MS Dhoni Hardik Pandya Dainik Gomantak
क्रीडा

MS Dhoni - Hardik Pandya: एकमेकांविरुद्ध उभे ठाकण्यापूर्वी धोनी-हार्दिकची दिसली जिगरी दोस्ती, Video होतोय व्हायरल

आयपीएल 2023 मधील पहिल्या क्वालिफायर सामन्याआधी एमएस धोनी आणि हार्दिक पंड्या यांच्यातील बाँडिंग पाहायला मिळाले

Pranali Kodre

Bonding Between MS Dhoni And Hardik Pandya: इंडियन प्रीमियर लीग 2023 स्पर्धेत मंगळवारी गुजरात टायटन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स संघात प्लेऑफमधील पहिल्या क्वालिफायरचा सामना होत आहे. चेन्नईतील एमए चिदंबरम स्टेडियमवर (चेपॉक स्टेडियम) हा सामना होत आहे.

दरम्यान, या सामन्याआधी एमएस धोनी आणि हार्दिक पंड्या यांच्यातील बाँडिंग पाहायला मिळाले. लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे हार्दिक गुजरात टायटन्सचा कर्णधार आहे आणि धोनी चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार आहे.

पण दोन प्रतिस्पर्धी संघांचे कर्णधार असले तरी सामन्यापूर्वी त्यांच्यातील मैदानाबाहेरील चांगल्या मैत्रीचे दर्शन झाले. पहिल्या क्वालिफायरला सुरुवात होण्यापूर्वी हार्दिक आणि धोनी एकमेकांशी चर्चा करताना दिसते होते. यादरम्यान त्यांच्यात काहीतरी हलकी फुलकी चर्चा चालल्याचेही समजून येते. त्यांच्या चर्चेचा व्हिडिओ आयपीएलने सोशल मीडियावर शेअर केला आहे.

हार्दिक आणि धोनी चांगले मित्र देखील आहेत. अनेकदा त्यांना वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये आणि पार्ट्यांमध्ये एकत्र देखील पाहाण्यात आले आहे. त्याचबरोबर हार्दिकचे धोनीच्या नेतृत्वाखालीच भारतीय संघाकडून पदार्पणही झाले आहे. त्यामुळे काहीवर्षी हार्दिक आणि धोनी भारतीय संघाकडून एकत्र खेळलेही आहेत.

तसेच हार्दिक धोनीला त्याच्या आदर्श खेळाडूंपैकी एक देखील मानतो. पहिल्या क्वालिफायरच्या सामन्यापूर्वीच हार्दिकने धोनीबद्दल केलेले एक विधान प्रचंड चर्चेत आले होते. त्यान म्हटले होते की 'मी नेहमीच एमएस धोनीचा चाहता राहिलो आहे. धोनीचा तिरस्कार करण्यासाठी तुम्हाला सैतान बनावे लागेल.' तसेच हार्दिकने धोनीकडून खूप गोष्टी शिकल्या असल्याचेही सांगितले.

दरम्यान, पहिल्या क्वालिफायर सामन्यात गुजरातचा कर्णधार हार्दिक पंड्याने नाणेफेक जिंकली असून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. या सामन्यात विजय मिळवणारा संघ थेट अंतिम सामन्यात प्रवेश करणार आहे. तर पराभूत संघाला दुसरा क्वालिफायर सामना खेळावा लागेल.

असे आहेत प्लेइंग इलेव्हन -

  • चेन्नई सुपर किंग्स - ऋतुराज गायकवाड, डेव्हॉन कॉनवे, अजिंक्य रहाणे, अंबाती रायुडू, शिवम दुबे, मोईन अली, रवींद्र जडेजा, एमएस धोनी (यष्टीरक्षक/कर्णधार), दीपक चाहर, तुषार देशपांडे, महिश तिक्षणा

    राखीव खेळाडू - मथिशा पाथिराना, मिचेल सँटेनर, सुभ्रांशू सेनापती, शेख राशिद आणि आकाश सिंग 

  • गुजरात टायटन्स - शुभमन गिल, वृद्धिमान साहा(यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या(कर्णधार), दसुन शनाका, डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, राशिद खान, दर्शन नळकांडे, मोहित शर्मा, नूर अहमद, मोहम्मद शमी

    राखीव खेळाडू - विजय शंकर, श्रीकर भारत, साई सुदर्शन, जयंत यादव आणि शिवम मावी

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Shimga Extra Buses For konkan: आमच्या दाराशी हाय शिमगा.. कोकणातल्या चाकरमान्यांसाठी 'लालपरी' सुस्साट; 75 जादा गाड्यांची घोषणा

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पदरात पडणार 'होळीचं मोठं गिफ्ट'! महागाई भत्ता 'इतक्या' टक्क्यांनी वाढणार; खात्यात जमा होणार ज्यादा रक्कम

Imran Khan: भारतीय दिग्गजांचा पाकिस्तानला 'बाऊन्सर'! इम्रान खानच्या मदतीला धावले कपिल देव अन् सुनिल गावस्कर; सरकारकडे केल्या 'या' 3 मागण्या

Firing Video: रक्ताचा खेळ! LIVE सामन्यात अंदाधुंद गोळीबार, अनेकांचा जागीच मृत्यू; थरकाप उडवणारा व्हिडिओ समोर

Donald Trump: "मी राष्ट्राध्यक्ष व्हावं असं त्याला वाटत नव्हतं..." अल्पवयीन मुलींची तस्करी करणाऱ्या एपस्टीनसोबतच्या मैत्रीवर ट्रम्प बोलले

SCROLL FOR NEXT