Travis Head Skips IPL 2027 Season: आगामी आयपीएल हंगामापूर्वी सनरायझर्स हैदराबाद संघाला मोठा धक्का बसला. संघाचा विस्फोटक सलामीवीर ट्रेव्हिस हेडने आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या व्यस्त वेळापत्रकातून स्वतःचा ताण कमी करण्यासाठी आयपीएलचा आगामी हंगाम न खेळण्याचा मोठा निर्णय घेतला.
मिळालेल्या महितीनुसार, हेडच्या या माघारीमुळे हैदराबाद संघाला मोठा धक्का बसला. सनरायझर्सने मेगा लिलावापूर्वी ज्या पाच खेळाडूंना 14 कोटी रुपयांच्या मोबदल्यात कायम ठेवले होते, त्यात हेडचा समावेश होता. आता त्याच्या या निर्णयामुळे आयपीएलची अंतिम मंजुरी मिळताच ही मोठी रक्कम संघाच्या खात्यात जमा होईल, ज्यामुळे त्यांना लिलावात इतर दिग्गज खेळाडूंना खरेदी करण्यासाठी बऱ्याच प्रमाणात आर्थिक फायदा होईल.
ऑस्ट्रेलियन संघाचे मुख्य प्रशिक्षक अँड्र्यू मॅकडोनाल्ड यांनी 2027 मधील अत्यंत व्यस्त क्रिकेट कॅलेंडरमुळे अशा प्रकारच्या कठीण निर्णयांचे आधीच संकेत दिले होते. या वर्षात 20 कसोटी सामन्यांची मालिका, आयपीएलच्या (IPL) अगदी नंतर जून महिन्यात होणारी विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धा, ऐतिहासिक 'द अॅशेस' मालिका आणि ऑक्टोबर-नोव्हेंबरमधील एकदिवसीय विश्वचषक असा भरगच्च कार्यक्रम ऑस्ट्रेलियन संघासमोर आहे. ट्रेव्हिस हेडने 2024 मध्ये 6.8 कोटी रुपयांमध्ये सनरायझर्स हैदराबाद संघात प्रवेश केला होता आणि आपल्या पहिल्याच हंगामात 567 धावा काढून संघाच्या विजयात मोलाची भूमिका बजावली होती.
त्याच्या आयपीएल कारकिर्दीबद्दल बोलायचे झाल्यास, आतापर्यंत 43 सामन्यांत 176च्या स्ट्राईक रेटने त्याने 1351 धावा काढल्या आहेत. सनरायझर्ससाठी अत्यंत यशस्वी ठरलेली 'ट्रॅव्हिशेक' ही जोडी आता आगामी आयपीएल हंगामात दिसणार नाही.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.