Tokyo Olympics: Mirabai Chanu gives first medal to India Twitter @ANI
क्रीडा

Tokyo Olympics: मीराबाई चानूची 'चंदेरी' कामगिरी,भारताला मिळवून दिले पहिलं पदक!

2008 नंतर पहिल्याच दिवशीऑलिम्पिकमध्ये(Tokyo Olympics) भारताला पहिल्यांदाच एखादे पदक मिळाले आहे.

दैनिक गोमन्तक

टोकियो ऑलिम्पिकच्या(Tokyo Olympics) पहिल्याच दिवशी भारताने(India) पदकांच्या यादीमध्ये आपले खाते उघडले आहे. मीराबाई चानूने(Mirabai Chanu) वेटलिफ्टिंगमध्ये (Weightlifting) महिलांच्या 49 kg किलो गटात रौप्य पदक(silver medal) जिंकून इतिहास रचला आहे. ऑलिम्पिक स्पर्धेच्या इतिहासातील हे भारताचे पाचवे रौप्यपदक आहे. ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी पदक जिंकणारी मीराबाई चानू ही दुसरी महिला वेटलिफ्टर आहे, तर चीनच्या जिजीहूने टोकियो ऑलिम्पिकमधील 49 किलो वजनी उचल स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले आहे.(Tokyo Olympics 2021)

2008 नंतर पहिल्याच दिवशीऑलिम्पिकमध्ये भारताला पहिल्यांदाच एखादे पदक मिळाले आहे. 2008 मध्ये पहिल्याच दिवशी अभिनव बिंद्रा यांनी शूटिंग मध्ये गोल्ड मेडल मिळवलं होत.

वेटलिफ्टिंगमध्ये रौप्य पदक जिंकणारी मीरबाई ही पहिली भारतीय खेळाडू ठरली आहे. स्नॅचनंतर मीराबाई चानू दुसर्‍या क्रमांकावर होत्या. यानंतर मीराबाई चानूने पहिल्या प्रयत्नात 110 किलो वजन उचलले. दुसर्‍या प्रयत्नात मीराबाई चानू 115 किलो वजन उचलण्यात यशस्वी ठरल्या. तथापि, तिसऱ्या प्रयत्नात त्या अपयशी ठरल्या आणि तिला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.

मीराबाई चानूने पदक जिंकताच संपूर्ण देशात आनंद साजरा केला जात आहे. तिच्या या यशाने संपूर्ण देशाला अभिमान वाटत आहे. मीराबाई चानू यांच्या कर्तृत्वाबद्दल आनंद व्यक्त करीत अध्यक्ष रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही त्यांचे अभिनंदन केले आहे.

"ही अनेक आनंदी सुरवात असून, मीराबाईचे मी अभिनंदन करतो तिचा हा विजय संपूर्ण देशाला प्रेरणा देणारा आहे." अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मीराबाई यांचे अभिनंदन केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT