Virat Kohli New Tattoo Dainik Gomantak
क्रीडा

Virat Kohli New Tattoo: विराट कोहलीचा अध्यात्माला जोडणारा नवा टॅटू तुम्ही पाहिलात का?

आयपीएल सुरु होण्यापुर्वी विराटने उजव्या हातावर बनवलेला टॅटू सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल झाला होता.

दैनिक गोमन्तक

Virat Kohli New Tattoo: भारतीय संघाचा स्टार फलंदाज विराट कोहली कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे सोशल मिडियावर चर्चेत असतो. पण अलिकडे तो नव्या टॅटुमुळे चर्चेत आला आहे.

त्याने शरीरावर अनेक टॅटू बनवले आहेत. पण विराट कोणत्या प्रकारचे टॅटू निवडतो आणि त्यांचा अर्थ काय हे तुम्हाला माहिती आहे का? अलीकडेच, विराटने उजव्या हातावर एक नवा टॅटू बनवला आहे. ज्यामध्ये अध्यात्माची झलक दिसत आहे.

हा टॅटू बनवणारा कलाकार सनी भानुशाली यांनी याचा खुलासा केला आहे. विराटला टॅटू कसे आवडतात आणि तो ते कसे निवडतो आणि त्या टॅटूचा त्याच्यासाठी काय अर्थ होतो हे त्याने सांगितले. या नवीन टॅटूशिवाय विराटच्या शरीरावर आणखी 11 टॅटू आहेत.

  • विराटने पहिला टॅटू दोन वर्षांपूर्वी बनवला

भानुशालीने सांगितले की, सुमारे दोन वर्षांपूर्वी विराट कोहली त्याच्याकडे आला होता आणि त्याने पहिला टॅटू बनवला होता. भानुशाली पुढे म्हणाले, विराटने माझ्याशी संपर्क साधला होता. त्याने फोनमध्ये टॅटूची काही फोटो आणली होती.

दोन वर्षांपासून माझे काम पाहत असल्याचे कोहलीने सांगितले होते. त्याला माझ्याकडुन टॅटू काढायचा होता. पण त्याच्या बाझी शेड्युलमुळे हे होऊ शकले नाही. गेल्या महिन्यात त्याने मला पुन्हा फोन केला आणि जुन्या टॅटूवर कव्हर-अप टॅटू बनवण्याची विनंती केली.

  • आध्यात्म दर्शवणारा टॅटू

भानुशाली म्हणाले की कोहलीला एक नवीन टॅटू काढायचा होता जो त्याच्या आध्यात्माशी संबंधित असेल. असे काहीतरी जे सर्व गोष्टींच्या परस्परसंबंधाचे प्रतिनिधित्व करते आणि स्वतः निर्मितीचा स्त्रोत आहे. काहीतरी जे उच्चता आणि एकतेचे प्रतिनिधित्व करते, जीवनाची रचना, सर्वांचा स्रोत. यानंतर मी बरेच दिवस त्या टॅटूचे डिझाइन तयार केले. जेव्हा मी विराटला डिझाइन दाखवले तेव्हा त्याला ते खूप आवडले.

  • दोन सेशन्स आणि 12 तासानंतर टॅटू पुर्ण

हा टॅटू दोन सेशन्समध्ये बनवला होता. पहिले सत्र मुंबईच्या स्टुडिओमध्ये नियोजित होते. जिथे कोहलीला टॅटू बनवण्यासाठी सहा तास लागले होते. दुसरे आठ तासांचे सत्र बंगळुरू येथील एका स्टुडिओत झाले. अखेर तब्बल 12 तासांनंतर जेव्हा टॅटू पूर्ण झाला तेव्हा विराट ते पाहून आश्चर्यचकित झाला होता.

  • कोण आहे टॅटू आर्टिस्ट सनी भानुशाली

सनी भानुशाली हा भारतातील (India) सर्वोत्तम टॅटू कलाकारांपैकी एक आहे. सनी भानुशाली यांनी कस्टम डिझाईन या कला विषयात पदव्युत्तर पदवी घेतली आहे. वास्तववादी टॅटू बनवण्याच्या कल्पनेने सनी भानुशालीने 2011 मध्ये एलियन्स टॅटू नावाची कंपनी सुरू केली. सनी भानुशालीने राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय टॅटू संमेलनात अनेक पुरस्कार जिंकले आहेत.

  • या स्टार क्रिकेटर्स देखील सनी भानुशालीकडुन बनवले टॅटू

विराट कोहली व्यतिरिक्त सनी भानुशालीचे इशान किशन, हार्दिक पंड्या, रोशनी चोप्रा आणि कृणाल पंड्या यांनी देखील टॅटू बनवले आहे. लंडनच्या टॉप टॅटू मासिकांपैकी एक असलेल्या टोटल टॅटू मॅगझिनमध्ये सनी भानुशालीला महिन्यातील सर्वोत्कृष्ट टॅटू कलाकार म्हणून स्थान देण्यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT