Virat kohli Dainik Gomantak
क्रीडा

IND VS SA: विराट कोहलीचे कॅचचे 'शतक' पूर्ण, सुनील गावस्करचा सलाम

विराट कोहलीच्या 100 कॅच पूर्ण

दैनिक गोमन्तक

विराट कोहलीने गेल्या दोन वर्षांपासून शतक केले नसले तरी केपटाऊन येथे सुरू असलेल्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी मात्र त्याने शतक पूर्ण केले. विराट कोहलीने (Virat Kohli)कसोटी क्रिकेटमध्ये 100 कॅच पूर्ण केले. हा सामना सुरू होण्यापूर्वी त्याच्या नावावर 98 कॅच होते. दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजीदरम्यान विराट कोहलीने रेसी वान डर डुसे आणिटेंबा बावुमा यांचे कॅच घेत शतक पूर्ण केले. आणि हा विक्रम करणारा विराट कोहली हा सहावा भारतीय खेळाडू ठरला.

टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडने भारतासाठी सर्वाधिक 209 कॅच घेतले आहेत. तसेच व्हीव्हीएस लक्ष्मण, सुनील गावस्कर, सचिन तेंडुलकर आणि मोहम्मद अझरुद्दीन यांनीही १०० हून अधिक कॅच घेतल्या आहे. राहुल द्रविडने 163 कसोटीत 209 कॅच, व्हीव्हीएस लक्ष्मणने 134 कसोटीत 135 कॅच, सचिन तेंडुलकरने 200 कसोटीत 115, सुनील गावस्कर यांनी 125 कसोटीत 108 कॅच तर मोहम्मद अझरुद्दीनने 99 कसोटीत 105 कॅच घेतल्या आहेत. आणि विराटने 99व्या कसोटीत 100 कॅच घेण्याचा पराक्रम केला.

सुनील गावसकर यांनी कॉमेंट्री करताना त्याच्या कॅचचे कौतुक केले. विराट कोहलीने दुसऱ्या स्लिपमध्ये त्याचा 100 वी कॅच घेतली. विशेषतः विराट कोहली हा उजव्या हाताने खेळणारा खेळाडू आहे पण त्याने डाव्या बाजूने 100 वी कसोटी कॅच घेतली. चेतेश्वर पुजाराने बावुमाचा सोपी कॅच सोडली. विराटच्या या कॅचमुळे टीम इंडियाने बावुमा आणि कीगन पीटरसनची 42 धावांची काढलेल्यांची जोडी फोडली. आणि जोडी तुटल्यानंतर टीम इंडियाला आणखी 2 विकेट मिळाल्या.

भारतीय कर्णधाराने केपटाऊन कसोटीत अप्रतिम कामगिरी केली असून. त्याने फलंदाजी करताना 79 धावांचे योगदान दिले. ज्याच्या जोरावर टीम इंडियाने 223 धावांपर्यंत मजल मारली. विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधील 28 वे अर्धशतक पूर्ण केले, मात्र तो शतकापासून दूर राहीला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

टी-20, वनडे आणि कसोटी... हरमनप्रीत कौरने अचानक सोडले सर्व फॉरमॅटचे कर्णधारपद, टीम इंडियाची धुरा आता कोणाकडे? 'या' खेळाडूचं नाव चर्चेत

8th Pay Commission: 8व्या वेतन आयोगाकडून कर्मचाऱ्यांना मोठ्या अपेक्षा! पगारवाढीपलीकडे OPS, कॅशलेस मेडिकलपासून रिस्क अलाऊन्सपर्यंत 'या' 9 प्रमुख मागण्या

गोव्यात सर्वात मोठा समाज, पण CM फक्त एकच; रवी नाईकांनंतर भंडारी समाजातील दिग्गज नेत्यांना संधी का मिळाली नाही? 2027 मध्ये दामू नाईकांचं काय?

Flydubai Flight Hijacking Plot: फ्लाईदुबई विमान हायजॅक मागे इराणचा हात? डोनाल्ड ट्रम्प यांचा खळबळजनक दावा; 9/11 सारखा हल्ला घडवण्याचा होता प्लॅन VIDEO

Shivaji Maharaj Statue: पुतळा हटवण्याऐवजी जागाच खरेदीचा प्रस्ताव; सरकारच्या धोरणावर गोवा खंडपीठ नाराज

SCROLL FOR NEXT