RCB vs UPW Dainik Gomantak
क्रीडा

WPL 2024: शोभना ठरली RCB च्या विजयाची शिल्पकार; यूपी वॉरियर्सचा 2 धावांनी पराभव

Manish Jadhav

WPL 2024: वुमन्स प्रीमियर लीग 2024 मधील दुसरा साखळी सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध यूपी वॉरियर्स यांच्यात खेळला गेला. पहिल्यांदा फलंदाजी करताना सब्भिनेनी मेघना आणि ऋचा घोष यांच्या अर्धशतकांच्या जोरावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने 20 षटकात 6 गडी गमावून 157 धावा केल्या होत्या. या सामन्यात यूपीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. आरसीबीच्या खराब सुरुवातीनंतर, मेघना आणि ऋचा यांनी ज्या प्रकारची खेळी खेळली ती आश्चर्यकारक होती.

दरम्यान, प्रत्युत्तरात 158 धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या यूपी वॉरियर्सची सुरुवात चांगली झाली नाही. संघाने दुसऱ्याच षटकात कर्णधार ॲलिसा हिलीची विकेट गमावली. वृंदा दिनेश 28 चेंडूत 18 धावा करुन बाद झाली.

तालिया मॅकग्राने 18 चेंडूत 22 धावा केल्या. स्वेता सेहरावतने हॅरिससोबत यूपीचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. स्वेताने हॅरिससोबत 77 धावांची शानदार भागीदारी केली. आपल्या खेळीत स्वेताने 25 चेंडूत 31 धावा केल्या तर हॅरिस 23 चेंडूत 38 धावा करुन बाद झाली.

दुसरीकडे, किरणने एक तर पूनमने 14 धावांची खेळी खेळली. दीप्ती 13 धावा करुन नाबाद राहिली. मात्र, या रोमांचकारी सामन्यात आरसीबीने 2 धावांनी विजय नोंदवला. या सामन्याच्या विजयाचे श्रेय आरसीबीच्या फिरकीपटूंना द्यायला हवे. अखेरच्या 3-4 षटकांत फिरकीपटूंनी बिलकुल धावा दिल्या नाहीत. जॉर्जिया वेअरहॅमने 19 वे षटक टाकले आणि शेवटच्या षटकात सोफी मोलिनेक्सने शानदार गोलंदाजी केली.

पाच विकेट घेत इतिहास रचला

दुसरीकडे, शोभना आशा जॉयने या सामन्यात 4 षटके टाकली आणि 22 धावांत पाच बळी घेतले. लीगच्या इतिहासात पाच बळी घेणारी ती पहिली भारतीय गोलंदाज ठरली. किफायतशीर गोलंदाजीसह तिने संघासाठी पाच विकेट्स घेतल्या. एकवेळ अशी आली की, बंगळुरुच्या चाहत्यांनी विजयाची आशा सोडली होती. पण 17व्या षटकात शोभनाने आशा जागवली. तिने सेट खेळाडू श्वेता सेहरावतसोबत ग्रेस हॅरिसची विकेट घेतली. याशिवाय, किरण नवगिरेला बाद करुन तिने आपली पाचवी विकेट घेतली. यानंतर 19व्या षटकात जॉर्जिया वेअरहॅमने धोकादायक दिसत असलेल्या पूनम खेमनारला बोल्ड केले.

ऋचा आणि मेघनाची दमदार खेळी

दरम्यान, या सामन्यात आरसीबीने पहिल्यांदा फलंदाजी केली. मात्र, 13 धावांच्या स्कोअरवर संघाने पहिली विकेट सुफी डिव्हाईनच्या रुपाने गमावली. या सामन्यात डिव्हाईन केवळ एक धावा काढून बाद झाली, तर संघाची कर्णधार स्मृती मानधनाही 11 चेंडूत 13 धावा करुन बाद झाली. तिने आपल्या खेळीत एक षटकार आणि एक चौकार लगावला.

यानंतर एलिस पेरीही 8 धावा करुन पॅव्हेलियनमध्ये परतली. अशाप्रकाररे आरसीबीने 54 धावांत पहिले तीन विकेट गमावल्या होत्या. त्यानंतर मेघना आणि ऋचा यांनी आरसीबीचा डाव सावरला. चौथ्या विकेटसाठी त्यांच्यात 71 धावांची भागीदारी झाली.

मात्र, मेघना 44 चेंडूत 1 षटकार आणि 7 चौकारांच्या मदतीने 53 धावा करुन बाद झाली. ऋचा घोषनेही संघासाठी उत्कृष्ट खेळी खेळली आणि 37 चेंडूत 12 चौकारांच्या मदतीने शानदार 62 धावा केल्या. यूपीकडून राजेश्वरी गायकवाड ही सर्वात यशस्वी गोलंदाज ठरली आणि तिने दोन विकेट्स घेतल्या.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Government Schools: ...गेल्या 5 वर्षांत ट्रेंड बदलला, शासनाचे सरकारी शाळांना प्राधान्य; CM सावंत

Goa Today's News Live: ख्रिस्ती समाजाच्या मोर्चाचा वाहतुकीला फटका; अनेकांची गैरसोय

Saint Francis Xavier: संत फ्रान्सिस झेवियर यांच्या अवशेषांच्या DNA चाचणी मागणीवरून गोव्यात वाद का पेटला?

Goa Crime: लग्नाचे आमिष देवून अत्याचार करणाऱ्या ओडिशातील तरुणाचा कोर्टाने फेटाळला जामीन!

गोव्यात गेल्या दहा वर्षात सर्वाधिक 'वृक्षसंहार', शेतजमिनींचादेखील ऱ्हास; केंद्रीय अहवालातून खुलासा!

SCROLL FOR NEXT