Virat Kohli 
क्रीडा

World Cup 2023: कोहलीचा 'विराट' कारनामा! फायनलमध्ये फिफ्टी ठोकत 'हा' विक्रम करणारा बनला पहिलाच क्रिकेटर

Virat Kohli Record: वर्ल्डकप 2023 स्पर्धेत विराट कोहलीने अर्धशतक करत मोठे विक्रम नावावर केले आहेत.

Pranali Kodre

ICC ODI Cricket World Cup 2023, India vs Australia Final, Virat Kohli Fifty Record:

वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेत रविवारी भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात अंतिम सामना होत आहे. अहमदाबादमधील नरेंद्र मोदी आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये होत असलेल्या या सामन्यात विराट कोहलीने अर्धशतक झळकावत काही विक्रमांना गवसणी घातली आहे.

विराटने या सामन्यात 63 चेंडूत 54 धावांची खेळी केली. या खेळीत त्याने 4 चौकार मारले. या खेळीसह त्याच्या आता 11 सामन्यांत 95.62 च्या सरासरीने 765 धावा झाल्या आहेत. यात त्याच्या 3 शतकांचा आणि 6 अर्धशतकांचा समावेश आहे.

त्यामुळे विराटने एका वर्ल्डकपमध्ये 750 धावा करणारा पहिला आणि एकमेव क्रिकेटपटू ठरला आहे. यापूर्वी कोणालाही वर्ल्डकपमध्ये एकाच पर्वात 700 धावांचा टप्पाही पार करता आला नव्हता.

तसेच विराटने या वर्ल्डकपमध्ये सलग पाचव्यांदा 50 धावांचा टप्पा पार केला आहे. त्यामुळे दोनदा वर्ल्डकपमध्ये सलग पाचवेळा 50 धावांचा टप्पा पार करणाराही तो पहिलाच खेळाडू ठरला आहे. त्याने 2019 वर्ल्डकपमध्येही सलग 5 अर्धशतके केली होती. तसेच 2015 वर्ल्डकपमध्ये स्टीव्ह स्मिथने सलग 5 वेळा 50 धावांचा टप्पा पार केलेला.

याबरोबरच विराटने न्यूझीलंडविरुद्ध उपांत्य फेरीत खेळतानाही शतकी खेळी केली होती. त्यामुळे तो वर्ल्डकपच्या उपांत्य आणि अंतिम सामन्यात 50 पेक्षा जास्त धावा करणारा भारताचा पहिला, तर जगातील सातवा खेळाडू ठरला आहे.

यापूर्वी माईक ब्रेअर्ली (1979), जावेद मियाँदाद (1987), अरविंद डी सिल्वा (1996), ग्रँट एलियट (2015) आणि स्टीव्ह स्मिथ (2015) यांनी असा कारनामा केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: "आम्ही भारतीय आहोत, आम्हाला चायनीज म्हणू नका!" अरुणाचलच्या चिमुकलीचा व्हिडिओ पाहून पाणावले देशवासीयांचे डोळे

Goa Parra Road: 'डियर जिंदगी रोड'वर पर्यटनाची नवी लाट! आलिया-शाहरुखच्या सायकलिंग दृश्याने पर्रा-माडानी रस्‍त्‍याला देशभरात ओळख

Grah Gochar 2026: 1 सप्टेंबरला बुध, गुरु आणि मंगळाची महायुती! 5 राशींच्या आयुष्यात येणार मोठा ट्विस्ट; हाती लागणार कुबेराचा खजिना

Chief Election Commissioner: मुख्य निवडणूक आयुक्त येणार गोव्यात, 2 व 3 सप्टेंबरला दौरा; निवडणुकीच्या दृष्टीने अधिकाऱ्यांना करणार मार्गदर्शन

न्यू यॉर्कच्या सिप्रियानी वॉल स्ट्रीटवर भारतीय संस्कृतीचा डंका! 'भारत बियॉन्ड बॉर्डर 2.0' गाला संपन्न; सिनेकलाकारांची विशेष उपस्थिती

SCROLL FOR NEXT