WPL 2023 Auction Dainik Gomantak
क्रीडा

WPL 2023: आज होणाऱ्या पहिल्या महिला आयपीएलचा लिलाव कुठे अन कधी पाहाणार, घ्या जाणून एका क्लिकवर

Pranali Kodre

WPL 2023: भारतात यावर्षी पहिल्यांदाच महिला आयपीएल म्हणजेच वूमन्स प्रीमियर लीग (WPL) खेळवण्यात येणार आहे. डब्ल्यूपीएलच्या या पहिल्याच हंगामासाठी मुंबईत 13 फेब्रुवारी रोजी खेळाडूंचा लिलाव पार पडणार आहे.

डब्ल्यूपीएलमध्ये 5 संघ सहभागी होणार आहेत. मुंबई, दिल्ली, बेंगळुरू, अहमदाबाद आणि लखनऊ या 5 फ्रँचायझींचे हे संघ आहे. यातील दिल्ली, मुंबई आणि बेंगळुरु हे संघ आयपीएल संघांच्या मालकांनीच विकत घेतले आहेत.

त्यामुळे त्यांची नावेही दिल्ली कॅपिटल्स, मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु अशी आहेत. तसेच अहमदाबाद फ्रँचायझी अदानी ग्रुपने आणि केप्री ग्लोबल होल्डिंग्स प्रायव्हेट लिमिटेडने लखनऊ फ्रँचायझी विकत घेतली आहे. अहमदाबाद फ्रँचायझीचे नाव गुजरात जायंट्स, तर लखनऊ फ्रँचायझीचे नाव युपी वॉरियर्स असे आहे.

कधी आणि कुठे होणार डब्ल्यूपीएल लिलाव?

डब्ल्यूपीएलचा लिलाव 13 फेब्रुवारीला मुंबईतील जियो वर्ल्ड कॉनवेन्शन सेंटर, मुंबई येथे होणार आहे. या लिलावाला भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी 2.30 वाजता सुरुवात होणार आहे. हा लिलाव व्हायकॉम 18 ची मालकी असलेल्या स्पोर्ट्स 18 चॅनलवर लाईव्ह दिसणार आहे. तसेच जियो सिनेमा ऍपवर देखील हा लिलाव लाईव्ह पाहाता येणार आहे.

किती खेळाडूंचा लिलावात समावेश?

डब्ल्यूपीएलच्या लिलावासाठी एकूण 1525 खेळाडूंनी नोंदणी केली होती. पण त्यातील 409 खेळाडूंची लिलावासाठी अंतिम निवड झाली. यामध्ये 246 भारतीय खेळाडूंचा समावेश आहे, तर 163 परदेशी खेळाडूंचा समावेश आहे. त्याचबरोबर 8 सहसदस्य संघातील खेळाडू आहेत.

तसेच 409 खेळाडूंपैकी 202 कॅप खेळाडू म्हणजेच किमान एकतरी आंतरराष्ट्रीय सामना खेळलेले खेळाडू आहेत. याबरोबरच 199 अनकॅप खेळाडू म्हणजेच आंतरराष्ट्रीय स्तरावर एकही सामना न खेळलेल्या खेळाडू आहेत. तसेच 8 सहसदस्य संघातील खेळाडू आहेत.

किती आहे खेळाडूंची मुळ किंमत?

डब्ल्यूपीएल लिलावासाठी नोंदणी करण्यात आलेल्या खेळाडूंसाठी विविध विभागातील मुळ किंमत ठेवण्यात आली आहे. सर्वाधिक मुळ किंमत 50 लाखांची आहे. या विभागात एकूण 24 खेळाडू आहेत.

तसेच त्यापाठोपाठ 40 लाख ही 30 खेळाडूंची मुळ किंमत आहे. तसेच 30 लाख अशीही काही खेळाडूंची मुळ किंमत असून अनकॅप खेळाडूंची मुळ किमत 10 ते 20 लाखांच्यादरम्यान आहे.

या लिलावासाठी प्रत्येक संघाला त्यांच्या संघात घेणाऱ्या खेळाडूंसाठी 12 कोटी रुपये खर्च करण्याची परवानगी आहे. प्रत्येक संघाला आपल्या संघात कमीत कमी 15 आणि जास्तीत जास्त 18 खेळाडूंचा समावेश करता येणार आहे. यामध्ये संघ 7 परदेशी खेळाडूंना सामील करू शकतात.

सर्व संघांमध्ये मिळून एकूण 90 खेळाडूंसाठी जागा असून यात 30 परदेशी खेळाडूंची जागा आहे.

केव्हा खेळवणार डब्ल्यूपीएलचा पहिला हंगाम?

डब्ल्यूपीएलचा पहिला हंगाम 4 ते 26 मार्च दरम्यान ब्रेबॉर्न स्टेडियम आणि डीवाय पाटील स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. या हंगामात एकूण 22 सामने होणार आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Congress: गोवा काँग्रेसच्या प्रभारी सचिवांचा बैठकांचा धडाका; 'त्या' आमदारांना प्रश्न विचारण्याचे आवाहन

Sunburn Festival 2024: त्यांनी कॅप्टनसारखे वागावे, बिनबुडाची विधाने करू नये; ‘सनबर्न’ याचिकेवरुन खंवटेंचे प्रत्त्युत्तर

Goa Live Updates: कुळण-सर्वण येथे विजेच्या धक्क्याने युवकाचा मृत्यू

Bhoma Highway: 'भोम प्रकल्प' गोव्याच्या विकासातील महत्त्वाचा टप्पा! भाजपने मानले गडकरींचे आभार

Goa Traffic Department: सावधान! गोव्यात येताय? आता हेल्मेट नसल्यावर होणार 'ही' कारवाई

SCROLL FOR NEXT