Virat Kohli Dainik Gomantak
क्रीडा

Virat Kohli: दिल्ली कसोटीत चाहत्यांकडून RCB चा जयघोष ऐकताच किंग कोहलीनं दिली मनं जिंकणारी रिअ‍ॅक्शन

ऑस्ट्रेलियाविरुद्ध दिल्लीमध्ये झालेल्या कसोटीदरम्यान चाहत्यांनी आरसीबीचे नारे दिले होते, त्यावर विराट कोहलीने दिलेल्या रिअ‍ॅक्शनने अनेकांची मनं जिंकली आहेत.

Pranali Kodre

India vs Australia: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात दिल्लीमधील अरुण जेटली क्रिकेट स्टेडियमवर 17 ते 19 फेब्रुवारीदरम्यान दुसरा कसोटी सामना पार पडला. या सामन्यात भारतीय संघाने 6 विकेट्सने विजय मिळवून चार सामन्यांच्या या मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली आहे. दरम्यान, या सामन्यातील भारताचा फलंदाज विराट कोहलीचा एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला व्हिडिओमध्ये दिसते की विराट ऑस्ट्रेलियाविरुद्ध क्षेत्ररक्षण करत असताना स्लीपच्या क्षेत्रात उभा आहे. त्याच्याशेजारी भारताचा यष्टीरक्षक केएस भरत आहे. यावेळी चाहते विराटचा आयपीएलमधील संघ रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचे नारे देत होते.

त्यामुळे चाहत्यांकडून आरसीबी, आरसीबी असे नारे ऐकून विराटने त्यांना हाताने हे नारे न देण्याचा इशारा दिला. तसेच त्याने नंतर त्याच्या भारतीय संघाच्या जर्सीवरील लोगोकडे बोट दाखवत तो देशासाठी खेळतोय आणि त्यामुळे भारतीय संघाला प्रोत्साहन द्या, हे सुचवले. विराटचा हा व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. तसेच अनेक चाहत्यांनी त्याचे कौतुकही केले आहे.

दरम्यान, आयपीएलच्या 2023 हंगामाची घोषणा झाली असून 31 मार्चपासून या हंगामाला सुरुवात होणार आहे.

दिल्ली कसोटीत भारताचा विजय

दिल्ली कसोटीत ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना पहिल्या डावात सर्वबाद 263 धावा केल्या होत्या. तसेच भारताने पहिल्या डावात 262 धावा केल्या होत्या. त्यानंतर ऑस्ट्रेलिया दुसऱ्या डावात 113 धावांवरच सर्वबाद झाला होता.

त्यामुळे ऑस्ट्रेलियाला 1 धावेच्या आघाडीसह भारतासमोर केवळ 115 धावांचे माफक आव्हान ठेवता आले होते. या आव्हानाचा पाठलाग भारताने दुसऱ्या डावात 26.4 षटकात 4 विकेट्स गमावत 118 धावा करत पूर्ण केला.

या सामन्यात विराटने पहिल्या डावात महत्त्वपूर्ण 44 धावांची खेळी केली होती. तसेच दुसऱ्या डावात 20 धावांची खेळी केली होती. या सामन्यात रविंद्र जडेजाने 10 विकेट्स घेतल्या होत्या. त्यामुळे त्याला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला होता.

आता भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात तिसरा कसोटी सामना 1 मार्चपासून इंदोरला होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT