West Indies ODI Team Dainik Gomantak
क्रीडा

IND vs WI ODI: भारताविरुद्ध वनडे मालिकेसाठी विंडिज संघाची घोषणा! 'हे' दोन प्रमुख खेळाडू बाहेर

West Indies ODI Squad: भारताविरुद्ध सुरु होणाऱ्या वनडे मालिकेसाठी वेस्ट इंडिजच्या संघाची घोषणा करण्यात आली आहे.

Pranali Kodre

West Indies announce 15-player squad for three-match ODI series against India:

भारतीय क्रिकेट संघ सध्या वेस्ट इंडिज दौऱ्यावर आहे. या दौऱ्यातील कसोटी मालिका नुकतीच सोमवारी (24 जुलै) संपली. दोन सामन्यांच्या या कसोटी मालिकेत भारताने 1-0 असा विजय मिळवला. या मालिकेनंतर आता भारत आणि वेस्ट इंडिज संघात 27 जुलैपासून वनडे मालिका सुरु होणार आहे.

या वनडे मालिकेसाठी आता वेस्ट इंडिज संघाची घोषणा करण्यात आली आहे. या वनडे मालिकेसाठी वेस्ट इंडिजच्या संघात 15 खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. शाय होप वनडे संघाचे नेतृत्व करेल. याबरोबरच तो यष्टीरक्षणाचीही जबाबदारी सांभाळेल.

या वनडे मालिकेसाठी निकोलस पूरन उपलब्ध नाही. तो सध्या एमआय न्यूयॉर्क संघाकडून मेजर लीग क्रिकेट स्पर्धा खेळत आहे. तसेच जेसन होल्डरचा देखील या मालिकेसाठी वेस्ट इंडिज संघात समावेश नाही.

मात्र, शिमरॉन हेटमायरचे वनडे संघात पुनरागमन झाले आहे, त्यामुळे तो आता तब्बल 2 वर्षांनी वनडे सामना खेळताना दिसू शकतो. तसेच ओशान थॉमसचेही संघात पुनरागमन झाले आहे.

तसेच या मालिकेसाठी वेस्ट इंडिज संघात वेगवान गोलंदाज जेडेन सिल्स, फिरकीपटू यानिक कॅरिया आणि गुडाकेश मोती यांचाही समावेश करण्यात आला आहे.

हेटमायर आणि थॉमस यांच्या पुनरागमनाबद्दल वेस्ट इंडिज निवड समितीचे अध्यक्ष देसमंड हाईन्स म्हणाले, 'आम्ही ओशान आणि शिमरॉन यांचे पुन्हा संघात स्वागत करतो. दोघांनीही आंतरराष्ट्रीय स्तरावर यापूर्वी यशस्वी क्रिकेट खेळले आहे आणि आम्हाला विश्वास आहे ते आमच्या संघामध्ये फिट होतील.'

'ओशानकडे वेग आहे आणि नवीन चेंडूसह तो विकेट्स घेऊ शकतो. तसेच शिमरॉनची फलंदाजी शैल मधल्या षटकांमध्ये महत्त्वाची ठरू शकते. तसेच तो एक संभाव्य फिनिशरही ठरू शकतो.'

भारताच्या संघाचीही आधीच निवड

दरम्यान, भारतीय संघाची निवड यापूर्वीच करण्यात आली आहे. भारताच्या वनडे संघाचेही नेतृत्व रोहित शर्मा करणार असून हार्दिक पंड्या उपकर्णधार असणार आहे. या मालिकेसाठी ऋतुराज गायकवाड, मुकेश कुमार या नव्या चेहऱ्यांनाही संधी देण्यात आली आहे.

वनडे मालिका

27 जुलैपासून वेस्ट इंडिज आणि भारत संघात तीन सामन्यांची वनडे मालिका सुरू होणार आहे. या मालिकेतील तीन सामने अनुक्रमे 27, 29 आणि 1 जुलै रोजी पार पडणार आहे. पहिले दोन सामने बार्बाडोसला आणि अखेरचा सामना त्रिनिदादला होणार आहे. वनडे मालिकेतील सामन्यांना भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी 7 वाजता सुरुवात होईल.

असे आहेत संघ

  • वेस्ट इंडिजचा वनडे संघ - शाय होप (कर्णधार), रोवमन पॉवेल (उपकर्णधार), एलिक अथानाझ, यानिक कॅरिया, केसी कार्टी, डोमिनिक ड्रेक्स, शिमरॉन हेटमायर, अल्झारी जोसेफ, ब्रेंडन किंग, काइल मेयर्स, गुडाकेश मोती, जेडेन सिल्स, रोमारियो शेफर्ड, केविन सिंक्लेअर, ओशान थॉमस

    सराव शिबिरातील अतिरिक्त खेळाडू: डेनिस बुली, रोस्टन चेस, मॅककेनी क्लार्क, कावेम हॉज, जेर मॅककॅलिस्टर, ओबेद मॅककॉय, केविन विकहॅम.

  • भारताचा वनडे संघ - रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, ऋतुराज गायकवाड, विराट कोहली, सुर्यकुमार यादव, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), शार्दुल ठाकूर, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, जयदेव उनाडकट, मोहम्मद सिराज, उमरान मलिक, मुकेश कुमार.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

तिसऱ्या अपत्याला 30 हजार तर चौथ्याला 40 हजार, आंध्र प्रदेश सरकारची अनोखी स्कीम; मुख्यमंत्र्यांनी केली मोठी घोषणा VIDEO

Rahu Gochar: नक्षत्र बदलून राहू करणार 3 राशींना मालामाल; मनासारखी नवीन नोकरी आणि मोठ्या पॅकेजची मिळणार ऑफर

Team India: क्रीडा जगतात मोठी खळबळ! टीम इंडियाच्या प्रशिक्षकावर लैंगिक शोषणाचा आरोप, थेट हकालपट्टीची कारवाई

Goa Dairy Subsidy: दूध उत्पादक आक्रमक! मागण्या मान्य न झाल्यास पुन्हा रस्त्यावर उतरू; उत्तर गोवा शेतकरी संघटनेचा सरकारला थेट इशारा

Middle East War: एलपीजी, पेट्रोल अन् डिझेल आणखी महाग होणार? ट्रम्प-नेतान्याहूकडून मोठ्या हल्ल्याची तयारी; 'टार्गेट लिस्ट' बनवली

SCROLL FOR NEXT