football tournament Dainik Gomantak
क्रीडा

वेळसावचा चर्चिल ब्रदर्सला धक्का

प्रोफेशनल लीग : कळंगुट असोसिएशनची पणजी फुटबॉलर्सवर मात

दैनिक गोमन्तक

पणजी : वेळसाव स्पोर्टस अँड कल्चरल क्लबने गोवा प्रोफेशनल लीग फुटबॉल स्पर्धेत (Goa Professional League Football Tournament) पिछाडीवरून येत माजी विजेत्या चर्चिल ब्रदर्सला पराभवाचा जोरदार धक्का दिला. सामना शुक्रवारी घोगळ-मडगाव येथील चौगुले महाविद्यालय मैदानावर झाला. (Velsav Sports and Cultural Club defeated Churchill Brothers)

म्हापसा (Mhapsa) येथील धुळेर स्टेडियमवर (Dhuler Stadium) कळंगुट असोसिएशनने (Calangute Association) पूर्वार्धातील गोलच्या बळावर पणजी फुटबॉलर्सला (Panaji footballers) 1-0 फरकाने हरविले. संघातील 20 वर्षांखालील खेळाडू ज्योवितो फर्नांडिस याने 18व्या मिनिटास केलेल्या गोलमुळे कळंगुटला विजयाचे पूर्ण तीन गुण मिळविता आले.

चर्चिल ब्रदर्सविरुद्ध वेळसाव संघ पूर्वार्धात 2-1 फरकाने मागे होता. नंतर उत्तरार्धात त्यांनी बरोबरी साधली आणि सामना संपण्यास नऊ मिनिटे बाकी असताना बदली खेळाडू जेम्स फर्नांडिस याने केलेल्या गोलच्या बळावर स्पर्धेतील सनसनाटी विजयाची नोंद केली.

क्लेन्सियो पिंटो याने 19व्या मिनिटास केलेल्या गोलमुळे चर्चिल ब्रदर्सला (Churchill Brothers) आघाडी मिळाली. त्यांच्यासाठी शॅनन व्हिएगस याने 33 व्या मिनिटास आणखी एक गोल केला. रोहन रॉड्रिग्ज याने 34व्या मिनिटास वेळसाव क्लबची पिछाडी एका गोलने कमी केली. विश्रांतीनंतर 52व्या मिनिटास रोहनने सामन्यातील वैयक्तिक दुसरा गोल (Goa) केल्यामुळे वेळसावला बरोबरी साधता आली. 72व्या मिनिटास मैदानात बदली खेळाडू या नात्याने आलेल्या जेम्स फर्नांडिसने 81व्या मिनिटास गोल करून सामन्यात प्रथमच वेळसावला आघाडी मिळवून दिली, नंतर हाच गोल विजयी ठरला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mark Zuckerberg News: चाइल्ड पोर्नोग्राफी आणि डीपफेक कंटेंटवरुन मोदी सरकार आक्रमक, मार्क जुकरबर्गने मागितली माफी; मेटाच्या अधिकाऱ्यांना पुन्हा समन्स

India vs Sri Lanka: स्वातंत्र्यदिनी टीम इंडिया रचणार इतिहास! अशी कामगिरी करणारा भारत ठरणार जगातील तिसराच; श्रीलंकेत गिल ब्रिगेड करणार कमाल

Navpancham Rajyog 2026: सूर्य-शनिच्या नवपंचम राजयोगानं उजळणार 5 राशींचं भाग्य; धनलाभासह करिअरमध्ये मिळणार प्रचंड यश!

CJP Paper Leak Protest: पेपरफुटीच्या वादात युवाशक्तीचा मोठा विजय! प्रधानांचा राजीनामा अन् मोदी सरकारचा नतमस्तक होणारा पराजय?

Gold Silver Rate: सोन्याचा भाव गगनाला भिडला! 1 लाख 46 हजारांचा टप्पा केला पार, चांदीनेही गाठला नवा उच्चांक; जाणून घ्या आजची किंमत

SCROLL FOR NEXT