Umran Malik  Dainik Gomantak
क्रीडा

IND vs BAN, 2nd ODI: उमरान मलिकच्या ताशी 150 किमीच्या बॉलिंगने बांगलादेशी फलंदाज बेजार, Video Viral

Pranali Kodre

भारताचा गोलंदाज उमरान मलिक त्याच्या वेगवान गोलंदाजीसाठी प्रसिद्ध आहे आणि आता तो प्रत्येक सामन्यात त्याच्या वेगाचे प्रदर्शन करत आहे. तो सातत्याने ताशी 150 किमीच्या आसपास गोलंदाजी करू शकतो. हेच बुधवारी झालेल्या भारत विरुद्ध बांगलादेश संघातील दुसऱ्या वनडेतही दिसले. त्याने बांगलादेशच्या फलंदाजांना सळो की पळो केलं होतं.

या दरम्यान त्याने असे काही वेगवान चेंडू टाकले, ज्यामुळे बांगलादेशच्या फलंदाजांना स्वत:ला वाचवावे लागले. बांगलादेशची फलंदाजी सुरु असताना 12 व्या षटकात शाकिब अल हसन विरुद्ध उमरानने सातत्याने त्याचा वेगवान मारा सुरू ठेवला होता. त्याच्या वेगामुळे शाकिब गोंधळलेला दिसला. त्याला एकही धाव घेता आली नाही.

पण, या षटकाच्या अखेरचा चेंडू जवळपास ताशी 150 किमीने उमरानने टाकला, त्यावेळी शाकिब स्वत:ला वाचवण्यासाठी खाली वाकला, पण तो चेंडू त्याच्या हेल्मेटला लागला. त्यामुळे दोन्ही संघात काहीसे चिंतेचे वातावरण झाले. भारतीय यष्टीरक्षक केएल राहुलने लगेचच त्याच्याकडे येत त्याची चौकशी केली. तसेच बांगलादेशच्या मेडिकल स्टाफनेही त्याला तपासल्यानंतर त्याने पुन्हा फलंदाजी सुरू केली.

मात्र, त्यानंतरही उमरानने त्याची वेगवान गोलंदाजी सुरू ठेवली होती. त्याने 14 व्या षटकाचा पहिलाच चेंडू ताशी 151 किमी वेगाने फेकला आणि नजमुल हुसैन शांतो याला त्रिफळाचीत केले. त्याच्या या वेगवान गोलंदाजीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरलही होत आहे.

उमरानने या संपूर्ण सामन्यात 10 षटकांत 58 धावा देत 2 विकेट्स घेतल्या. त्याने काही दिवसांपूर्वीच संपलेल्या न्यूझीलंड दौऱ्यातून वनडे क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्याने न्यूझीलंडमध्येही त्याच्या अशाच वेगवान गोलंदाजीचे प्रदर्शन केले होते. त्याने आत्तापर्यंत 4 वनडे सामने खेळले असून 5 विकेट्स घेतल्या आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Subhash Velingkar: सुभाष वेलिंगकरांची अटक अटळ? कोर्टाचा दिलासा नाही, जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

BKC ते आरे JVLR पंतप्रधान मोदींचा मेट्रोने प्रवास; शाळकरी विद्यार्थी, महिलांशी साधला संवाद पाहा Video

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

गिरीत बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह , संशयास्पद मृत्यूचा कुटुंबियांचा अंदाज; गोव्यातील ठळक बातम्या

SCROLL FOR NEXT