Team India Dainik Gomantak
क्रीडा

World Cup 2023 Schedule: विराटच्या बर्थडेला आफ्रिकेचं आव्हान! 9 शहरात रंगणार भारताचे सामने; पाहा वेळापत्रक

वर्ल्डकप 2023 स्पर्धेत भारताचे साखळी सामने वेगवेगळ्या 9 शहरात खेळवले जाणार आहेत.

Pranali Kodre

World Cup 2023, India Team Schedule: आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) जूनमध्ये वर्ल्डकप 2023 स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. 5 ऑक्टोबरपासून 13 व्या वनडे वर्ल्डकप स्पर्धेला सुरूवात होणार आहे. तसेच 19 नोव्हेंबरला अंतिम सामना खेळवला जाणार आहे.

एकूण 46 दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत 48 सामने खेळवण्यात येणार आहेत. हे सर्व 48 सामने एकूण 10 शहरांमध्ये होणार आहेत. यातील 9 शहरांमध्ये भारताचे 9 साखळी सामने होणार आहेत.

या वर्ल्डकप स्पर्धेत साखळी फेरीमध्ये सर्व सहभागी 10 संघ एकमेकांविरुद्ध सामने खेळणार आहेत. म्हणजेच प्रत्येक संघ एकूण 9 सामने खेळणार आहे. 

त्यानंतर गुणतालिकेतील अव्वल चार संघ उपांत्य फेरीत प्रवेश करतील. त्यानंतर 15 आणि 16 नोव्हेंबर रोजी मुंबई आणि कोलकाता येथे होणाऱ्या उपांत्य सामन्यांमध्ये विजय मिळवणारे संघ 19 नोव्हेंबरला अंतिम सामन्यात खेळतील.

भारताचे सामने

वर्ल्डकप 2019 मधील अंतिम सामन्यात पोहचलेल्या इंग्लंड आणि न्यूझीलंड या संघातील सामन्यानेच अहमदाबादमध्ये नरेंद्र मोदी स्टेडियमवर 5 ऑक्टोबरला 2023 वर्ल्डकपला सुरुवात होणार आहे. त्यानंतर तीन दिवसांनी भारतीय संघ पहिला सामना 8 ऑक्टोबरला चेन्नईमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळेल.

त्यानंतर भारतीय संघ 11 ऑक्टोबर रोजी दिल्लीमध्ये अफगाणिस्तानविरुद्ध खेळेल. तसेच बहुप्रतिक्षित भारत विरुद्ध पाकिस्तान सामना अहमदाबादला 14 ऑक्टोबर रोजी होणार आहे. यानंतर चार दिवसांनी म्हणजेच 19 ऑक्टोबर रोजी भारतीय संघ पुण्यामध्ये बांगलादेशविरुद्ध सामना खेळणार आहे.

तसेच भारताचा न्यूझीलंडविरुद्धचा सामना 22 ऑक्टोबर रोजी धरमशाला येथे खेळवली जाईल. त्यानंतर 29 ऑक्टोबर रोजी इंग्लंड आणि भारताचा सामना लखनऊला होणार आहे, तर 2 नोव्हेंबर रोजी भारतीय संघ श्रीलंका संघाविरुद्ध मुंबईत खेळेल.

5 नोव्हेंबर म्हणजेच विराट कोहलीच्या वाढदिवशी भारताचा दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सामना होणार आहे. हा सामना कोलकातामध्ये होईल, तर भारताचा अखेरचा साखळी सामना 12 नोव्हेंबर रोजी बंगळुरुला नेदरलँड्स संघाविरुद्ध होईल.

भारतीय संघाचे 2023 वर्ल्डकपसाठी वेळापत्रक

  • 8 ऑक्टोबर - भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया, चेन्नई

  • 11 ऑक्टोबर - भारत विरुद्ध अफगाणिस्तान, दिल्ली

  • 15 ऑक्टोबर - भारत विरुद्ध पाकिस्तान, अहमदाबाद

  • 19 ऑक्टोबर - भारत विरुद्ध बांगलादेश, पुणे

  • 22 ऑक्टोबर - भारत विरुद्ध न्यूझीलंड, धरमशाला

  • 29 ऑक्टोबर - भारत विरुद्ध इंग्लंड, लखनऊ

  • 2 नोव्हेंबर - भारत विरुद्ध श्रीलंका, मुंबई

  • 5 नोव्हेंबर - भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका, कोलकाता

  • 11 नोव्हेंबर - भारत विरुद्ध नेदरलँड्स, बंगळुरू

या 10 शहरांमध्ये 48 सामने

वर्ल्डकप 2023 स्पर्धेतील 48 सामने हैदराबाद, अहमदाबाद, धरमशाला, दिल्ली, चेन्नई, लखनऊ, पुणे, बंगळुरू, मुंबई आणि कोलाकाता या 10 शहरात मिळून होणार आहेत.

तसेच गुवाहाटी, तिरुअनंतपुरम आणि हैदराबाद येथे 29 सप्टेंबर ते 3 ऑक्टोबर दरम्यान सराव सामने होतील.

वर्ल्डकप 2023 साठी यजमान भारतासह इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, अफगाणिस्तान, पाकिस्तान, बांगलादेश आणि दक्षिण आफ्रिका हे संघ थेट पात्र ठरले आहेत. तसेच श्रीलंका आणि नेदरलँड्स क्वालिफायर स्पर्धेतून मुख्य स्पर्धेत सहभागी झाले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT