Pervez Musharraf | MS Dhoni
Pervez Musharraf | MS Dhoni Dainik Gomantak
क्रीडा

Pervez Musharraf जेव्हा धोनीला म्हणाले होते, 'केस कापू नकोस...'; अशी होती माहीची रिअ‍ॅक्शन, पाहा Video

Pranali Kodre

Pervez Musharraf: पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती परवेझ मुशर्रफ यांचे रविवारी (5 फेब्रुवारी) निधन झाले. त्यांनी दुबईमध्ये वयाच्या 70 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. मुशर्रफ हे राजकारणात होते, तरी ते एक क्रिकेट चाहते म्हणूनही अनेकांना माहित होते. त्यांनी 17 वर्षांपूर्वी एमएस धोनीला एक गमतीशीर सल्लाही दिला होता, आजही तो किस्सा अनेकदा चर्चेत येत असतो. काय होता तो किस्सा जाणून घेऊ.

मुशर्रफ राष्ट्रपती असताना भारताने 2004 आणि 2006 साली पाकिस्तान दौरा केला होता. यातील 2006 च्या दौऱ्यात धोनीचाही समावेश होता. त्यावेळी वनडे मालिकेत राहुल द्रविड भारतीय संघाचे नेतृत्व करत होता. भारताने ती वनडे मालिका जिंकलीही होती.

त्या वनडे मालिकेतील तिसरा सामना लाहोरच्या गद्दाफी स्टेडियममध्ये झाला होता. त्यावेळी पाकिस्तानने शोएब मलिकच्या 108 धावांच्या खेळीच्या जोरावर भारतासमोर 289 धावांचे आव्हान ठेवले होते.

त्याकाळी कठीण वाटणाऱ्या या आव्हानाचा पाठलाग भारताने 5 विकेट्स आणि 14 चेंडू राखून पूर्ण केले होते. भारताच्या या विजयात धोनीने महत्त्वाचे योगदान देत 46 चेंडूत नाबाद 72 धावा केल्या होत्या.

त्याच्याव्यतिरिक्त युवराज सिंगने 87 चेंडूत नाबाद 79 धावांची आणि सचिन तेंडुलकरने 104 चेंडूत 95 धावांची खेळी केली होती. पण धोनीने आक्रमक खेळ करत भारताला विजय मिळवून दिल्याने त्याला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला होता.

त्या सामन्याच्या प्रेझेंटेशनवेळी मुशर्रफही उपस्थित होते. त्यांनी त्यावेळी धोनीचे विशेष कौतुक केले होते. ते म्हणाले होते की 'मला एक फलक दिसला होता, ज्यावर लिहिले होते की धोनी हेअरकट कर. पण जर तू माझे मत विचारले, तर तू याच हेअरकटमध्ये छान दिसतो. तुझे केस कापू नकोस.'

मुशर्रफ यांचा हा सल्ला ऐकून धोनीलाही हसू आवरले नव्हते. त्यावेळी धोनीचे मानेपर्यंत रुळणारे केस होते. त्याच्या या लांब केसाचे अनेक जण चाहते होते. पण धोनीने नंतर त्याचे लांब केस कापले.

(When Pervez Musharraf said Don’t have a haircut to MS Dhoni, Watch Video)

दरम्यान, मुशर्रफ यांनी धोनीला केस न कापण्याचा दिलेल्या सल्लाची नेहमीच क्रिकेट चाहत्यांकडून आठवण काढली जाते.

तसेच 2006 च्या भारताच्या पाकिस्तान दौऱ्यातील वनडे मालिकेबद्दल सांगायचे झाले, तर भारताने पहिला सामना गमावल्यानंतरचे सर्व चार सामने जिंकले आणि मालिका 4-1 अशा फरकाने जिंकली होती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kanguva: 'कंगुवा'चा टीझर घालतोय धूमाकूळ; गोव्यासह ‘या’ खास ठिकाणी झालं बीग बजेट चित्रपटाचं शूटिंग

Goa Congress: सार्दिन घरात बसून विरियातोंचा प्रचार करतात; पाटकरांनी टोचले MP फ्रान्सिस यांचे कान

Prajwal Revanna: आम्ही व्हिसा दिला नाही… प्रज्वल रेवन्ना जर्मनीला पळून गेल्याच्या प्रश्नावर परराष्ट्र मंत्रालयाची प्रतिक्रिया

Shashi Tharoor In Goa: भाजपला धक्का बसणार, 400 नव्हे 200 पार करने देखील जड जाणार - थरुर

Goa Police : २४ वर्षांपासून अजूनही ‘ते’ न्यायाच्या प्रतिक्षेत; बडतर्फ पोलिसाची व्यथा

SCROLL FOR NEXT