघ खेळणार आहेत. दरम्यान, फेब्रुवारीमध्ये पार पडलेल्या लिलावातून या पाचही संघांनी त्यांची संघबांधणी पूर्ण केली असून आता हे पाचही संघ पहिल्या डब्ल्यूपीएलच्या हंगामात खेळण्यासाठी सज्ज आहेत.

डब्ल्यूपीएल एकूण 23 दिवस खेळवण्यात येणार असून एकूण 22 सामने होणार आहेत. यातील 20 सामने साखळी फेरीत पार पडतील. तर एक एलिमिनेटर आणि अंतिम सामना असे प्लेऑफचे 2 सामने असतील. हे सर्व सामने मुंबईमधील डीवाय पाटील स्टेडियम आणि ब्रेबॉर्न स्टेडियमवर मिळून पार पडणार आहेत. दोन्ही स्टेडियमवर प्रत्येकी 11 सामने खेळवले जातील.

दरम्यान, या हंगामात 4 डबल हेडर (एका दिवशी दोन सामने) पार पडणार आहेत. डबल हेडर असेल त्या दिवशी पहिला सामना दुपारी 3.30 वाजता सुरू होईल. तसेच दुसरा सामना संध्याकाळी 7.30 वाजता सुरू होईल.

या स्पर्धेत साखळी फेरी 21 मार्च रोजी संपल्यानंतर डीवाय पाटील स्टेडियमवर 24 मार्चला एलिमिनेटरचा सामना होईल, तर ब्रेबॉर्न स्टेडियमवर 26 मार्चला अंतिम सामना होणार आहे.

लाईव्ह स्ट्रिमिंग

या हंगामातील सर्व सामन्यांचे लाईव्ह प्रक्षेपण टेलिव्हिजनवर स्पोर्ट्स 18 नेटवर्कच्या चॅनेलवर पाहाता येईल. तसेच जिओ सिनेमा ऍपवरही या सामन्यांचे लाईव्ह प्रक्षेपण पाहाता येणार आहे.

या स्पर्धेसाठी पाचही संघ -

  • दिल्ली कॅपिटल्स -

जेमिमाह रोड्रिग्, शफाली वर्मा, मॅरिझेन केप, मेग लेनिंग,ऍलिस कॅप्सी,शिखा पांडे, जेस जोनासन, लौरा हॅरिस, राधा यादव, अरुंधती रेड्डी, मिनू मनी,पूनम यादव, स्नेहा दिप्ती, तानिया भाटिया, तितास साधू,जसिया अख्तर, अपर्णा मोंडल, तारा नोरीस.

  • गुजरात जायंट्स -

ऍश्ले गार्डनर, बेथ मुनी, जॉर्जिया वेरहॅम, स्नेह राणा, ऍनाबेल सदरलँड, डिएंड्रा डॉटिन, सोफिया डंकली, सुष्मा वर्मा, तनुजा कन्वर, हर्लिन देओल,ऐश्वनी कुमारी, दयालन हेमलथा, मानसी जोशी, मोनिका पटेल, शब्बीनेनी मेघना, हर्ली गाला, परुनिका सिसोदिया, शबनम शकिल.

  • मुंबई इंडियन्स -

नतालिया स्किव्हर, पुजा वस्त्राकार, हरमनप्रीत कौर, यास्तिका भाटिया, एमेलिया केर, अमरज्योत कौर, हेली मॅथ्यूज, क्लो ट्रायॉन, हिदर ग्रॅहम, इसाबेल वाँग, प्रियंका बाला, धारा गुज्जर,हुमेरा काझी, जिंतीमनी कालिता, निलम बिश्त, सायका इशक, सोनम यादव.

  • रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर -

स्मृती मानधना, ऋचा घोष, एलिसा पेरी, रेणूका सिंग, सोफी डिवाईन, हिदर नाईट, मेगन शट, कनिका अहुजा, डेन वॅन निकर्क, एरिन बर्न्स, प्रीती बोस, कोमल झंझाड, आशा शोभना, दिशा कासट, इंद्रानी रॉय, पुनम खेमनार, सहाना पवार, श्रेयंका पाटील.

  • युपी वॉरियर्स -

दीप्ती शर्मा, सोफी एक्लेस्टोन, देविका वैद्य, ताहलिया मॅग्रा, शबनिम इस्माईल, ग्रेस हॅरिस, एलिसा हेली, अंजली सारवाणी, राजेश्वरी गायकवाड, श्वेता सेहरावत, किरण नवगिरे, लॉरेन बेल, लक्ष्मी यादव, पार्श्वी चोप्रा, एस यशश्री, सिमरन शेख.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Stray Dogs Survey: भटक्या कुत्र्यांना दत्तक घेण्याच्या आवाहनाला प्रतिसाद नाही; आता चावणाऱ्या कुत्र्यांचे सर्वेक्षण

Mapusa RTI Fine: माहिती अधिकारातील टाळाटाळ भोवली; म्हापसा पालिकेच्या अधिकाऱ्याला 'इतक्या' हजारांचा दंड

Diwali Travel 2026: 'Goa Trip' महागणार! दिवाळीत गोव्यातील हॉटेल्सच्या दरांत 42% वाढीचा अंदाज; व्हिलाचे भाडे तब्बल 5.8 लाखांवर

Meta Fine 25 Billion Dollars: डेटा प्रायव्हसी प्रकरणात 'मेटा'ला झटका! कोर्टाने ठोठावला 2.36 लाख कोटींचा दंड; सिलिकॉन व्हॅली हादरली

Salaulim Dam Affected People: 40 वर्षांपासून प्रलंबित साळावली धरणग्रस्तांचा प्रश्न सुटणार? मुख्यमंत्र्यांची ग्वाही

SCROLL FOR NEXT