Virat Kohli Dainik Gomantak
क्रीडा

Virat Kohli's Net Worth: विराटची संपत्ती 1000 कोटींच्या पुढे! कुठून होते कमाई जाणून घ्या

Virat Kohli's Net Worth: भारताचा माजी कर्णधार विराट कोहली सध्या जगातील सर्वात लोकप्रिय खेळाडूंपैकी एक आहे.

Manish Jadhav

Virat Kohli's Net Worth: भारताचा माजी कर्णधार विराट कोहली सध्या जगातील सर्वात लोकप्रिय खेळाडूंपैकी एक आहे. कमाईच्या बाबतीत विराट सध्याच्या काळातील खेळाडूंपेक्षा खूप पुढे आहे. विराटची संपत्ती आता 1000 कोटींच्या पुढे गेली आहे.

स्टॉक ग्रोनुसार, विराटची संपत्ती 1,050 कोटी रुपये (Virat Kohli Net Worth) आहे. विराट क्रिकेटबरोबरच इतरही अनेक ठिकाणांहून कमाई करतो.

दरम्यान, 'A+' टीम इंडियाच्या करारातून विराट कोहलीला (Virat Kohli) 7 कोटी रुपये (Virat Kohli Salary) मिळतात. त्याला कसोटी सामन्यासाठी 15 लाख रुपये, एकदिवसीय सामन्यासाठी 6 लाख रुपये आणि टी-20 सामन्यासाठी 3 लाख रुपये मिळतात.

विराट आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाकडून खेळतो. आयपीएलच्या एका मोसमासाठी विराटला 15 कोटी रुपये मिळतात. याशिवाय, तो अनेक ब्रँडचा मालक आहे, ज्यातून तो कमावतो.

दुसरीकडे, इंस्टाग्रामवर विराटचे 252 मिलियन पेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. सोशल मीडियावरील फॉलोअर्सचाही त्याच्या कमाईमध्ये वाटा आहे. हूपरच्या 2022 च्या इंस्टाग्राम रिच लिस्टनुसार, विराटला स्पॉन्सर्ड पोस्टमधून सुमारे 8.69 कोटी रुपये मिळतात.

त्याचवेळी, तो ट्विटरवर प्रत्येक पोस्टसाठी 2.5 कोटी रुपये घेतो. विराट कोहलीकडे लक्झरी कारचेही कलेक्शन आहे. त्याचवेळी, त्याचे मुंबई (Mumbai) आणि गुरुग्राममध्ये आलिशान घर आहे. विराटच्या गुरुग्राममधील घराची किंमत जवळपास 80 कोटी असून मुंबईतील घराची किंमत जवळपास 34 कोटी आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rishabh Pant: ऋषभ पंतने सोडले लखनऊ सुपर जायंट्सचे कर्णधारपद! अपयशाची स्वीकारली संपूर्ण जबाबदारी; पण संघात राहणार का?

NEET Paper Leak: 'फक्त बळीचा बकरा बनवून चालणार नाही, खऱ्या मास्टरमांइडला शोधा'; सर्वोच्च न्यायालयाची केंद्र सरकार आणि NTA ला सक्त ताकीद

Budh Gochar 2026: गुंतवणुकीतून बंपर नफा आणि परदेश प्रवासाचा योग! बुधाचे गोचर ठरणार वरदान; 3 राशींवर होणार पैशांचा पाऊस

VIDEO: अंदाज चुकला की चपलेचा सणसणीत दणका! सोशल मीडियावर अतरंगी गेमचा व्हिडिओ व्हायरल; नेटकरी हसून हसून लोटपोट

स्मार्ट चष्म्यांच्या वापरातून फिक्सिंग... आयपीएल फायनलपूर्वी खळबळ, BCCI ॲक्शन मोडमध्ये! 'या' गोष्टीवर घातली बंदी

SCROLL FOR NEXT