MS Dhoni & Hardik Pandya Dainik Gomantak
क्रीडा

IPL 2023, CSK vs GT: फायनलमध्ये पावसाचीच जोरदार बॅटिंग! मॅच रद्द झाल्यास 'हा' संघ होणार चॅम्पियन

रविवारी चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध गुजरात टायटन्स संघात होणाऱ्या आयपीएल 2023 स्पर्धेच्या अंतिम सामन्यावर पावसाचे सावट आहे.

Pranali Kodre

Weather Report Chennai Super Kings vs Gujarat Titans IPL 2023 Final Match: इंडियन प्रीमियर लीग 2023 स्पर्धेत अंतिम सामना चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध गुजरात टायटन्स संघात होणार आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना होणार आहे. या सामन्यानंतर आयपीएल 2023 चा विजेता संघ मिळणार आहे.

पण, या सामन्यावर पावसाचे सावट आहे. रविवारी संध्याकाळी जोरदार पाऊस पडत असल्याने नाणेफेकीसही उशीर झाला. त्यामुळे या सामन्यात पावसामुळे अडथळा आला, तर काय निर्णय घेतले जाऊ शकतात याचा आढावा घेऊ.

जर पाऊस आला, तर किमान निकाल येण्यासाठी 5 षटकांचा खेळ होणे गरजेचे आहे. पाच-पाच षटकांच्या खेळासाठी कटऑफ वेळ रात्री 12 वाजून 06 मिनिटापर्यंत आहे. दरम्यान, जर 9 वाजून ३५ मिनिटापर्यंत सामना सुरू झाला, तर पूर्ण 20-20 षटकांचा सामना होणार आहे.

पण रविवारी जर सामना झाला नाही, तर सोमवारी (29 मे) अंतिम सामन्यासाठी राखीव दिवस आहे.

त्यामुळे जर रविवारी सामना सुरू झाला असेल, पण जर तो रविवारी पूर्ण झाला नाही, तर जिथे सामना थांबला आहे, तिथूनच सोमवारी सामना सुरू होईल. तसेच रविवारी केवळ नाणेफेक झाली आणि सामना सुरू झाला नाही, तर सोमवारी पुन्हा नव्याने नाणेफेक होईल. अशा परिस्थितीत संघांना प्लेइंग इलेव्हनमधील खेळाडूही बदलता येऊ शकतात.

याशिवाय जर किमान 5 षटकांचाही सामना झाला नाही, तर सुपर ओव्हर खेळवली जाऊ शकते. यासाठी कटऑफ वेळ रात्री 1 वाजून 20 मिनिटापर्यंत आहे.

या सर्व परिस्थितीतही सामना पूर्ण झाला नाही, तर मात्र गुणतालिकेत गुजरात टायटन्स चेन्नईच्या पुढे अव्वल स्थानावर असल्याने त्यांना विजेते घोषित केले जाईल.

चेन्नईला पाचवे, तर गुजरातला दुसऱ्या विजेतेपदाची आस

दरम्यान, या अंतिम सामन्यात एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्स खेळणार असून गुजरात टायटन्स हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली खेळणार आहे. अंतिम सामन्यात जर चेन्नई सुपर किंग्सने विजेतेपद जिंकले, तर हे त्यांचे आयपीएलमधील पाचवे विजेतेपद असेल. तसेच गुजरातने विजेतेपद जिंकले, तर त्यांचे हे सलग दुसरे आयपीएल विजेतेपद असेल.

चेन्नईने यापूर्वी 2010, 2011, 2018 आणि 2021 या वर्षी आयपीएल विजेतेपद जिंकले आहे. तसेच गुजरातने गेल्यावर्षी पहिल्यांचा आयपीएलमध्ये खेळताना विजेतेपदाला गवसणी घातली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ireland Head Coach Resign: भारतविरुद्धच्या शानदार विजयानंतर आयर्लंडच्या मुख्य प्रशिक्षकांचा तडकाफडकी राजीनामा; गॅरी विल्सनकडे सोपवली जबाबदारी

Yuti Yog 2026: जुलै महिन्यात ग्रहांचा महाविनाशकारी खेळ! तीन वेळा बनणार 'अशुभ युती योग'; 5 राशींसाठी ठरणार काळ

'8th Pay Commission' ची प्रतीक्षा! सरकारी कर्मचाऱ्यांच्या 'त्या' 5 मागण्यांवर होणार शिक्कामोर्तब? जुलै महिन्यातील बैठकीकडे लक्ष

National Sub Junior Boxing Championship: गोव्याच्या कनिष्काला बॉक्सिंगमध्ये ब्राँझ, राष्ट्रीय सबज्युनियर स्पर्धेत मुलींच्या गटात चमकदार कामगिरी

First Marathi Woman in US Army: कोकणकन्येचा अटकेपार झेंडा! दापोलीच्या प्राजक्ता बोंगाळे अमेरिकी सैन्यात

SCROLL FOR NEXT