VIDEO Ripper from Yasir Shah to get rid of Kusal Mendis Ball of the Century Twitter
क्रीडा

SLvsPak: यासिर शाहच्या 'बॉल ऑफ द सेंच्युरी'ने श्रीलंकेचा फलंदाज थक्क; पाहा VIDEO

पाकिस्तानचा लेग-स्पिनर यासिर शाहच्या एका बॉलने सोमवारी पहिल्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी श्रीलंकेचा आघाडीचा फलंदाज कुसल मेंडिसला चकित केले.

दैनिक गोमन्तक

Yasir Shah Ball of the century Video: पाकिस्तानचा लेग-स्पिनर यासिर शाहच्या एका बॉलने सोमवारी पहिल्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी श्रीलंकेचा आघाडीचा फलंदाज कुसल मेंडिसला चकित केले. यासिर शाहच्या या चेंडूला 'बॉल ऑफ द सेंच्युरी' म्हटले जात आहे. त्याच वेळी, बरेच लोक त्याची तुलना ऑस्ट्रेलियन फिरकी जादूगार शेन वॉर्नसोबत करत आहे. वॉर्नने 1993 मध्ये ओल्ड ट्रॅफर्ड येथे माईक गॅटिंगसाठी असाच एक बॉल टाकला होता. वॉर्न आता या जगात नाही.

वॉर्नचा 'बॉल ऑफ द सेंच्युरी' 20 व्या शतकात टाकला गेला, तर पाकिस्तानचा 36 वर्षीय अनुभवी फिरकीपटू यासिर शाह (Yasir Shah) याने 21व्या शतकात आपल्या लेग-स्पिन चेंडूने असाच काहीसा पराक्रम केला आहे. शहाने उजव्या हाताचा फलंदाज कुसल मेंडिसला 76 धावांवर क्लीन बोल्ड केले. 29 वर्षांपूर्वी मँचेस्टरमध्ये शेन वॉर्नच्या चेंडूप्रमाणे, यासिर शाहचा चेंडू लेग-स्टंपच्या बाहेर खेळला गेला आणि नंतर तो चेंडू जोरात वळला आणि मेंडिसचा ऑफ-स्टंप उडवला.

आयसीसीच्या म्हणण्यानुसार, समालोचकांनी लगेचच शाहच्या चेंडूची तुलना गॅटिंगला बाद करणाऱ्या वॉर्नच्या चेंडूशी करण्यास सुरुवात केली. वॉर्नचा धडाकेबाज चेंडू ही दुर्मिळ खेळी असली तरी यासिर नक्कीच वार्नच्या जवळ आला आहे. गॉलमधील पहिल्या कसोटीच्या चौथ्या दिवशी श्रीलंकेने पाकिस्तानविरुद्ध 341 धावांची आघाडी घेतली आहे. यजमान संघ दुसऱ्या डावात 337/9 अशी फलंदाजी करत असून दिनेश चंडिमल नाबाद 94 धावांवर खेळत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Waste Management: कचरा व्यवस्थापनाचे नियम पाळा, अन्यथा कारवाईची शक्यता; 385 घटकांवर प्रशासनाची नजर

Morjim School Repair News: महिना उलटूनही शाळेची दुरुस्ती रखडली; अंगणवाडी स्टेजवर, बालहक्क आयोगाची नाराजी

Morjim Beach Safety: मोरजी बीचवर गुरांचे कळप, भटक्या श्वानांचा उपद्रव; पर्यटन हंगामात पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न!

Ranji Trophy: गोव्याची फलंदाजी ठरतेय डोकेदुखी; विदर्भाविरुद्ध पराभवांची मालिका खंडित करण्याचे आव्हान

Rohit Sharma Dance Video: 'ले गई, ले गई' गाण्यावर रोहित शर्मानं धरला ठेका! करिश्मा कपूरसोबतचा डान्स व्हिडीओ व्हायरल; हिटमॅन म्हणाला, 'मजा आ गया'

SCROLL FOR NEXT