Virat Kohali Dainik Gomantak
क्रीडा

एकदिवसीय सामन्यात 250 डावांनंतर सर्वाधिक चौकार लगावणारा खेळाडू ठरला 'विराट'

विराट कोहलीने आतापर्यंत 259 एकदिवसीय सामन्यांच्या 250 डावांमध्ये 1278 चौकार मारले आहेत,तर दुसऱ्या क्रमांकावर सेहवाग,ख्रिस गेल.

दैनिक गोमन्तक

वेस्ट इंडिजविरुद्धचा दुसरा वनडे सामना बुधवारी रंगणार आहे. विराट कोहलीने वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात 18 धावा केल्या आणि त्याला ओडियन स्मिथने कॅच आउट केले. विराट कोहलीची ही 250 वी एकदिवसीय खेळी होती. या डावात त्याने 3 चौकार मारले. 250 डाव खेळल्यानंतर विराट कोहली आता वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक चौकार मारणाऱ्या फलंदाजांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे. याशिवाय वनडे क्रिकेटमध्ये 250 डावांनंतर सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीतही तो पहिल्या स्थानावर आहे.

विराटच्या नावावर 250 एकदिवसीय डावात 1278 चौकार

विराट कोहलीने (Virat Kohali) आतापर्यंत 259 एकदिवसीय सामन्यांच्या 250 डावांमध्ये 1278 चौकार मारले आहेत. यात विराट ने 1153 चौकार आणि 125 षटकार मारले आहेत. तर दुसऱ्या क्रमांकावर सेहवाग आहे ज्याने 245 डावात 1268 चौकार लगावले आहेत. ख्रिस गेल ने 1213 चौकार मारून तिसर्‍या क्रमांकावर आहे तर अॅडम गिलख्रिस्ट हा 1167 चौकारांसह चौथ्या क्रमांकावर आहे. 1109 चौकार मारुन गांगुली हा पाचव्या क्रमांकावर आहे.

250 एकदिवसीय डावानंतर सर्वाधिक चौकार काढणारे फलंदाज-

1278 - विराट कोहली

1268 - वीरेंद्र सेहवाग

1213 - ख्रिस गेल

1167 - अॅडम गिलख्रिस्ट

1109 - सौरव गांगुली

विराट कोहलीच्या नावावर वनडेमध्ये 250 डावांनंतर सर्वाधिक धावा

एकदिवसीय क्रिकेटमधील 250 डावांनंतर सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या बाबतीत विराट कोहली हा 12,311 धावांसह पहिल्या क्रमांकावर आहे, तर गांगुली 9609 धावांसह दुसऱ्या स्थानावर आहे. तेंडुलकरने 250 एकदिवसीय डावात 9607 धावा केल्या असून तो तिसऱ्या क्रमांकावर आहे. महेंद्रसिंह धोनी 9338 धावांसह पाचव्या तर लारा हा 9354 धावांसह चौथ्या क्रमांकावर आहे.

250 डावांनंतर वनडेमध्ये सर्वाधिक धावा करणारे 5 फलंदाज

12311 - विराट कोहली

9609 - सौरव गांगुली

9607 - सचिन तेंडुलकर

9354 - ब्रायन लारा

9338 - महेंद्रसिंह धोनी

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Noise Pollution: वागातोरला ध्वनिप्रदूषणाचा त्रास! कारवाईकडे लक्ष; ट्रान्स म्युझिक पार्ट्यांमुळे लोक हैराण

Police Recruitment: 800 मीटर धावण्याच्या चाचणीला आव्हान देणारी याचिका न्यायालयानं फेटाळली, 6 उमेदवारांनी घेतला होता आक्षेप

Goa Lokotsav: फूड कोर्ट, चिनी मातीच्‍या वस्‍तूंची अनेकांवर मोहिनी; 'लोकोत्‍सवा'ला स्‍थानिकांसह पर्यटकांचीही गर्दी

Goa Municipal Election: महापालिका निवडणूक; बाबूश यांना घेरण्याची तयारी, विरोधकांची 'एकसंध' मोर्चेबांधणी; उत्पलकडे नजरा...

Omkar Elephant: ...अखेर 'ओंकार' आपल्‍या कळपात, वन अधिकाऱ्यांनी सोडला सुटकेचा निःश्र्वास

SCROLL FOR NEXT