Virat Kohli Dainik Gomantak
क्रीडा

Virat Kohli: 'माझ्याकडून अपेक्षा ठेवू नका की..." विराटची मित्रांना कळकळीची विनंती

World Cup 2023: वर्ल्डकपपूर्वी विराटने त्याच्या मित्रांना एक विनंती केली असून त्यावर अनुष्का शर्मानेही प्रतिक्रिया दिली आहे.

Pranali Kodre

Virat Kohli Spacial request for friends ahead of ICC ODI Cricket World Cup 2023:

वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेला 5 ऑक्टोबरपासून सुरुवात होत आहे. भारतात ही स्पर्धा खेळवण्यात येणार असून हे वनडे वर्ल्डकपचे 13 वे पर्व आहे. तसेच भारतात तब्बल 12 वर्षांनी वनडे वर्ल्डकपचे सामने खेळवण्यात येणार आहेत.

त्यामुळे दर चार वर्षांनी होणाऱ्या या स्पर्धेसाठी खेळाडूंसह चाहतेही उत्सुक आहेत. पण याचदरम्यान, विराट कोहलीने त्याच्या मित्रांना एक विनंती केली आहे.

वर्ल्डकप म्हटले की प्रत्येक सामन्याबद्दल उत्सुकता असतेच. अनेक चाहतेही सामन्यांचा आनंद स्टेडियममध्ये जाऊन घेण्यासाठी उत्सुक असतात. यंदाच्या वर्ल्डकपमधील सामन्यांचीही तिकिटे जवळपास सर्व संपली आहेत.

अशात खेळाडूंकडे त्यांच्या जवळपासच्या व्यक्तींकडून अनेकदा तिकिटांसाठी विचारणा केली जाते. हीच गोष्ट लक्षात घेत विराटने इंस्टाग्राम स्टोरीवर स्पेशल पोस्ट शेअर केली आहे. त्यावर त्याची पत्नी अनुष्का शर्माचीही प्रतिक्रिया आली आहे.

Virat Kohli | Anushka Sharma Post

विराटने त्याच्या मित्रांना तिकिटांबद्दल त्याच्याकडून कोणतीही अपेक्षा न ठेवण्याची विनंती केली आहे. त्याने पोस्टमध्ये लिहिले आहे की 'आता वर्ल्डकप स्पर्धा सुरू होत आहे. मी माझ्या सर्व मित्रांना नम्रपणे सांगतो की संपूर्ण स्पर्धेदरम्यान मला तिकिटांसाठी विनंती करू नका. कृपया तुमच्या घरून मजा घ्या.' याबरोबर त्याने हसतानाचा इमोजीही शेअर केला आहे.

त्याच्या ही पोस्ट बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मानेही शेअर केली आहे. तिने लिहिले की 'मला यात एक गोष्ट अजून जोडायची आहे, जर तुमच्या मेसेजला उत्तर मिळाले नाही, तर कृपला तुम्हाला मदत करण्यासाठी मला विनंती करू नका. तुम्ही समजून घ्याल, यासाठी आभार.'

विराट आणि अनुष्काच्या या पोस्टची सध्या जोरदार चर्चा होत आहे.

यापूर्वी, अनेक माजी खेळाडूंनीही 2011 वर्ल्डकपवेळीचे अनुभव सांगितले आहेत की जवळचे लोक तिकिटांसाठी कशाप्रकारे विनंती करतात आणि त्यामुळे त्यांना कशाप्रकारे त्रास होतो.

दरम्यान, 2023 वर्ल्डकपबद्दल सांगायचे झाले, तर भारताचे दोन्ही सराव सामने पावसामुळे रद्द झाले आहे. आता मुख्य स्पर्धेत भारताचा पहिला सामना 8 ऑक्टोबर रोजी चेन्नईमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध रंगणार आहे. या स्पर्धेसाठी भारत प्रबळ दावेदार समजला जात आहे.

या स्पर्धेत भारतासह इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, अफगाणिस्तान, पाकिस्तान, बांगलादेश, श्रीलंका, दक्षिण आफ्रिका आणि नेदरलँड्स हे 10 संघ सहभागी झाले आहेत. या 10 संघात मिळून 46 दिवसात 48 सामने खेळवण्यात येणार आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT