Delhi Capitals Dainik Gomantak
क्रीडा

WPL 2023: फक्त दिल्लीलाच 5, पण बाकी टीमला केवळ 4 परदेशी खेळाडूंची परवानगी का? नक्की काय आहे नियम

वूमन्स प्रीमीयर लीगमध्ये केवळ दिल्ली कॅपिटल्सचा सामन्यात 5 परदेशी खेळाडू खेळवण्याची परवानगी आहे, तर बाकी संघ मात्र फक्त 4 परदेशी खेळाडूंनाच प्लेइंग इलेव्हनमध्ये जागा देऊ शकतात.

Pranali Kodre

Delhi Capitals: वूमन्स प्रीमियर लीगमध्ये शनिवारी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स संघात सामना पार पडला. या सामन्यात दिल्लीने 60 धावांनी विजय मिळवला. दरम्यान, या सामन्यात दिल्ली संघाने 5 परदेशी खेळाडूंना प्लइंग इलेव्हनध्ये संधी दिली होती. यामुळे अनेक क्रिकेट चाहते संभ्रमात पडले.

दिल्लीने या सामन्यासाठी प्लेइंग इलेव्हनमध्ये कर्णधार मेग लेनिंगसह मॅरिझेन काप, एलिस कॅप्सी, जेस जोनासेन आणि तारा नॉरिस या पाच परदेशी खेळाडूंना संधी दिली होती. तर बेंगलोर संघात मात्र, एलिस पेरी, सोफी डिवाईन, हिदर नाईट आणि मेगन शट या चारत परदेशी खेळाडू प्लेइंग इलेव्हनमध्ये होत्या.

नक्की काय आहे नियम?

खरंतर आयपीएल प्रमाणेच डब्ल्यूपीएलमध्ये देखील संघांना प्लेइंग इलेव्हनमध्ये 4 परदेशी खेळाडूंनाच खेळवण्याची परवानगी आहे. पण या नियमात एक ट्विस्ट आहे, तो म्हणजे जर एखाद्या संघात आयसीसीच्या सहसदस्य देशांमधील (associate nation) खेळाडू असेल, तर तिच्यासह चार अन्य परदेशी खेळाडूंना प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी दिली जाऊ शकते.

याच नियमामुळे दिल्लीला पाच परदेशी खेळाडू खेळवण्याची परवानगी मिळाली. कारण तारा नॉरिस ही अमेरिकेसाठी खेळणारी खेळाडू दिल्ली संघाचा भाग आहे आणि अमेरिका हा आयसीसीचा सहसदस्य देश आहे.

महत्त्वाचे म्हणजे डब्ल्यूपीएलमध्ये आयसीसीच्या सहसदस्य देशांमधील केवळ नॉरिस ही एकमेव खेळाडू सामील आहे. दिल्ली व्यतिरिक्त अन्य कोणत्याही संघाने सहसदस्य देशांमधील खेळाडूंना खरेदी केलेले नाही. याचमुळे डब्ल्यूपीएल 2023 हंगामात तरी केवळ दिल्लीलाच नॉरिस प्लेइंग इलेव्हनचा भाग असताना तिच्यासह पाच परदेशी खेळाडू खेळवण्याची परवानगी आहे, तर अन्य चारही संघ केवळ चारच परदेशी खेळाडू प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू शकतात.

दिल्लीने जिंकला सामना

दरम्यान शनिवारी झालेल्या सामन्यात दिल्लीने प्रथम फलंदाजी करताना शफाली वर्मा (84) आणि लेनिंग (72) यांच्या अर्धशतकाच्या जोरावर 20 षटकात 2 बाद 223 धावा केल्या होत्या.

त्यानंतर 224 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना बेंगलोरला 20 षटकात 8 बाद 163 धावाच करता आल्या. त्यामुळे दिल्लीने हा सामना सहज जिंकला. दिल्लीकडून नॉरिसने सर्वाधिक 5 विकेट्स घेतल्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Para Games 2026: सुवर्णा राजची 'गोल्ड' कामगिरी! डिस्कस थ्रोमध्ये पटकावलं सुवर्णपदक; आशियाई पॅरा गेम्समध्ये रचला इतिहास

Royal Enfield Upcoming Bikes: 'रॉयल एनफील्ड' आणणार 5 नव्या बाइक्स, 750cc सेगमेंटपासून इलेक्ट्रिक मॉडेलपर्यंत अनेक पर्याय मिळणार

October Heat: 'ऑक्टोबर हिट'मध्ये रुग्णवाहिका बंद पडली; मदतीला धावले अनोळखी हात, पण अधिकारी उभा राहिला बाजूला!

Waste Management: गोव्यात दररोज 3,824 किलो जैववैद्यकीय कचऱ्यावर प्रक्रिया; आकडेवारी आली समोर

Surya Gochar 2026: पैशांची चणचण संपणार, धनलाभाचा जबरदस्त योग! सूर्य गोचर ठरणार वरदान; 16 नोव्हेंबरपर्यंत 'या' 6 राशींची चांदी

SCROLL FOR NEXT