Goa Under 19 Boys Cricket Team  Dainik Gomantak
क्रीडा

Under 19 Boys Cricket Tournament: वीर यादवचे धडाकेबाज शतक, पण गोवा उपविजेता

यजमान केरळ संघ चार विकेट राखून विजयी

किशोर पेटकर

Goa Under 19 Boys Cricket Team Runner-Up: सलामीचा फलंदाज वीर यादव याने धडाकेबाज शतक नोंदविले, पण अखेरीस गोव्याला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. वायनाड येथे झालेल्या १९ वर्षांखालील मुलांच्या क्रिकेट स्पर्धेत यजमान केरळने विजेतेपद पटकावले.

गुरुवारी झालेल्या अंतिम लढतीत केरळने गोव्याला चार विकेट राखून हरविले. वीर यादवने ११७ चेंडूंत १७ चौकारांच्या मदतीने ११६ धावा केल्या, त्यामुळे नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना गोव्याला ४७.२ षटकांत सर्वबाद २०८ धावा करता आल्या.

त्यानंतर ३ बाद २८ वरून विजेतेपदाला गवसणी घालताना केरळने ४७ षटकांत ६ बाद २११ धावा केल्या. त्यांच्या डावात पवन श्रीधर (५४) व गोविंद पै (नाबाद ८४) यांनी चौथ्या विकेटसाठी केलेली ९० धावांची भागीदारी निर्णायक ठरली.

संक्षिप्त धावफलक

गोवा: ४७.२ षटकांत सर्वबाद २०८ (वीर यादव ११६, शंतनू नेवगी १२, यश कसवणकर १५, रिजुल पाठक ०, दिशांक मिस्कीन १४, मल्हार नाईक ११, जीवन चित्तम ५, पुंडलिक नाईक १, कौस्तुभ पिंगुळकर २, युवराज सिंग ६, शिवांक देसाई नाबाद ६, एस. अभिराम ३-२८, विजय विश्वनाथ ३-२२, महंमद एनान ३-३८) पराभूत

वि. केरळ: ४७ षटकांत ६ बाद २११ (पवन श्रीधर ५४, गोविंद पै नाबाद ८४, विजय विश्वनाथ १५, अहमद इम्रान १५, ए. जिष्णू नाबाद १८, पुंडलिक नाईक ७-१-३१-१, युवराज सिंग ८-०-४६-२, कौस्तुभ पिंगुळकर ४-०-१७-०, शिवांक देसाई ८-०-३६-०, यश कसवणकर १०-०-३५-१, मल्हार नाईक ८-१-४२-१, शंतनू नेवगी २-१-४-१).

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Grah Gochar 2026: 1 सप्टेंबरला बनणार 6 शक्तिशाली राजयोग! 'या' राशींची तिजोरी पैशांनी भरणार; होणार अफाट धन वर्षाव

Weather Update: ऑगस्टमध्ये समाधानकारक पाऊस, सर्वाधिक वाळपईत; जुलैमधील पावसाचा तुटवडा मात्र कायम

Marcel Road Issue: माशेलात 'वर्दळीचा' रस्ता धोकादायक, खड्ड्यांमुळे वाहतुकीला अडथळा; पावसात दुचाकीस्वारांसमोर मोठे संकट

Panaji: थकीत घरपट्टीचा फटका भाडेकरूंना; उत्पन्नाचा दाखला मिळविताना भाडेकरूंच्या मुलांची मोठी कसरत

Police Attack Viral Video: पीएसआयचा गळा आवळला, लोखंडी साखळीने हल्ला... लखनऊमध्ये अतिक्रमण हटवताना राडा; दोन महिलांसह 6 जणांना बेड्या

SCROLL FOR NEXT