Wahab Riaz Dainik Gomantak
क्रीडा

वर्ल्ड कपमध्ये धोनी-विराटला बाद करणारा पाकिस्तानी गोलंदाज विकतोय ‘चने’

वहाब रियाझने (Wahab Riaz) मोहालीत भारताविरुद्ध अप्रतिम गोलंदाजी करताना पाच विकेट्स घेतल्या होत्या.

दैनिक गोमन्तक

विश्वचषक 2011मध्ये मोहालीच्या पीसीए स्टेडियमवर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील उपांत्य फेरीचा सामना झाला होता. यामध्ये वहाब रियाझने संपूर्ण जगाला आपली ताकद दाखवून दिली होती. वहाब रियाझने (Wahab Riaz) मोहालीत भारताविरुद्ध अप्रतिम गोलंदाजी करताना पाच विकेट्स घेतल्या होत्या. पाकिस्तानी संघ हा सामना हरला परंतु वहाब रियाझने वीरेंद्र सेहवाग, एमएस धोनी आणि विराट कोहली (Virat Kohli) सारख्या दिग्गजांना बाद केले. वर्ल्डकपमध्ये (World Cup) धमाकेदार कामगिरी करणारा हाच पाकिस्तानी गोलंदाज सोमवारी पाकिस्तानच्या (Pakistan) रस्त्यावर चने विकताना दिसला.

दरम्यान, वहाब रियाझने खरोखरच चने विकायला सुरुवात केलेली नाही. वास्तविक वहाब रियाझने त्याच्या ट्विटर अकाउंटवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे, ज्यामध्ये तो चने विकताना दिसत आहे. वहाब रियाजचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. वहाबने त्याचा व्हिडिओ ट्विट करुन लिहिले- ‘आपके चनों वाला चाचा ऑफ द डे. तुमची ऑर्डर पाठवा. काय बनवायचे आणि किती? मला माझे बालपणीचे दिवस आठवतात, मजा येते.

वहाब रियाझ हा टूर्नामेंट गोलंदाज

वहाब रियाझ जरी पाकिस्तानी संघातून बाहेर पडत असला तरी गोलंदाजीमध्ये नेहमीच मोठ्या स्पर्धांमध्ये चमकला आहे. वहाब रियाझने 2011 च्या विश्वचषकात खेळल्या गेलेल्या 5 सामन्यांमध्ये 8 विकेट घेतल्या होत्या आणि त्याचा इकॉनॉमी रेट प्रति षटकात 5 धावांपेक्षा कमी होता. त्याने भारताविरुद्ध केवळ 8 पैकी 5 विकेट घेतल्या.

वहाब रियाझ 2015 च्या विश्वचषकातील उत्कृष्ट वेगवान गोलंदाजीसाठी देखील ओळखला जातो. वहाब रियाझने ऑस्ट्रेलियाविरुद्ध (Australia) आपल्या शानदार बाऊन्सरने फलंदाजांना हादरवले होते. शेन वॉटसनला वहाबचे चेंडू खेळणे अशक्य झाले होते. 2015 च्या विश्वचषकात पाकिस्तानसाठी वहाबची सर्वोत्तम कामगिरी म्हणजे 16 विकेट्स. वहाब डिसेंबर 2020 पासून पाकिस्तानी संघातून बाहेर आहे. 36 वर्षीय वेगवान गोलंदाजाने 27 कसोटीत 83 बळी घेतले आहेत. त्याच्या नावावर 91 एकदिवसीय सामन्यात 120 विकेट आहेत. त्याचबरोबर या वेगवान गोलंदाजाने 36 टी-20 सामन्यात 34 विकेट घेतल्या आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Waste Management: कचरा व्यवस्थापनाचे नियम पाळा, अन्यथा कारवाईची शक्यता; 385 घटकांवर प्रशासनाची नजर

Morjim School Repair News: महिना उलटूनही शाळेची दुरुस्ती रखडली; अंगणवाडी स्टेजवर, बालहक्क आयोगाची नाराजी

Morjim Beach Safety: मोरजी बीचवर गुरांचे कळप, भटक्या श्वानांचा उपद्रव; पर्यटन हंगामात पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न!

Ranji Trophy: गोव्याची फलंदाजी ठरतेय डोकेदुखी; विदर्भाविरुद्ध पराभवांची मालिका खंडित करण्याचे आव्हान

Rohit Sharma Dance Video: 'ले गई, ले गई' गाण्यावर रोहित शर्मानं धरला ठेका! करिश्मा कपूरसोबतचा डान्स व्हिडीओ व्हायरल; हिटमॅन म्हणाला, 'मजा आ गया'

SCROLL FOR NEXT