India vs Australia | WTC Final 2023 Dainik Gomantak
क्रीडा

WTC Final 2023: भारत - ऑस्ट्रेलिया संघात रंगणार फायनल, पण कधी अन् कुठे? घ्या जाणून

India vs Australia: भारत - ऑस्ट्रेलिया संघात टेस्ट चॅम्पियनशीपचा अंतिम सामना रंगणार आहे, या सामन्याबद्दल अपडेट्स जाणून घ्या.

Pranali Kodre

World Test Championship 2023 Final: ख्राईस्टचर्च येथे न्यूझीलंड विरुद्ध श्रीलंका संघात कसोटी मालिकेतील पहिला सामना पार पडला. सोमवारी या सामन्यात अखेरच्या दिवशी न्यूझीलंडने 2 विकेट्सने विजय मिळवला. न्यूझीलंडच्या या विजयाने भारतीय संघाचा आगामी कसोटी चॅम्पियनशीपच्या अंतिम सामन्यातील प्रवेश निश्चित झाला आहे.

मात्र, श्रीलंकेच्या या पराभवामुळे त्यांचे आगामी कसोटी चॅम्पियनशीपच्या अंतिम सामन्यात जाण्याचे स्वप्न भंगले. श्रीलंकेला कसोटी चॅम्पियनशीपच्या अंतिम सामन्यात पोहण्याच्या आशा कायम ठेवण्यासाठी या सामन्यात विजय आवश्यक होता. मात्र आता त्यांचा पराभव झाल्याने आता भारताचे कसोटी चॅम्पियनशीप 2021-23 स्पर्धेच्या गुणतालिकेतील दुसरे स्थान निश्चित झाल्याने भारतीय संघ अंतिम सामन्यात पोहचला.

ऑस्ट्रेलियाने यापूर्वीच भारताविरुद्ध चालू असलेल्या कसोटी मालिकेतील तिसरा सामना जिंकत दुसऱ्या कसोटी चॅम्पियनशीप स्पर्धेच्या गुणतालिकेतील अव्वल स्थान पक्के करताना अंतिम सामन्यात प्रवेश निश्चित केला होता.

त्यामुळे आता कसोटी चॅम्पियनशीप 2021-23 स्पर्धेच्या अंतिम सामन्यामध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया संघ आमने-सामने येणार असल्याचे निश्चित झाले आहे.

कधी आणि कुठे होणार अंतिम सामना

कसोटी चॅम्पियनशीप 2021-23 स्पर्धेचा अंतिम सामना 7 ते 11 जून 2023 दरम्यान इंग्लंडमधील लंडन शहरातील द ओव्हल मैदानावर खेळवण्यात येणार आहे. तसेच 12 जून हा अंतिम सामन्यासाठी राखीव दिवसही असेल, असेही आयसीसीने यापूर्वीच स्पष्ट केले आहे.

दरम्यान कसोटी चॅम्पियनशीप स्पर्धेचे हे दुसरे पर्व आहे. यापूर्वी 2021 मध्ये 18 ते 23 जून दरम्यान पहिल्या पर्वाचा अंतिम सामना पार पडला होता. त्यावेळी न्यूझीलंडने भारताला 8 विकेट्सने पराभूत करत कसोटीतील पहिला विश्वविजेता संघ होण्याचा मान मिळवला होता.

असे होते समीकरण

भारताला कसोटी चॅम्पियनशीप 2021-23 स्पर्धेच्या अंतिम सामन्यामध्ये थेट स्थान मिळवण्यासाठी एकतर ऑस्ट्रेलियाविरुद्ध अहमदाबाद कसोटीत विजय मिळवावा लागणार होता किंवा मग न्यूझीलंड श्रीलंकेविरुद्ध कसोटी मालिकेत किमान एक सामना जिंकेल किंवा अनिर्णित ठेवेल, ही आशा बाळगावी लागणार होती.

या समीकरणाप्रमाणे न्यूझीलंडने श्रीलंकेविरुद्ध कसोटी मालिकेतील पहिल्याच सामन्यात विजय मिळवल्याने श्रीलंका अंतिम सामन्याच्या शर्यतीतून बाहेर झाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Women Reservation Bill 2026: 30 वर्षांची प्रतीक्षा अन् शेवटी निराशाच! लोकसभेत 'महिला आरक्षणा'चं स्वप्न का भंगलं?

Operation Sindoor: घरात घुसून पाकड्यांना ठोकलं! एक वर्षांनंतरही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळात; 'ऑपरेशन सिंदूर'नं मोडलं कंबरडं

Allahabad High Court: "कुटुंबाचा खर्च उचलू शकत नसाल तर लग्नच करु नका!", हायकोर्टाची जळजळीत टिप्पणी; पोटगी नाकारणाऱ्या पतीला मोठा दणका

US Iran War: डोनाल्ड ट्रम्पचा 'डेंजरस' इशारा! इराणचाही चर्चेला नकार आणि युद्धाची ललकारी; घालिबाफ म्हणाले, "धमक्यांनी इराण दबणार नाही!"

SAFF Championship: पाकिस्तानविना गोव्यात रंगणार 'सॅफ फुटबॉल स्पर्धा'; यजमान भारत, गतविजेत्या बांगलादेशसह एकूण सहा महिला संघांत चुरस

SCROLL FOR NEXT