R Ashwin Dainik Gomantak
क्रीडा

World Cup 2023: 'हा माझा शेवटचा वर्ल्ड कप…,' या दिग्गज फिरकीपटूने केली निवृत्तीची घोषणा; चाहतेही अचंबित

World Cup 2023: आयसीसी एकदिवसीय विश्वचषक 2023 5 ऑक्टोबरपासून सुरु होत आहे. याबाबत देशभरात मोठी क्रेझ पाहायला मिळत आहे.

Manish Jadhav

World Cup 2023: आयसीसी एकदिवसीय विश्वचषक 2023 5 ऑक्टोबरपासून सुरु होत आहे. याबाबत देशभरात मोठी क्रेझ पाहायला मिळत आहे. मात्र, या विश्वचषकापूर्वी भारताचा स्टार फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विन चर्चेत आला आहे.

अश्विनची विश्वचषक संघात निवड न होणे हा मोठा प्रश्न होता. अश्विनला संघात संधी मिळावी, अशी मागणी चाहत्यांकडून होत होती. अखेर अक्षर पटेलच्या दुखापतीनंतर रविचंद्रन अश्विनला संधी मिळाली.

या एपिसोडमध्ये रविचंद्रन अश्विनने वर्ल्ड कपपूर्वी एक मोठी घोषणा केली आहे. 2023 चा विश्वचषक हा आपला शेवटचा विश्वचषक असणार असल्याचे त्याने स्पष्ट केले आहे.

टी-20 वर्ल्ड कपमध्ये संधी मिळणार नाही

दरम्यान, अश्विनने विश्वचषकापूर्वी एका मुलाखतीत स्पष्ट केले की, हा त्याचा शेवटचा विश्वचषक असणार आहे. यामुळे अश्विनच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. पुढच्या वर्षी टी-20 विश्वचषक होणार आहे, पण अश्विनने भारतासाठी (India) बराच काळ विश्वचषक खेळलेला नाही.

त्यामुळे त्याला टी-20 विश्वचषकात संधी दिली जाणार नाही, अशी अटकळ बांधली जात आहे. याबाबत अश्विन म्हणाला की, हा विश्वचषक त्याचा शेवटचा विश्वचषक असणार आहे.

आयुष्याने एक विचित्र वळण घेतले - अश्विन

अश्विन पुढे म्हणाला की, माझे आयुष्य आश्चर्यांनी भरलेले आहे. खरं सांगायचं तर आयुष्य या वळणावर येईल असं कधीच वाटलं नव्हतं. आज मी इथे आहे हे परिस्थितीने निश्चित केले आहे. तो पुढे म्हणाला की, संघ व्यवस्थापनाने माझ्यावर विश्वास दाखवला आहे.

या टूर्नामेंटमध्ये दबावाला सामोरे जाणे महत्त्वाचे आहे आणि ही स्पर्धा कशी असेल ते ठरवेल. अश्विन पुढे असेही म्हणाला की, भारतासाठी हा माझा शेवटचा विश्वचषक (World Cup) असू शकतो, त्यामुळे या स्पर्धेचा आनंद घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Donald Trump: ''...तर आज इस्रायलचे अस्तित्वच नसते'' लेबनॉनमधील कारवाईवरुन ट्रम्प यांचे खळबळजनक वक्तव्य; नेतन्याहूंच्या युद्धनीतीवर सवाल

FIFA World Cup 2026: उरुग्वेकडून खेळतोय 'गोव्या'शी नातं असलेला खेळाडू; सौदी अरेबियाविरुद्ध केला निर्णायक गोल, कोण आहे Maximiliano Araujo?

Goa Village News: उसगाव-गांजेतील घरपट्टी शुल्कात होणार कपात; विशेष ग्रामसभेत ठराव संमत, गरिबांना होणार लाभ

Mayem Kayaking Service: मये तलावात 'कायाकिंग' बोटिंग सेवा सुरू

Emergency Health Services: आपत्कालीन आरोग्य सेवा होणार अधिक सक्षम; 24 तास नियंत्रण कक्ष उभारण्याचा प्रस्ताव, 108 सेवेचा सखोल आढावा

SCROLL FOR NEXT