Marketa Vondrousova  Dainik Gomantak
क्रीडा

Wimbledon 2023: 24 वर्षीय वोंड्रोसोवा बनली 'विम्बल्डन चॅम्पियन', ट्युनिशियाच्या खेळाडूला हरवून रचला इतिहास

Wimbledon 2023: चेक प्रजासत्ताकच्या मार्केटा वोंड्रोसोवा हिने विम्बल्डन 2023 मध्ये महिला एकेरीचे विजेतेपद पटकावले आहे.

Manish Jadhav

Wimbledon 2023: चेक प्रजासत्ताकच्या मार्केटा वोंड्रोसोवा हिने विम्बल्डन 2023 मध्ये महिला एकेरीचे विजेतेपद पटकावले आहे. शनिवारी (15 जुलै) झालेल्या अंतिम सामन्यात वोंड्रोसोवाने ट्युनिशियाच्या ओन्स जेब्युरचा 6-4, 69-4 असा पराभव केला. वोंड्रोसोवाचे कारकिर्दीतील हे पहिले ग्रँडस्लॅम जेतेपद आहे. दोन्ही प्रतिस्पर्धींमध्ये हा सामना एक तास 20 मिनिटे चालला.

दरम्यान, 24 वर्षीय मार्केटा वोंड्रोसोवा ही विम्बल्डन (Wimbledon) चॅम्पियन बनणारी ओपन एरामधील पहिली महिला खेळाडू आहे. यापूर्वी 1963 मध्ये बिली जीन किंगने अंतिम फेरीत धडक मारली होती, परंतु त्यानंतर तिला ऑस्ट्रेलियन मार्गारेट कोर्टकडून पराभव पत्करावा लागला होता.

दुसरीकडे, ओन्स जेब्युरला अंतिम सामन्यात म्हणावी तशी कामगिरी करता आली नाही. त्याचवेळी, वोंड्रोसोवाने सुरुवातीपासूनच आक्रमक सुरुवात केली. वोंड्रोसोवाने सातपैकी सहा वेळा जेब्युरची सर्व्हिस खंडीत केली. दुसरीकडे, जेब्युरला 10 पैकी केवळ चार वेळा विरोधी खेळाडूची सर्व्हिस खंडित करता आली.

जेब्युरला सलग दुसऱ्या वर्षी विम्बल्डनच्या अंतिम फेरीत पराभव पत्करावा लागला

वोंड्रोसोवाबद्दल सांगायचे झाल्यास, ती दुसऱ्यांदा ग्रँडस्लॅमच्या अंतिम फेरीत पोहोचली होती. याआधी 2019 मध्ये फ्रेंच ओपनच्या अंतिम फेरीत तिला पराभवाचा सामना करावा लागला होता. ऑस्ट्रेलिया आणि यूएस ओपनमध्ये ती केवळ चौथी फेरी गाठू शकली.

दुसरीकडे, ओन्स जेब्युर तिसऱ्यांदा ग्रँडस्लॅमच्या अंतिम फेरीत पोहोचली होती. 2022 मध्ये विम्बल्डन आणि यूएस ओपनच्या फायनलमध्ये तिला पराभवाचा सामना करावा लागला होता. आता पुन्हा एकदा जेब्युरला पराभवाला सामना करावा लागला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

England Cricket Team: इंग्लंड क्रिकेटमध्ये मोठी उलथापालथ! स्टीफन फ्लेमिंग यांची प्रशिक्षकपदी वर्णी, जो रूटवर पुन्हा नेतृत्वाची जबाबदारी

Flight Viral Video: विमानात पॉवर बँकला अचानक आग; प्रवाशांमध्ये एकच गोंधळ, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

WWE News: 'SummerSlam 2026'पूर्वी WWE ला मोठा धक्का! 'मानधन अपेक्षेपेक्षा कमी मिळायचं' म्हणत स्टार रेसलरने ठोकला रामराम

Ramayana Trailer Reaction: 'रामायण: पार्ट 1'च्या ट्रेलरची चर्चा! रणबीरचं तेजस्वी रूप अन् यशचा रौद्र अवतार, चाहते मात्र नाराज; म्हणाले, 'हनुमान कुठे?'

Cutbona Jetty Fishing Season: कुटबण जेटीवर नव्या मासेमारी हंगामाची लगबग; हवामान, मजूर टंचाईची मच्छीमारांनी चिंता व्यक्त केली

SCROLL FOR NEXT