India vs West Indies Dainik Gomantak
क्रीडा

WI vs IND, 1st ODI: टीम इंडियाकडून मुकेश कुमारचे पदार्पण! पहिल्या वनडेसाठी दोन्ही संघांची अशी आहे Playing XI

India vs West Indies: वेस्ट इंडिज विरुद्ध भारत यांच्यातील पहिल्या वनडे बार्बाडोसला खेळवला जात असून भारतीय संघाने नाणेफेक जिंकली आहे.

Pranali Kodre

West Indies vs India, 1st ODI: कसोटी मालिकेनंतर आता वेस्ट इंडिज विरुद्ध भारत संघा 27 जुलैपासून म्हणजेच आजपासून 3 सामन्यांच्या वनडे मालिका सुरुवात होत आहे. या मालिकेतील पहिला वनडे सामना केन्सिंग्टन ओव्हल, ब्रिजटाउन, बार्बाडोस येथे होत आहे.

पहिल्या वनडेत भारतीय संघाने नाणेफेक जिंकली असून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. या सामन्यामधून भारतीय संघाकडून वेगवान गोलंदाज मुकेश कुमार याचे वनडे पदार्पण झाले आहे. मुकेश भारताकडून वनडे क्रिकेटमध्ये पदार्पण करणारा 251 वा खेळाडू ठरला आहे.

तसेच भारताने या सामन्यासाठी 4 वेगवान गोलंदाज आणि 2 फिरकीपटू असे संमिश्रण प्लेइंग इलेव्हनमध्ये ठेवले आहे. त्याचबरोबर भारतीय संघव्यवस्थापनाने यष्टीरक्षरक म्हणून इशान किशनला संजू सॅमसनच्या आधी पसंती दिली आहे.

तसेच वेस्ट इंडिजच्या संघातही मोठा बदल झाला असून शिमरॉन हेटमायरचे पुनरागमन झाले आहे. त्यामुळे तो दोन वर्षांनी वनडे सामना खेळताना दिसणार आहे. त्याने त्याचा अखेरचा वनडे सामना बरोबर दोन वर्षांपूर्वी म्हणजेच 26 जुलै 2021 रोजी खेळला होता.

दरम्यान, वेस्ट इंडिजचा संघ आगामी वनडे वर्ल्डकप स्पर्धेतून बाहेर झाल्यानंतर आता भारताविरुद्ध वनडे मालिकेत चांगली कामगिरी करुन दाखवण्यासाठी उत्सुक असेल. तसेच भारतीय संघासाठी वर्ल्डकपच्या तयारीच्या दृष्टीने ही मालिका महत्त्वाची असणार आहे.

पहिल्या वनडेसाठी असे आहेत प्लेइंग इलेव्हन -

  • भारत - रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, इशान किशन (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, उमरान मलिक, मुकेश कुमार

  • वेस्ट इंडिज - शाई होप (यष्टीरक्षक/कर्णधार), काइल मेयर्स, ब्रॅंडन किंग, ऍलिक अथानाझ, शिमरॉन हेटमायर, रोव्हमन पॉवेल, रोमारियो शेफर्ड, यानिक कॅरिया, डॉमिनिक ड्रेक्स, जेडेन सील्स, गुडाकेश मोती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

Aadhaar Card New Rule: UIDAI ने बदलले आधार कार्डमधील नाव सुधारण्याचे नियम, नागरिकांना मोठा दिलासा; नवीन गाइडलाईन्स जारी

SCROLL FOR NEXT