Shaheen Shah Dainik Gomantak
क्रीडा

Pakistan Cricket: पाकिस्तान संघाचा कर्णधार होताच शाहीन आफ्रिदीचा आनंदी आनंद! ट्विट करत सांगितला भविष्यातला प्लॅन

Pakistan T20 Captain Shaheen Shah: आयसीसी क्रिकेट विश्वचषक 2023 मध्ये पाकिस्तानच्या लाजिरवाण्या कामगिरीनंतर संघात अनेक बदल करण्यात आले आहेत.

Manish Jadhav

Pakistan T20 Captain Shaheen Shah: आयसीसी क्रिकेट विश्वचषक 2023 मध्ये पाकिस्तानच्या लाजिरवाण्या कामगिरीनंतर संघात अनेक बदल करण्यात आले आहेत. पाकिस्तानचा नियमित कर्णधार बाबर आझमने विश्वचषकानंतर तिन्ही फॉरमॅटच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला.

बाबर आझमने कर्णधारपदावरुन पायउतार झाल्यानंतर अवघ्या काही तासांतच पाकिस्तान क्रिकेट संघाच्या नवीन कसोटी आणि टी-20 कर्णधाराच्या नावाची घोषणा करण्यात आली. एकीकडे कसोटीत शान मसूदकडे कर्णधारपद सोपवण्यात आले आहे.

त्याचवेळी, वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदी पाकिस्तानच्या टी-20ची जबाबदारी सांभाळणार आहे. कर्णधारपद मिळाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी शाहीन शाह आफ्रिदीने X या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक लांबलचक पोस्ट लिहिली, ज्यामध्ये त्याने स्वतःला भाग्यवान म्हटले आहे.

''आम्ही एक संघ म्हणून पुढे जाऊ''

शाहीन शाह आफ्रिदीने ट्विट करत म्हटले की, “आमच्या राष्ट्रीय T20 क्रिकेट संघाचे नेतृत्व करताना मला छान वाटत आहे. पाकिस्तान (Pakistan) क्रिकेट बोर्ड आणि चाहत्यांनी विश्वास आणि पाठिंबा दिल्याबद्दल त्यांचे आभार.

संघभावना कायम ठेवण्यासाठी आणि क्रिकेटच्या मैदानावर देशाचा गौरव करण्यासाठी मी नेहमीच सर्वतोपरी प्रयत्न करेन. एकता, विश्वास आणि अथक परिश्रम यातच आमच्या संघाचे यश आहे. आम्ही फक्त एक संघ नाही, आम्ही एक कुटुंब आहोत. आम्ही एकत्र पुढे जाऊ.''

बाबरला कसोटी कर्णधारपद कायम ठेवण्याची ऑफर देण्यात आली होती

दुसरीकडे, पाकिस्तानचा माजी कर्णधार मोहम्मद हाफिजला संघ संचालकपदाची नवी जबाबदारी देण्यात आली आहे. याशिवाय, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने पाकिस्तान कोचिंग स्टाफच्या पोर्टफोलिओमध्येही बदल केला आहे.

सर्व प्रशिक्षक राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये काम करत राहतील. पीसीबी लवकरच नव्या प्रशिक्षकाची घोषणा करणार आहे. माजी कर्णधार बाबर आझमला (Babar Azam) कसोटी कर्णधारपद चालू ठेवण्याचा पर्याय देण्यात आला होता, मात्र त्याने तिन्ही फॉरमॅटचा राजीनामा दिला.

यानंतर पीसीबी प्रमुख झका अश्रफ अश्रफ म्हणाले की, "बाबर आझम हा खऱ्या अर्थाने जागतिक दर्जाचा खेळाडू आहे आणि त्याने खेळाडू म्हणून प्रगती करत राहावे अशी आमची इच्छा आहे."

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pilots Dope Test: वैमानिकांची आता वर्षातून एकदा होणार 'डोप टेस्ट'! DGCA लागू करणार नवा नियम; जाणून घ्या काय आहे नवा प्लॅन?

Headland Sada: पोस्ट खात्याची सदनिका बनली शेळ्यांचा निवारा! वर्षानुवर्षे दुर्लक्षामुळे सरकारी इमारत जीर्ण; भंगारवाल्याचाही शिरकाव

Lucky Zodiac Signs 2026: बुधाचे मघा नक्षत्रात गोचर! 'या' लकी राशींवर होणार पैशांचा पाऊस, रक्षाबंधनापर्यंत जॅकपॉट

Colvale Electricity Bills: कोलवाळात वीज बिले दुप्पट-तिप्पट! ग्राहकांना 17 हजारांपर्यंत बिलांचा फटका, फेरपडताळणीची मागणी

Tarun Tejpal Case: तरुण तेजपालला सुप्रीम कोर्टाचा दणका! अधिक वेळ देण्याची याचिका फेटाळली; दोन आठवड्यांत आत्मसमर्पणाचे निर्देश

SCROLL FOR NEXT