Brendon McCullum|Gautam Gambhir|Kolkata Knight Riders 
क्रीडा

Viral Video: गौतम गंभीरने पूर्ण संघासमोर का मागितली मॅक्क्युलमची माफी ? KKR च्या माजी कर्णधाराचा खुलासा

Gautam Gambhir: योगायोगाने मॅक्युलमची जागा घेणारा खेळाडू मनविंदर बिस्ला होता, ज्याने संघाच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला.

Ashutosh Masgaunde

Why did Gautam Gambhir apologize to Brendon McCullum in front of the entire team? Former KKR captain reveals:

इंडियन प्रीमियर लीग (IPL) च्या इतिहासात कोलकाता नाईट रायडर्स संघ दोनदा चॅम्पियन बनला आहे. 2012 आणि 2014 मध्ये गौतम गंभीरच्या नेतृत्वाखाली त्यांनी हे विजेतेपद पटकावले होते.

2012 मध्ये चॅम्पियन बनलेल्या संघात न्यूझीलंडचा माजी कर्णधार आणि सध्याचा इंग्लंडचा कर्णधार ब्रेंडन मॅक्युलम देखील होता. दरम्यान, गंभीरने मॅक्युलमबाबत मोठा खुलासा केला आहे. त्याने म्हटले आहे की, आयपीएल 2012 दरम्यान त्याने संपूर्ण संघासमोर कोलकात्याच्या माजी सलामीवीराची माफी मागितली होती.

अंतिम सामन्यापूर्वी वेगवान गोलंदाज लक्ष्मीपती बालाजीला झालेल्या दुखापतीमुळे गंभीर अडचणीत आला होता. परिणामी त्याने फॉर्मात असलेल्या मॅक्युलमला वगळण्याचा निर्णय घेतला. त्याच्याजागी ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज ब्रेट लीला संधी देण्यात आली.

इंस्टाग्रामवर पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये, भारताचा माजी सलामीवीर गंभीरने खुलासा केला की, निर्णय घेतल्यानंतर संपूर्ण केकेआर संघासमोर त्याने मॅक्क्युलमला सॉरी म्हटले होते. गंभीर म्हणाला की, कर्णधार म्हणून एखाद्याचा नेतृत्त्व अशा प्रकारे बहरते.

"चेन्नईच्या चेपॉक मैदानावर अंतिम फेरीसाठी रवाना होण्यापूर्वी मी खरोखरच संपूर्ण संघासमोर ब्रेंडन मॅक्युलमची माफी मागितली होती," असे गंभीर म्हणाला.

गंभीरने पुढे सांगितले की, मी त्याला सांगितले की मला तुला बाहेर काढावे लागले याबद्दल मला खरोखर माफ करा. याचं कारण तुझी कामगिरी नाही, याचं कारण आपले कॉम्बिनेशन आहे. संपूर्ण संघासमोर त्याची माफी मागण्याची हिंमत माझ्यात होती. माफी मागण्यात काहीच गैर नाही.

गंभीरने माफी मागण्याचे कारणही सांगितले. तो म्हणाला, “जर मी संपूर्ण संघासमोर माफी मागितली नसती, तर माझ्या मनात कुठेतरी मला अपराधी वाटले असते की मी नीट संवाद साधला नाही. नेतृत्व म्हणजे केवळ स्तुती करणे किंवा स्वतःला शांत करणे किंवा श्रेय घेणे असे नाही. कधीकधी हे विचित्र असते पण कर्णधार म्हणून तुम्ही कसे वाढता हे महत्त्वाचे असते.''

कोलकाताने चेन्नई सुपर किंग्जचा दोन चेंडू आणि पाच गडी राखून पराभव केला होता. योगायोगाने मॅक्युलमची जागा घेणारा खेळाडू मनविंदर बिस्ला होता, ज्याने संघाच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Shubhanshu Shukla: अंतराळवीर 'शुभांशू शुक्ला' पृथ्वीवर परतणार! हार्मनी मोड्यूलमधून प्रवास होणार सुरु

Film On Ram Temple: राम मंदिरावर गोव्यातील कॅथलिक मंत्री बनवणार चित्रपट; 'अयोध्या - द फायनल आर्ग्युमेंट'मधून उलघडणार इतिहास

Valpoi: देवाक काळजी रे! गवाणे-सत्तरीतील कुटुंबाला मिळणार निवारा; आरोग्यमंत्री राणे बांधून देणार घर

Goa News Live Updates: पिसुर्ले कुंभारखण येथे दीड किलो गांजासह एकाला अटक, वाळपई पोलिसांची कारवाई

Goa Smuggling: 2 लाखांच्या खैरीच्या लाकडांची तस्करी रोखली! वन अधिकाऱ्यांची कारवाई; धारबांदोड्यात तिघांना घेतले ताब्यात

SCROLL FOR NEXT