Overthrow Boundary | Ben Stokes X/ICC
क्रीडा

IND vs ENG: इंग्लंडला 6 ऐवजी का मिळाल्या 5 धावा? काय आहे ओव्हरथ्रोवर चौकार गेल्यानंतरचा नियम, घ्या जाणून

Overthrow Boundaries Rule: भारताकडून ओव्हरथ्रो झाल्यानंतर बॉल बाउंड्री पार गेला होता. त्यानंतर इंग्लंडला 5 धावा देण्यात आल्या. हा नियम नक्की काय आहे, जाणून घ्या

Pranali Kodre

Why England given 5 instead of 6 runs on Overthrow Boundary against India:

भारत विरुद्ध इंग्लंड संघात सध्या पाच सामन्यांची कसोटी मालिका सुरु झाली असून पहिला सामना हैदराबादमधील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्याला गुरुवारपासून (25 जानेवारी) सुरुवात झाली. दरम्यान, या सामन्याच्या पहिल्याच दिवशी एक अनोखी घटना या सामन्यात घडली.

झाले असे की 47 व्या षटकात जसप्रीत बुमराह गोलंदाजी करत होता. त्याने या षटकातील शेवटचा चेंडू फलंदाजी करणाऱ्या रेहान अहमद विरुद्ध फुलटॉस टाकला. ज्यावर रेहानने ऑन-साईडला स्क्वेअरच्या मागे चेंडू फटकावला.

त्यानंतर रेहान आणि इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स धाव घेण्यासाठी धावले. त्याचवेळी भारतीय क्षेत्ररक्षकाने चेंडू आडवून तो नॉन स्ट्रायकर एन्डला फेकला, मात्र तो चेंडू तिथे उभ्या असलेल्या क्षेत्ररक्षकाला हुलावणी देत थेट सीमापार गेला.

त्यावेळी स्टोक्स आणि रेहान हे दोन धावा धावले होते. त्यामुळे आधी त्यांना ६ धावा देण्यात आल्या, परंतु लगेचच पंचांनी हा निर्णय बदलला आणि पाच धावा दिल्या. यामागे एक क्रिकेटचा नियम आहे. त्याचबद्दल जाणून घेऊ.

खरंतर 2019 वनडे वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यानंतर या नियमाकडे गंभीरतेने पाहिले गेले. त्यावेळीही अशीच परिस्थितीत उद्भवली होती. त्यावेळी ओव्हरथ्रो झालेला चेंडू सीमापार गेल्यानंतर इंग्लंडला 6 धावा दिल्या होत्या.

महत्त्वाचे म्हणजे त्यावेळी क्षेत्ररक्षक थ्रो करत असताना फलंदाजांनी एकमेकांना ओलांडले (Cross) केले नव्हते. तरी त्यावेळी इंग्लंडला 6 धावा देण्यात आल्या होत्या.

नक्की काय आहे तो नियम?

क्रिकेटचे नियम बनवणारी संस्था मेरिलबन क्रिकेट क्लबने ओव्हरथ्रोवेळी चेंडू सीमापार गेला, तर धावा कशा मोजल्या जाव्यात याबाबतही आपल्या नियमावलीत माहिती दिली आहे. नियम क्रमांक 19.8 मध्ये याबाबत सांगण्यात आले आहे.

हा नियम ओव्हरथ्रो आणि क्षेत्ररक्षकाकडून जाणूनबुजून केलेल्या कृतीमुळे जर चेंडू सीमापार गेला तर धावा मोजण्याबद्दल आहे.

या नियमानुसार जर ओव्हरथ्रो किंवा क्षेत्ररक्षकाच्या जाणून बुजून केलेल्या कृतीमुळे चेंडू सीमापार गेला, तर फलंदाजी करणाऱ्या संघाच्या खात्यात जोडले जातात. तसेच अशावेळी बाऊंड्रीच्या धावा आणि फलंदाजांनी पळून काढलेल्या धावा मिळून फलंदाजी करणाऱ्या संघाच्या खात्यात जोडल्या जातात.

मात्र यावेळी एक गोष्ट लक्षात घ्यावी लागते की क्षेत्ररक्षकाच्या थ्रोवेळी किंवा क्षेत्ररक्षकाच्या जाणून बुजून केलेल्या कृतीवेळी जर खेळपट्टीवरील फलंदाजांनी एकमेकांना ओलांडले असेल, तरच धावा ग्राह्य धरल्या जातात. जर थ्रोवेळी किंवा क्षेत्ररक्षकाच्या कृतीवेळी जर फलंदाजांनी एकमेकांना ओलांडले नसेल, तर ती धाव ग्राह्य धरली जात नाही.

याच नियमामुळे इंग्लंडला भारताविरुद्धच्या कसोटी सामन्यात 6 ऐवजी 5 धावाच देण्यात आल्या. कारण भारतीय क्षेत्ररक्षकाने थ्रो करण्यापूर्वी रेहान आणि स्टोक्स यांनी पहिली धाव पूर्ण केली होती.

मात्र क्षेत्ररक्षकाने थ्रो केल्यानंतर त्यांनी दुसरी धाव केली, त्याचमुळे ओव्हरथ्रोच्या धावा देताना त्यांनी पळून काढलेली एक धाव आणि चेंडू सीमापार गेल्याने त्याचा चार धावा अशा मिळून 5 धावा संघाच्या खात्यात जोडण्यात आल्या.

Overthrow Boundary Rule

भारतीय संघाची पहिल्या दिवशी चांगली कामगिरी

हैदराबाद कसोटीत इंग्लंडला भारतीय संघाने पहिल्याच दिवशी पहिल्या डावात 64.3 षटकात 246 धावांवर सर्वबाद केले. त्यानंतर भारताने पहिल्या डावात पहिल्या दिवसाखेर 23 षटकात 1 बाद 119 धावा केल्या आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

India Bike Week 2024: चित्तथरारक स्टंट, म्युझिक आणि बरंच काही...; गोव्यातील बाईक इव्हेंटच्या Date, Venue जाणून घ्या

Tribute to the Legends मिरामार किनारी सुदर्शन पटनाईक यांनी साकारले सिने जगतातील दिग्गजांचे Sand Art, पाहा फोटो

SCROLL FOR NEXT