India vs Pakistan Dainik Gomantak
क्रीडा

World Cup 2023: भारत - पाकिस्तान हाय व्होल्टेज सामन्याच्या तारखेत बदल! आता 'या' दिवशी रंगणार महामुकाबला?

India vs Pakistan:वर्ल्डकप 2023 स्पर्धेतील भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याच्या तारखेत बदल होणार असल्याची चर्चा आहे.

Pranali Kodre

World Cup 2023 India vs Pakistan match date change: भारतात यावर्षी वर्ल्डकप 2023 ही स्पर्धा खेळवली जाणार आहे. या 13 व्या वनडे वर्ल्डकपचे वेळापत्रक आधीच जाहीर झाले आहे. मात्र, आता या वेळापत्रकात बदल होणार असल्याचे समजत आहे.

5 ऑक्टोबरपासून या वर्ल्डकप स्पर्धेला सुरुवात होणार आहे. या स्पर्धेतील भारत विरुद्ध पाकिस्तान संघातील सामन्याच्या तारखेत बदल करण्यात आला आहे, तसेच पाकिस्तान आणि श्रीलंकेच्या सामन्यातही बदल करण्यात आला असल्याची चर्चा आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार आता भारत आणि पाकिस्तान सामना 15 ऑक्टोबरऐवजी 14 ऑक्टोबरला खेळवण्यात येणार आहे. दरम्यान तारखेत बदल झाला असला तरी ठिकाणात बदल झालेला नाही. त्यामुळे हा हाय व्होल्टेज सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवरच खेळवला जाणार आहे.

तसेच पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यात 12 ऑक्टोबरला होणारा सामना आता 10 ऑक्टोबरला हैदराबादला खेळवला जाणार आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार 15 ऑक्टोबरला नवरात्रीच्या उत्सवाला सुरुवात होणार आहे. त्याचमुळे भारत आणि पाकिस्तान सामन्याची तारीख बदलण्याचा निर्णय घेतला आहे. सुरक्षा एजन्सींनी सण असल्याने बीसीसीआयकडे भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याच्या तारखेत बदल करण्याची विनंती केली होती. कारण नवरात्रीचा पहिलाच दिवस असल्याने तिथेही सुरक्षेची गरज होती.

या विनंतीमुळे आयसीसी आणि बीसीसीआयने पाकिस्तान क्रिकेट बोर्डाशी त्यांच्या संघाच्या दोन सामन्यांच्या तारखांमध्ये बदल करण्याबद्दल चर्चा केली. त्यानंतर पीसीबीने ही विनंती मान्य केली आहे.

दरम्यान, भारताविरुद्धच्या सामन्यापूर्वी पुरेसा वेळ मिळावा म्हणून पाकिस्तान संघाच्या श्रीलंकेविरुद्धच्या सामन्याच्या तारखेतही बदल करण्यात आल्याचे समजत आहे. आता आयसीसी याबद्दल लवकरच घोषणा करण्याची शक्यता आहे.

दरम्यान, केवळ हे दोन सामनेच नाही, तर अन्य काही सामन्यांच्या तारखांमध्येही बदल होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. RevSportz च्या रिपोर्ट्सनुसार न्यूझीलंड विरुद्ध नेदरलँड्स यांच्यातील सामना 9 ऑक्टोबर ऐवजी 12 ऑक्टोबरला होण्याची शक्यता आहे. तसेच न्यूझीलंड आणि बांगलादेश यांच्यातील सामना 14 ऑक्टोबर ऐवजी 15 ऑक्टोबर होण्याची शक्यता आहे.

वर्ल्डकपचा 46 दिवस रंगणार थरार

वर्ल्डकप 2023 स्पर्धा 5 ऑक्टोबर ते 19 नोव्हेंबर दरम्यान एकूण 46 दिवस होणार असून या स्पर्धेत 48 सामने खेळवण्यात येणार आहेत. हे सर्व 48 सामने हैदराबाद, अहमदाबाद, धरमशाला, दिल्ली, चेन्नई, लखनऊ, पुणे, बंगळुरू, मुंबई आणि कोलाकाता या 10 शहरांमध्ये होणार आहेत.

या स्पर्धेत भारतासह इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, अफगाणिस्तान, पाकिस्तान, बांगलादेश, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका आणि नेदरलँड्स हे संघ सहभागी होणार आहेत. या वर्ल्डकप स्पर्धेत साखळी फेरीमध्ये सर्व सहभागी 10 संघ एकमेकांविरुद्ध सामने खेळणार आहेत. म्हणजेच प्रत्येक संघ एकूण 9 सामने खेळणार आहे.

त्यानंतर गुणतालिकेतील अव्वल चार संघ उपांत्य फेरीत प्रवेश करतील. त्यानंतर 15 आणि 16 नोव्हेंबर रोजी मुंबई आणि कोलकाता येथे होणाऱ्या उपांत्य सामन्यांमध्ये विजय मिळवणारे संघ 19 नोव्हेंबरला अंतिम सामन्यात खेळतील.

भारतीय संघाचे 2023 वर्ल्डकपसाठी वेळापत्रक

  • 8 ऑक्टोबर - भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया, चेन्नई

  • 11 ऑक्टोबर - भारत विरुद्ध अफगाणिस्तान, दिल्ली

  • 15 ऑक्टोबर - भारत विरुद्ध पाकिस्तान, अहमदाबाद

  • 19 ऑक्टोबर - भारत विरुद्ध बांगलादेश, पुणे

  • 22 ऑक्टोबर - भारत विरुद्ध न्यूझीलंड, धरमशाला

  • 29 ऑक्टोबर - भारत विरुद्ध इंग्लंड, लखनऊ

  • 2 नोव्हेंबर - भारत विरुद्ध पात्रता फेरीतून आलेला संघ, मुंबई

  • 5 नोव्हेंबर - भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका, कोलकाता

  • 11 नोव्हेंबर - भारत विरुद्ध पात्रता फेरीतून आलेला संघ, बंगळुरू

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

क्रिकेटमध्ये मोठा उलटफेर! सचिन तेंडुलकरचा 'अशक्य' वाटणारा विक्रम मोडला; बॅननंतर परतलेल्या टेलरनं रचला इतिहास

Horoscope: गणेशोत्सवात 'या' 4 राशींचे भाग्य उजळणार! गणपती बाप्पाच्या विशेष कृपेने बुद्धी, करिअर आणि पैशांच्या बाबतीत मिळणार प्रचंड लाभ

Asia Cup Trophies: 'ट्रॉफी चोरा'कडून भारताच्या विजेतेपदाची ट्रॉफी कधी मिळणार? BCCI नं स्पष्टच सांगितलं; आंतरराष्ट्रीय स्तरावर मोहसिन नक्वीची पुन्ही नाचक्की

Viral Post: 1.5 कोटींची नोकरी सोडली; आता महिन्याला फक्त 500 रूपये कमाई; तरीही तरुणी म्हणते, 'हा निर्णय चुकीचा नाही' VIDEO

Lashkar e Taiba Commander Killing: पाकड्यांच्या 'टेरर फॅक्टरी'ला मोठा हादरा! हाफिज सईदचा जवळचा दहशतवादी कराचीत ठार; अज्ञात हल्लेखोरांचा थरारक गोळीबार

SCROLL FOR NEXT