Rajasthan Royals Dainik Gomantak
क्रीडा

IPL 2023: राजस्थान रॉयल्स जयपूर ऐवजी गुवाहाटीमध्ये का खेळतायेत 'होम गेम'? जाणून घ्या कारण

आयपीएल 2023 स्पर्धेत राजस्थान रॉयल्स घरच्या मैदानातील पहिले दोन सामने गुवाहाटीला खेळणार आहेत.

Pranali Kodre

Rajasthan Royals Home Game: इंडियन प्रीमियर लीग 2023 स्पर्धेतील पहिल्या आठवड्यातील सामने सध्या सुरू आहेत. यंदा आयपीएल पुन्हा पूर्वीच्या होम-अवे पद्धतीने होत आहे, म्हणजेच संघ घरच्या आणि प्रतिस्पर्ध्यांच्या मैदानावर सामने खेळताना दिसत आहेत.

मात्र, राजस्थान रॉयल्स संघ त्यांचे घरच्या मैदानातील पहिले दोन सामने गुवाहाटीच्या बरसापारा क्रिकेट स्टेडियमवर खेळणार आहेत, त्यानंतर ते जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर घरच्या मैदानातील उर्वरित 5 सामने खेळणार आहेत.

राजस्थानचा पहिला घरच्या मैदानातील सामना पंजाब किंग्सविरुद्ध होत आहे. हा सामना गुवाहाटीला सुरु आहे. तसेच त्यांचा गुवाहाटीला दुसरा सामना दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध 8 एप्रिल रोजी होणार आहे.

राजस्थान रॉयल्स संघ ईशान्य भारतीय राज्यात क्रिकेटला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करत आहे. त्याचमुळे त्यांनी गुवाहाटीला त्यांचे दुसरे घरचे मैदान म्हणून निवडले आहे. तसेच राजस्थान रॉयल्सची आसाम क्रिकेट असोसिएशनशी धोरणात्मक भागीदारी देखील आहे. बरसापारा स्टेडियमवर सध्या राजस्थानची क्रिकेट अकादमी सुरू आहे.

लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी की साल 2020 मध्ये बरसापारा स्टेडियमवर आयपीएलचे सामने होणार होते. पण कोरोनामुळे आयपीएल 2020 चा हंगाम युएईला हलवण्यात आला होता. पण आता आयपीएल पुन्हा पूर्वीच्या पद्धतीने होत असल्याने राजस्थान रॉयल्सने 2020 मध्ये ईशान्य भारतीय राज्यात क्रिकेटला प्रोत्साहन देण्यासाठी गुवाहाटीला सामने खेळण्याचे दिलेले वचन आता पूर्ण केले आहे.

दरम्यान, राजस्थानने आयपीएल 2023 मधील पहिला सामना जिंकला आहे. त्यांचा पहिला सामना सनराझर्स हैदराबाद संघाविरुद्ध झाला होता. हा सामना हैदराबादच्या घरच्या मैदानावर राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर झाला होता. हा सामना राजस्थान रॉयल्सने ७२ धावांनी जिंकला होता.

या सामन्यात राजस्थानने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 5 बाद 203 धावा केल्या होत्या आणि हैदराबादसमोर 204 धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना हैदराबादला 20 षटकात 8 बाद 131 धावाच करता आल्या होत्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Grah Gochar 2026: 1 सप्टेंबरला बनणार 6 शक्तिशाली राजयोग! 'या' राशींची तिजोरी पैशांनी भरणार; होणार अफाट धन वर्षाव

Weather Update: ऑगस्टमध्ये समाधानकारक पाऊस, सर्वाधिक वाळपईत; जुलैमधील पावसाचा तुटवडा मात्र कायम

Marcel Road Issue: माशेलात 'वर्दळीचा' रस्ता धोकादायक, खड्ड्यांमुळे वाहतुकीला अडथळा; पावसात दुचाकीस्वारांसमोर मोठे संकट

Panaji: थकीत घरपट्टीचा फटका भाडेकरूंना; उत्पन्नाचा दाखला मिळविताना भाडेकरूंच्या मुलांची मोठी कसरत

Police Attack Viral Video: पीएसआयचा गळा आवळला, लोखंडी साखळीने हल्ला... लखनऊमध्ये अतिक्रमण हटवताना राडा; दोन महिलांसह 6 जणांना बेड्या

SCROLL FOR NEXT