India Women vs Australia Women Dainik Gomantak
क्रीडा

Women's T20 World Cup: भारत-ऑस्ट्रेलिया संघात आज सेमीफायनलचा थरार! कुठे अन् केव्हा पाहाणार मॅच, घ्या जाणून

महिला टी20 वर्ल्डकप स्पर्धेत आज भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात उपांत्य फेरीचा सामना होणार आहे.

Pranali Kodre

India Women vs Australia Women: दक्षिण आफ्रिकेत सुरू असलेली महिला टी20 वर्ल्डकप 2023 स्पर्धा अखेरच्या टप्प्यात आली आहे. महिला टी20 वर्ल्डकपच्या या आठव्या पर्वाचे अंतिम 4 संघ मिळाले आहे. ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, भारत आणि दक्षिण आफ्रिका संघानीं उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. दरम्यान, आज म्हणजेच 23 फेब्रुवारी रोजी भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात या स्पर्धेतील पहिला उपांत्य सामना होणार आहे.

भारत आणि ऑस्ट्रेलिया महिला संघ गेल्या काही वर्षात अनेकदा बाद फेरीत आमने-सामने आले आहेत. दरम्यान, 2020 साली झालेल्या सातव्या महिला टी20 वर्ल्डकपमध्ये या दोन संघातच अंतिम सामना झाला होता. या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने विक्रमी पाचव्यांदा विजेतेपद आपल्या नावावर केले होते.

त्यानंतर आता महिला टी20 वर्ल्डकपमध्ये आता हे दोन संघ उपांत्य सामन्यात आमने-सामने येणार आहेत. दरम्यान, आज होणाऱ्या या सामन्यात जो संघ विजय मिळवेल तो महिला टी20 वर्ल्डकप 2023 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात प्रवेश करणारा पहिला संघ ठरेल. तसेच पराभूत संघाचे आव्हान आज संपुष्टात येईल.

अशी झाली दोन्ही संघांची कामगिरी

महिला टी20 वर्ल्डकप 2023 स्पर्धेत ऑस्ट्रेलियाने ग्रुप ए मधील चारही साखळी फेरीतील सामने जिंकत 8 गुणांसह उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. त्यांनी ग्रुप ए मध्ये अव्वल क्रमांकही मिळवला.

भारतीय संघाने ग्रुप बीमध्ये साखळी फेरी खेळताना 4 पैकी 3 सामने जिंकले. त्यांना इंग्लंडविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला होता. तसेच भारताने साखळी फेरीत पाकिस्तान, वेस्ट इंडिज आणि आयर्लंडला पराभूत केले आहे. त्यामुळे भारताने या ग्रुपमध्ये 6 गुणांसह दुसरा क्रमांक मिळून उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे.

महत्त्वाचे म्हणजे महिला टी20 वर्ल्डकप 2023 स्पर्धेच्या सराव सामन्यात भारत आणि ऑस्ट्रेलिया संघ आमने-सामने आले होते, ज्यात भारताला पराभवाचा सामना करावा लागला होता.

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील उपांत्य सामन्याचा तपशील

1. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील उपांत्य सामना किती तारखेला होणार आहे?

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील उपांत्य सामना 23 फेब्रुवारी 2023 रोजी होणार आहे.

2. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील उपांत्य सामना कोठे खेळवला जाईल?

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील उपांत्य सामना न्यूलँड्स, केपटाऊन येथे खेळवला जाणार आहे.

3. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील उपांत्य सामना किती वाजता खेळवला जाईल?

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील उपांत्य सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी 6.30 वाजता सुरु होईल.

4. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील उपांत्य सामन्याचे थेट प्रक्षेपण कोणत्या चॅनलवर तुम्ही पाहू शकता?

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील उपांत्य सामन्याचे थेट प्रक्षेपण तुम्ही स्टार स्पोर्ट्स चॅनेलवर पाहू शकता.

5. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील उपांत्य सामना कोणत्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर पाहता येईल?

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील उपांत्य सामना तुम्ही 'डिज्नी+हॉटस्टार' ऍपवर पाहू शकता.

यातून निवडली जाईल प्लेइंग इलेव्हन

भारतीय महिला संघ - शफाली वर्मा, स्मृती मानधना, हरमनप्रीत कौर (कर्णधार), ऋचा घोष (यष्टीरक्षक), जेमिमाह रॉड्रिग्ज, दीप्ती शर्मा, पूजा वस्त्राकर, देविका वैद्य, शिखा पांडे, राजेश्वरी गायकवाड, रेणुका ठाकूर सिंग, राधा यादव, हरलीन देवोल, अंजली सरवाणी, यास्तिका भाटिया

ऑस्ट्रेलिया महिला संघ - बेथ मूनी (यष्टीरक्षक), एलिस पेरी, मेग लॅनिंग (कर्णधार), ऍशले गार्डनर, ताहलिया मॅकग्रा, ग्रेस हॅरिस, जॉर्जिया वेअरहॅम, ऍनाबेल सदरलँड, अलाना किंग, मेगन शट, डार्सी ब्राउन, एलिसा हिली (यष्टीरक्षक), हिदर ग्रॅहम, जेस जोनासेन, किम गर्थ

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

GFA Award: गोव्याच्या फुटबॉलमधील दोन दिग्गजांचा गौरव! शिवानंद साळगावकर, मॉरिसियो आफोन्सो यांना जीवनगौरव पुरस्कार

Headland Sada Shed Case: 'मुरगावचा राजा'च्या अनधिकृत शेडवर हायकोर्टचा दणका! बुधवारपर्यंत पाडकाम करा, अन्यथा मुख्याधिकाऱ्यांवर अवमानाची कारवाई

Hospital Staff Shortage: रुग्णसंख्या चौपट वाढली, कर्मचारी मात्र जैसे थे! मडगाव जिल्हा इस्पितळावर दररोज 2 हजार रुग्णांचा भार; 193 पदे रिक्त

Goa Politics: महाआघाडीची खिचडी शिजेना; काँग्रेसच्या नेत्यांची चिंता मिटेना! विरोधकांचे दरवाजे खुले, पण हातमिळवणीला मात्र खिळे

Scam करणाऱ्यांचा प्लॅन होईल फेल! WhatsAppची 'ही' सेटिंग ON करा, संशयास्पद मेसेजपासून आधीच मिळेल सावधानतेचा इशारा

SCROLL FOR NEXT