Vaibhav Suryavanshi Emotional Video Dainik Gomantak
क्रीडा

VIDEO: बुमराहला भिडला अन् आऊट झाल्यावर रडला! वैभव सूर्यवंशीचा 'इमोशनल' व्हिडिओ व्हायरल; चाहतेही भावूक

Vaibhav Suryavanshi Emotional Video: पावसामुळे हा सामना रात्री 10 वाजेनंतर उशिरा सुरु झाला, तरीही स्टेडियममध्ये उपस्थित असलेले चाहते आणि टीव्हीसमोर बसलेले प्रेक्षक वैभवची फलंदाजी पाहण्यासाठी आतुर होते.

Manish Jadhav

Vaibhav Suryavanshi Emotional Video: आयपीएलच्या मैदानात जेव्हा एखादा युवा खेळाडू आपल्या बॅटने जगाला दखल घ्यायला लावतो, तेव्हा तो केवळ धावांसाठी नाही तर त्याच्यातील खेळाप्रति असलेल्या जिद्दीसाठी ओळखला जातो. राजस्थान रॉयल्सचा युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी याच्याबाबत मंगळवारी रात्री असंच काहीसं पाहायला मिळालं. मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात त्याने केवळ 14 चेंडूत 39 धावांची तुफानी खेळी खेळली, पण ही खेळी मोठ्या शतकात किंवा अर्धशतकात रुपांतरित न झाल्याने मैदानाबाहेर जाताना त्याला आपले अश्रू आवरता आले नाहीत. पराभवापेक्षा स्वतःच्या खेळावर नाराज असलेला वैभवचा हा भावनिक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

पावसामुळे हा सामना रात्री 10 वाजेनंतर उशिरा सुरु झाला, तरीही स्टेडियममध्ये उपस्थित असलेले चाहते आणि टीव्हीसमोर बसलेले प्रेक्षक वैभवची फलंदाजी पाहण्यासाठी आतुर होते. खेळाच्या पहिल्या ओव्हरमध्ये तो स्ट्राईकवर नव्हता, पण दुसऱ्या ओव्हरमध्ये जेव्हा त्याचा सामना जगातील सर्वोत्तम गोलंदाज जसप्रीत बुमराहशी झाला, तेव्हा खऱ्या अर्थाने थरार सुरु झाला. बुमराहच्या पहिल्याच चेंडूवर वैभवने ज्या आत्मविश्वासाने उत्तुंग षटकार ठोकला, ते पाहून खुद्द बुमराहच्या चेहऱ्यावरही हास्य उमटले. आपल्याच देशाचा एक तरुण तारा इतका निर्भिडपणे खेळतोय, हे पाहून बुमराहलाही कौतुक वाटले असावे. या ओव्हरमध्ये वैभवने बुमराहला आणखी काही देखणे फटके मारुन प्रेक्षकांच्या डोळ्यांचे पारणे फेडले.

मात्र, ही फटकेबाजी फार काळ टिकू शकली नाही. शार्दुल ठाकूरच्या एका चेंडूवर वैभव बाद झाला आणि राजस्थान रॉयल्सचा (Rajasthan Royals) हा तुफान रथ थांबला. त्याने आपल्या खेळीत 1 चौकार आणि 5 गगनभेदी षटकार लगावले. 5 ओव्हरमध्ये 80 धावांपर्यंत संघाला नेण्यात त्याचा मोठा वाटा उचलला. पण बाद होऊन पॅव्हेलियनकडे परतताना वैभवच्या चेहऱ्यावर जी निराशा होती, ती हृदय पिळवटून टाकणारी होती. स्टेडियममधून समोर आलेल्या एका 'इनसाईड' व्हिडिओमध्ये वैभव आपले अश्रू पुसताना आणि रागाच्या भरात बॅट जमिनीवर आपटताना दिसत आहे.

धावांची भूक इतकी प्रचंड होती की, त्याला आपली 39 धावांची खेळी अत्यंत अपूर्ण वाटत होती. वैभवमधील हीच जिद्द आणि खेळाप्रती असलेले प्रेम भविष्यात त्याला भारतीय क्रिकेटचा नवा सुपरस्टार बनवेल, अशी आशा आता क्रिकेट चाहत्यांकडून व्यक्त केली जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mark Zuckerberg News: चाइल्ड पोर्नोग्राफी आणि डीपफेक कंटेंटवरुन मोदी सरकार आक्रमक, मार्क जुकरबर्गने मागितली माफी; मेटाच्या अधिकाऱ्यांना पुन्हा समन्स

India vs Sri Lanka: स्वातंत्र्यदिनी टीम इंडिया रचणार इतिहास! अशी कामगिरी करणारा भारत ठरणार जगातील तिसराच; श्रीलंकेत गिल ब्रिगेड करणार कमाल

Navpancham Rajyog 2026: सूर्य-शनिच्या नवपंचम राजयोगानं उजळणार 5 राशींचं भाग्य; धनलाभासह करिअरमध्ये मिळणार प्रचंड यश!

CJP Paper Leak Protest: पेपरफुटीच्या वादात युवाशक्तीचा मोठा विजय! प्रधानांचा राजीनामा अन् मोदी सरकारचा नतमस्तक होणारा पराजय?

Gold Silver Rate: सोन्याचा भाव गगनाला भिडला! 1 लाख 46 हजारांचा टप्पा केला पार, चांदीनेही गाठला नवा उच्चांक; जाणून घ्या आजची किंमत

SCROLL FOR NEXT