Virat Kohli - Sachin Tendulkar
Virat Kohli - Sachin Tendulkar ICC
क्रीडा

Virat Kohli Video: किंग कोहली 50 वे वनडे शतक ठोकत सचिनसमोर नतमस्तक! पाहा स्पेशल सेलिब्रेशन

Pranali Kodre

ICC ODI Cricket World Cup 2023, India vs New Zealand Semi-Final, Virat Kohli 50th Century Video:

भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेतील पहिला उपांत्य सामना बुधवारी खेळला जात आहे. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर होत असलेल्या या सामन्यात भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीने शतक ठोकले आहे.

विराटचे हे वनडे कारकिर्दीतील 50 वे शतक आहे. त्यामुळे तो 50 वनडे शतके ठोकणारा जगातील पहिलाच क्रिकेटपटू ठरला आहे. त्याने सचिन तेंडुलकरच्या 49 वनडे शतकाच्या विक्रमाला मागे टाकले आहे. विशेष म्हणजे हा सामना पाहाण्यासाठी सचिनही स्टेडियममध्ये उपस्थित होता.

त्यामुळे जेव्हा विराटने शतक केले त्यावेळी त्याने नेहमीप्रमाणे उडी मारत सेलिब्रेशन केले. त्यानंतर तो खाली बसला. तसेच यानंतर त्याने हातातील बॅट, ग्लव्ह्ज आणि हेल्मेट खाली ठेवत सचिनला पाहून तो त्याच्यासमोर झुकला. तो सचिन समोर नतमस्तक झाल्याच्या क्षणांचा व्हिडिओ आयसीसीने शेअर केला आहे.

सचिनने 11 वर्षांपूर्वी ४९ वे वनडे शतक ठोकले होते. त्यानंतर आता ११ वर्षांनी विराटने त्याचा हा विक्रम मोडला आहे. विशेष म्हणजे सचिनपेक्षा १७२ सामने कमी खेळत विराटने हा पराक्रम केला आहे.

वनडेत सर्वाधिक शतके करणारे क्रिकेटपटू -

  • 50 शतके - विराट कोहली (291 सामने)

  • 49 शतके - सचिन तेंडुलकर (463 सामने)

  • 31 शतके - रोहित शर्मा (261 सामने)

  • 30 शतके - रिकी पाँटिंग (375 सामने)

  • 28 शतके - सनथ जयसूर्या (445 सामने)

इतकेच नाही, तर विराटने वर्ल्डकप 2023 स्पर्धेत 700 धावांचा टप्पाही पार केला आहे. त्यामुळे तो एकाच वनडे वर्ल्डकप स्पर्धेत 700 धावा करणाराही पहिलाच क्रिकेटपटू ठरला आहे. एकाच वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा सचिन तेंडुलकरचा 20 वर्षांपूर्वीचा विक्रमही विराटने मोडला आहे. सचिनने 2003 वर्ल्डकप स्पर्धेत 11 सामन्यांत 673 धावा केल्या होत्या.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Top News: चोर्ला घाट अपघातात तरुण ठार, कन्‍हैयाकुमार मृत्यूप्रकरणी खूनाचा गुन्हा नोंद; राज्यातील ठळक बातम्या

Goa Education: गोव्यात आता ITI मध्ये करता येणार दोन नवे कोर्स, 15 जुलैपासून सुरुवात; CM नी दिली महत्वाची माहिती

Bicholim News: कारवर कोसळले झाड; बैलासह म्हशीची सुटका

Assagao Demolition: आसगाव प्रकरणात CM आणि लोबो दाम्पत्याचा हस्तक्षेप! वकिलाचा युक्तीवाद, पूजाला जामीन मिळणार का?

Goa News: ...आणि मुख्यमंत्रीही झाले वारकरी !

SCROLL FOR NEXT