वेळसाव क्लबविरुद्ध एफसी गोवाचा पहिला गोल केलेला जोव्हियल डायस. Dainik Gomantak
क्रीडा

FC Goa ची विजयी सुरवात

जोव्हियल, मेव्हनच्या गोलमुळे वेळसाव क्लबवर मात

Dainik Gomantak

Goa: माजी विजेत्या एफसी गोवा (FC Goa) संघाने मंगळवारी यंदाच्या गोवा प्रोफेशनल लीग (Goa Professional League) फुटबॉल स्पर्धेतील मोहिमेस विजयाने सुरवात केली. जोव्हियल डायस व मेव्हन डायस यांनी नोंदविलेल्या गोलच्या बळावर त्यांनी वेळसाव स्पोर्टस अँड कल्चरल क्लबला 2-0 फरकाने हरविले.

सामना म्हापसा येथील धुळेर स्टेडियमवर (Duler-Mapusa Stadium) झाला. गोवा प्रोफेशनल लीग स्पर्धेतील पदार्पण जोव्हियल व मेव्हनने संस्मरणीय ठरविले. संघाचा पहिला गोल जोव्हियलने सामन्याच्या २७व्या मिनिटास नोंदविला, नंतर ९०+३व्या मिनिटास मेव्हन डायसने संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

सामन्याच्या २१व्या मिनिटास वेळसावला आघाडीची संधी होती, पण एफसी गोवाचा गोलरक्षक हॅन्सेल कुएल्हो याने चपळाई प्रदर्शित करत रोहन रॉड्रिग्जचा फटका रोखला. त्यानंतर आयव्हन कॉस्ताच्या असिस्टवर जोव्हियलने अचूक नेम साधल्याने एफसी गोवास आघाडी मिळाली. जोव्हियलने वेळसावच्या दोघा खेळाडूंना गुंगारा देत शानदार गोल केला. विश्रांतीस पाच मिनिटे असताना आयव्हनचा फ्रीकिक फटका गोलपट्टीस आपटल्यामुळे एफसी गोवाची संधी हुकली, तर जोव्हियलचा फटका दिशाहीन ठरल्याने एफसी गोवाची आघाडी एका गोलपुरती मर्यादित राहिली.

गार्डियन एंजलची लढत वास्को क्लबशी

गोवा प्रोफेशन लीग फुटबॉल स्पर्धेत बुधवारी (ता. २०) म्हापसा येथील धुळेर स्टेडियमवर गार्डियन एंजल स्पोर्टस क्लब व वास्को स्पोर्टस क्लब यांच्यात होईल. दोन्ही संघांचा हा स्पर्धेतील पहिलाच सामना आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

Aadhaar Card New Rule: UIDAI ने बदलले आधार कार्डमधील नाव सुधारण्याचे नियम, नागरिकांना मोठा दिलासा; नवीन गाइडलाईन्स जारी

SCROLL FOR NEXT