Venkatesh Iyer Dainik Gomantak
क्रीडा

IPL 2023: वेंकटेश अय्यरचा MI विरुद्ध शतकी धमाका! 'हा' कारनामा करणारा बनला दुसराच क्रिकेटर

कोलकाता नाईट रायडर्सचा फलंदाज वेंकटेश अय्यरने आज मुंबई इंडियन्सविरुद्ध शतकी खेळी केली आहे.

Pranali Kodre

Venkatesh Iyer Century: इंडियन प्रीमियर लीग 2023 स्पर्धेत मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स संघात रविवारी सामना झाला. या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सचा खेळाडू वेंकटेश अय्यर याने शतकी खेळी केली आहे. याबरोबरच त्याने काही विक्रमांनाही गवसणी घातली.

या सामन्यात मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकून कोलकाता नाईट रायडर्सला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले होते. त्यामुळे कोलकाताकडून रेहमानुल्लाह गुरबाज आणि एन जगदीशन सलामीसाठी उतरले. पण हे दोघेही स्वस्तात बाद झाले. तसेच नितीश राणाही 5 धावा करून बाद झाला. पण या विकेट्स जात असताना दुसरी बाजू वेंकटेश अय्यरने सांभाळलीच नाही, तर आक्रमक फलंदाजी करत संघाची धावसंख्या वाढवली.

त्याला शार्दुल ठाकूरनेही चांगली साथ देताना 50 धावांची भागीदारी केली होती. पण शार्दुल 13 धावांवर बाद झाला. मात्र वेंकटेशने त्याची लय कायम ठेवताना 49 चेंडूत शतक पूर्ण केले. पण शतक केल्यानंतर तो लगेचच बाद झाला. त्याने 51 चेंडूत 104 धावांची खेळी केली. त्यात त्याने 6 चौकार आणि 9 षटकार मारले.

दरम्यान, तो आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून शतक करणारा दुसराच खेळाडू ठरला आहे. यापूर्वी तब्बल 16 वर्षांपूर्वी ब्रेंडन मॅक्युलमने कोलकाताकडून आयपीएलमध्ये पहिले शतक केले होते. त्याने आयपीएलच्या पहिल्या वहिल्या सामन्यातच रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरविरुद्ध नाबाद 158 धावांची खेळी केली होती.

आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्सकडून सर्वोच्च धावांची खेळी -

158* - ब्रेंडन मॅक्युलम, (विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर, 2008)

104 - वेंकटेश अय्यर, (विरुद्ध मुंबई इंडियन्स, 2023)

97* - दिनेश कार्तिक (विरुद्ध राजस्थान रॉयल्स, 2019)

94 - मनिष पांडे (विरुद्ध पंजाब किंग्स, 2014)

93 - ख्रिस गेल (विरुद्ध गुजरात लायन्स, 2017)

दरम्यान वेंकटेशच्या या शतकामुळे कोलकाताने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 6 बाद 185 धावा उभारल्या. कोलकाताकडून रिंकू सिंगही आज मोठी खेळी करण्यात अपयशी ठरला. त्याने 18 धावांची खेळी केली. त्याच्याशिवाय आंद्रे रसेलने 21 धावांची नाबाद खेळी केली.

आयपीएल 2023 मधील दुसरे शतक

लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे वेंकटेश आयपीएल 2023 हंगामात शतक करणारा दुसरा खेळाडू आहे. यापूर्वी सनरायझर्स हैदराबादचा फलंदाज हॅरी ब्रुकने शतकी खेळी केली होती. त्याने कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्या सामन्यातच शतक केले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Diwali Bonus for Central Govt Employees: केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिवाळीची मोठी भेट! मोदी सरकारकडून बोनस जाहीर; खात्यात येणार 'इतके' पैसे

Crime News: आधी प्रेमसंबंध, नंतर हत्येचा कट! पत्नीने पतीच्या मदतीने प्रियकराचा गळा आवळला; मृतदेह गोणीत भरून कालव्यात फेकला

Triple Talaq Case: लग्नानंतर 21 वर्षे संसार, 3 मुलं आणि आता...! बायकोला ट्रिपल तलाक देणाऱ्या नवऱ्याला कोर्टाचा दणका; सुनावली 'इतक्या' वर्षांची शिक्षा अन् दंड

VIDEO: 'सर्वात मोठे ओठ' बनवण्याचा अट्टहास! डॉक्टरांनी नकार दिल्यावर महिलेने घरीच घेतलं इंजेक्शन; पुढे नको तेच झालं, पाहा व्हिडिओ

Bulbul Film Festival: बुलबुल बालचित्रपट महोत्सवाची सांगता; 'द ग्रेट ग्रॅंड सुपर हिरो'चे प्रदर्शन, सर्वोत्तम चित्रपटाची घोषणा

SCROLL FOR NEXT