Goa Congress: गोवा काँग्रेसच्या प्रभारी सचिवांचा बैठकांचा धडाका; 'त्या' आमदारांना प्रश्न विचारण्याचे आवाहन

Goa Politics: काँग्रेसच्या प्रभारी सचिव म्हणून जबाबदारी मिळाल्यानंतर माजी आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांनी दोन दिवसांपासून गोव्यात बैठकांचे सत्र सुरू केले आहे. यात अनेकांनी त्यांच्यासमोर गाऱ्हाणी मांडली.
Goa Politics: काँग्रेसच्या प्रभारी सचिव म्हणून जबाबदारी मिळाल्यानंतर माजी आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांनी दोन दिवसांपासून गोव्यात बैठकांचे सत्र सुरू केले आहे. यात अनेकांनी त्यांच्यासमोर गाऱ्हाणी मांडली.
Dr Anjali NimbalkarDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Congress in charge secretary former MLA Dr Anjali Nimbalkar Meetings

पणजी: काँग्रेसच्या प्रभारी सचिव म्हणून जबाबदारी मिळाल्यानंतर माजी आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांनी दोन दिवसांपासून गोव्यात बैठकांचे सत्र सुरू केले आहे. यात अनेकांनी त्यांच्यासमोर गाऱ्हाणी मांडली. मान-सन्मान मिळत नाही, त्याचबरोबर बैठका होत नसल्याबाबतची चिंता त्‍यांनी व्यक्त केली आहे.

डॉ. निंबाळकर यांचा आजचा गोव्यातील दुसरा दिवस. त्यांनी पक्ष कार्यालयात बसून पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची मते जाणून घेतली. या दौऱ्याबाबत त्यांनी ‘गोमन्तक टीव्ही’लाही मुलाखत दिली. त्या मुलाखतीत त्यांनी, पहिलीच भेट असल्याने पक्षाची धोरणे काय आहेत, हे समजून घेण्याचा आपण प्रयत्न करीत आहे. शिवाय ज्यांच्या भेटी झाल्या, ज्यांच्याशी चर्चा झाली, त्यांतील अनेकांनी समस्याच मांडल्या. दोन दिवसांत तीस-पस्तीस लोकांच्या भेटी झाल्याचे त्यांनी सांगितले.

Goa Politics: काँग्रेसच्या प्रभारी सचिव म्हणून जबाबदारी मिळाल्यानंतर माजी आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांनी दोन दिवसांपासून गोव्यात बैठकांचे सत्र सुरू केले आहे. यात अनेकांनी त्यांच्यासमोर गाऱ्हाणी मांडली.
Goa Traffic Department: सावधान! गोव्यात येताय? आता हेल्मेट नसल्यावर होणार 'ही' कारवाई

काँग्रेसमधून निवडून भाजपात गेलेल्या आठ आमदारांना लोक का प्रश्न विचारत नाहीत, असे आपणास वाटते. लोकांना दिलेल्या वचनाला तुम्ही बांधील असता, त्यामुळे लोकांनी त्यांना प्रश्न विचारायला हवेत. अध्यक्ष अमित पाटकर यांचेविरोधात गट कार्यरत आहे, त्यावर तोडगा कसा काढाल, या प्रश्नावर आपण सध्या येथील कार्यपद्धती समजून घेत आहे. अध्यक्षांना बरेवाईट अनुभव येतात. जे काही अंतर्गत वाद आहेत, ते विसरून जावे. माध्यमांसमोर येऊन बोलू नये, असे आवाहनही डॉ. अंजली यांनी केले.

पदाधिकाऱ्यांनी समस्या मनमोकळेपणाने मांडल्या. पक्षाची पुनर्बांधणी करायला हवी. लोकसभा किंवा त्यापूर्वीच्या विधानसभा निवडणुकांमध्‍ये ज्या काही चुका झाल्या, त्या सुधारायला हव्‍यात. काँग्रेस सोडून गेलेल्यांना धडा शिकवायला हवा. लोकांसाठी काम करायचे असेल तर ‘आई’ म्हणजे पक्ष सोडून जाऊ नका.

डॉ. अंजली निंबाळकर, काँग्रेसच्या प्रभारी सचिव

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com