Stadium Dainik Gomantak
क्रीडा

Women Premier League: लखनौ फ्रँचायझीचे नवे नाव आले समोर, लिलावापूर्वी घेतला मोठा निर्णय

महिला प्रीमियर लीग (WPL) यावर्षी भारतात खेळवली जाणार आहे. या नवीन लीगसाठी फ्रँचायझी विकल्या गेल्या आहेत.

Manish Jadhav

Women Premier League: महिला प्रीमियर लीग (WPL) यावर्षी भारतात खेळवली जाणार आहे. या नवीन लीगसाठी फ्रँचायझी विकल्या गेल्या आहेत. लवकरच संपूर्ण जगाला सर्व संघांबद्दल माहिती मिळेल. या लीगचा लिलाव काही दिवसांतच होणार आहे. दरम्यान, संघांची नावेही समोर येऊ लागली आहेत. शुक्रवारी लखनौ संघाचे नावही समोर आले आहे.

लखनौ संघाचे नाव पुढे आले

महिला प्रीमियर लीग (WPL) मध्ये Capri Global Holdings Pvt Ltd च्या मालकीच्या लखनौ फ्रँचायझीचे नाव 'UP वॉरियर्स' असेल. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने पाच संघांसाठी या डब्ल्यूपीएलचा लिलाव केला होता, ज्यामध्ये कॅप्री ग्लोबल होल्डिंग्स प्रायव्हेट लिमिटेडने लखनौ फ्रँचायझी 757 कोटी रुपयांना विकत घेतली होती.

प्रशिक्षकाचींही नियुक्ती करण्यात आली

इंग्लंडचे माजी क्रिकेटपटू जॉन लुईस यांची संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे, तर माजी अर्जुन पुरस्कार विजेती अंजू जैन सहाय्यक प्रशिक्षक असतील.

ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू ऍशले नॉफके हे गोलंदाजी प्रशिक्षक असतील, तर चार वेळा विश्वविजेती ऑस्ट्रेलियाची लिसा स्टालेकर संघाची मार्गदर्शक असेल. इंग्लंडच्या (England) महिला संघाचे सध्याचे मुख्य प्रशिक्षक लुईस हे खूप अनुभवी आहेत, त्यांनी आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत 500 हून अधिक सामन्यांमध्ये 1200 विकेट्स घेतल्या आहेत.

तसेच, WPL 4 ते 26 मार्च दरम्यान मुंबईत (Mumbai) होणार आहे. त्याचे सर्व 22 सामने ब्रेबॉर्न स्टेडियम आणि डीवाय पाटील स्टेडियमवर खेळवले जातील. WPL साठी खेळाडूंचा लिलाव 13 फेब्रुवारीला मुंबईत होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT