Rahul Dravid Dainik Gomantak
क्रीडा

भारतीय संघाचा नवा कर्णधार कोण असावा? राहुल द्रविडने दिले उत्तर

सध्याची टीम इंडियाची (Team India) कामगिरी पाहता त्याच्याकडून एकदीवसीय संघाचे नेतृत्व काढून घेण्यात येणार अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.

दैनिक गोमन्तक

भारताचा माजी कर्णधार आणि अनुभवी फलंदाज असणाऱ्या राहुल द्रविडची (Rahul Dravid) टीम इंडियाच्या (Team India) मुख्य प्रशिक्षकपदी निवड करण्यात आली आहे. बुधवारी क्रिकेट सल्लागार समितीने राहुल द्रविडची मुख्य प्रशिक्षकपदी एकमताने निवड केली. T20 विश्वचषकानंतर राहुल द्रविड मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी स्वीकारणार आहे. T20 विश्वचषकानंतर रवी शास्त्री (Ravi Shastri) यांचा कार्यकाळ संपणार असून आता द्रविडच्या मार्गदर्शनाखाली संघ पुढे जाणार आहे. राहुल द्रविड भारत-न्यूझीलंड मालिकेपासून प्रशिक्षकपदाची सुरुवात करणार आहे.

विश्वचषकानंतर विराट कोहली सुध्दा टी-ट्वेन्टी संघाचं कर्णधारपद सोडणार आहे. सध्याची टीम इंडियाची कामगिरी पाहता त्याच्याकडून एकदीवसीय संघाचे नेतृत्व काढून घेण्यात येणार अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. अशातच टीम इंडियाचा सलामीवीर असलेल्या रोहीत शर्माचं (Rohit Sharma) नाव आघाडीवर आहे.

दरम्यान, टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदी निवड होण्यापूर्वी पार पडलेल्या एका मुलाखतीदरम्यान भारतीय संघाचा नवा कर्णधार कोण असणार? असा प्रश्न विचारण्यात आला असता राहुलने सूचकपणे वक्तव्य केले. माध्यामाच्या वृत्तानुसार, बीसीसीआयने मुलाखतीदरम्यान राहुल द्रविडला प्रश्न विचारला असता त्याने रोहित शर्माचं नाव स्पष्टपणे घेतलं. हीट मॅनकडे मर्यादीत षटकांच्या क्रिकेटचं अचूक ज्ञान आहे. विशेष म्हणजे या प्रकारातील तो स्टार आहे. त्यामुळे त्याच्या छत्रछायेखाली भारतीय संघ योग्यप्रकारे आपली कामगिरी पार पाडेल, असं द्रविडने म्हटले होते. त्याचबरोबर लोकेश राहुल टीमन इंडियाचा उपकर्णधार असावा असही त्याने यावेळी म्हटले. तसेच त्याच्याकडे उपकर्णधारपदाची क्षमता देखील असल्याचेही त्याने म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bank Of Baroda Cyber Attack: बँक ऑफ बडोदावर सर्वात मोठा सायबर हल्ला? 1 टीबी संवेदनशील डेटा डार्क वेबवर लीक; ग्राहकांची धडधड वाढली

Dharmendra Pradhan Reaction: "मी 'स्ट्रीट फायटर', एसी रुममध्ये बसणारा नाही!", राजीनाम्यानंतर धर्मेंद्र प्रधान यांची पहिली प्रतिक्रिया; जुन्या आठवणींना दिला उजाळा

क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच! अंपायरनं रनआऊट दिलं, तरीही फलंदाजानं सुरु ठेवली फलंदाजी; 'तो' निर्णय ठरला सामन्याचा टर्निंग पॉइंट Watch Video

Bihar Bandh Violence: बिहार बंददरम्यान विद्यार्थ्यांवर थेट 'एके-47' ने गोळीबार! पोलिसांचा अमानुष चेहरा कॅमेऱ्यात कैद; एसआयटी जवान डिस्मिस

America New Visa Policy: ऑनलाईन फ्रॉड अन् सेक्सटॉर्शन करणाऱ्यांना झटका! अमेरिकन नागरिकांना लुटणाऱ्या चिनी गँगवर निशाण्यावर; ट्रम्प सरकारची नवी व्हिसा पॉलिसी जाहीर

SCROLL FOR NEXT