Virat Kohli Bowling 
क्रीडा

IND vs BAN: हार्दिक बाहेर गेला अन् विराट तब्बल 6 वर्षांनी बॉलिंगला उतरला, पाहा Video

Virat Kohli Bowling: विराट कोहली गुरुवारी तब्बल 6 वर्षांनी गोलंदाजी करताना दिसला.

Pranali Kodre

Virat Kohli Bowling in ODI Cricket after 6 years during India vs Bangladesh Match ICC World Cup 2023:

वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेत भारत विरुद्ध बांगलादेश सामना गुरुवारी (19 ऑक्टोबर) पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर खेळवला जात आहे. हा सामना सुरु असतानाच चाहत्यांना एक दुर्मिळ गोष्ट पाहायला मिळाली, ती म्हणजे विराट कोहलीची गोलंदाजी.

झाले असे की या सामन्यात बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. बांगलादेशकडून तान्झिद हसन आणि लिटन दास सलामीला फलंदाजी करताना चांगली सुरुवात दिली होती. अशा परिस्थितीत कर्णधार रोहित शर्माने 9 व्या षटकात हार्दिक पंड्याकडे गोलंदाजी सोपवली.

मात्र, या षटकातील पहिला चेंडू निर्धाव गेल्यानंतर दुसऱ्या आणि तिसऱ्या चेंडूवर मात्र, लिटन दासने चौकार ठोकला. त्याने तिसऱ्या चेंडूवर सरळ फटका मारला होता. यावेळी पायाने हार्दिक पंड्याने चेंडू आडवण्याचा प्रयत्न केला, मात्र हार्दिक या प्रयत्नात दुखापतग्रस्त झाला. त्यामुळे त्याला बाहेर जावे लागले.

यामुळेच त्याचे उर्वरित षटक विराट कोहलीने पूर्ण केले. दरम्यान, ज्यावेळी विराट गोलंदाजी करण्यासाठी पुढे आला, त्यावेळी मैदानातून त्याला मोठ्या प्रमाणात चिअर करण्यात आले. विराट यावेळी तब्बल 6 वर्षांनी वनडेत गोलंदाजी करताना दिसला. यापूर्वी ऑगस्ट २०१७ मध्ये श्रीलंकेविरुद्ध कोलंबोला झालेल्या वनडे सामन्यात विराटने अखेरच्यावेळी गोलंदाजी केली होती.

वनडे वर्ल्डकपबद्दल सांगायचे झाले, तर विराटने गोलंदाजी करण्याची ही चौथी वेळ होती. त्याने यापूर्वी 2011 वर्ल्डकपमध्ये ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका संघाविरुद्ध गोलंदाजी केली होती, तर 2015 मध्ये त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध गोलंदाजी केली होती.

हार्दिकच्या दुखापतीवर बीसीसीआची अपडेट

दरम्यान, विराटने गोलंदाजी केली असली, तरी भारतीय संघासमोर मोठी चिंता हार्दिकच्या दुखापतीची आहे. या सामन्यात तो दुखापतग्रस्त होऊन बाहेर गेल्यानंतर त्याच्या पायाचे स्कॅन करण्यात येणार असल्याची अपडेट बीसीसीआयने दिली होती. तसेच बीसीसीआयने हे देखील सांगितले की त्याच्या दुखापतीवर उपचार सुरू आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Baina Fish Market: "बायणा मासे मार्केटात जाणार नाही"! विक्रेत्यांचा ठाम पवित्रा; मुरगाव पालिकेचा निर्णय अडचणीत

Goa Municipal: म्हापशातील व्यापाऱ्यांना मोठा दिलासा! प्रलंबित प्रश्नांवर 1 जूनपर्यंत तोडगा; मुख्यमंत्र्यांचे आश्वासन

One-year of Operation Sindoor: 'ऑपरेशन सिंदूर'ला 1 वर्ष पूर्ण: पंतप्रधान मोदींसह दिग्गज नेत्यांनी बदलला सोशल मीडिया डीपी!

Goa Worker Layoffs: तोडगा निघेना, संघर्ष वाढला! सेसा कामगारांचे बेमुदत आंदोलन कायम, कंपनीने तोडग्याची तयारी फेटाळली

Goa Crime: आईच्या खूनप्रकरणात चार वर्षांनंतर मोठा दिलासा! ठोस पुराव्याअभावी खंडपीठाकडून सशर्त जामीन मंजूर

SCROLL FOR NEXT