Today victory is confirmed in Centurion, this record is good news for Team India

 

Dainik Gomantak

क्रीडा

Ind Vs Sa Test: सेंच्युरियनच्या मैदानावर टीम इंडिया रचणार इतिहास

चौथ्या दिवसअखेर टीम इंडियाने 305 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेच्या 4 विकेट्स घेतल्या आहेत.

दैनिक गोमन्तक

सेंच्युरियन कसोटी निर्णायक बिंदूवर पोहोचली आहे. चौथ्या दिवसअखेर टीम इंडियाने 305 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेच्या 4 विकेट्स घेतल्या आहेत. त्याचवेळी चौथ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत दक्षिण आफ्रिकेने 94 धावा केल्या आहेत. दक्षिण आफ्रिकेसाठी (South Africa) ही दिलासादायक बाब आहे की त्यांचा कर्णधार डीन एल्गर (Dean Elgar) 52 धावा करूनही क्रीझवर आहे आणि टेम्बा बावुमा आणि क्विंटन डी कॉक अद्याप फलंदाजीला आलेले नाहीत. दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी आणखी 211 धावांची गरज आहे.

सेंच्युरियनमधील चौथ्या डावाचा रेकॉर्ड काय?

सेंच्युरियनच्या सुपर स्पोर्ट पार्कमध्ये आतापर्यंत कोणत्याही संघाला इतके मोठे लक्ष्य गाठता आलेले नाही. चौथ्या डावात इंग्लंडने या मैदानावर 2019 मधील सर्वात मोठी धावसंख्या केली. 376 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडने 268 धावा केल्या होत्या. पाठलाग करताना विजय मिळवण्याच्या बाबतीतही या मैदानावरील विक्रम इंग्लंडच्या नावावर आहे.

2000 साली इंग्लंडने दक्षिण आफ्रिकेचे 251 धावांचे लक्ष्य 8 विकेट्स गमावून पूर्ण केले होते. त्याचबरोबर या मैदानावर दक्षिण आफ्रिकेने पाठलाग करताना 6 सामने जिंकले आहेत. ज्यामध्ये सर्वात मोठे लक्ष्य 226 धावांचे आहे. 1998 मध्ये श्रीलंकेविरुद्ध दक्षिण आफ्रिकेने चौथ्या डावात 4 गडी गमावून 226 धावांचे लक्ष्य गाठले होते.

पाचव्या दिवशी जेव्हा दक्षिण आफ्रिका सेंच्युरियनच्या मैदानावर उतरेल तेव्हा त्यांना विजयासाठी 211 धावांची गरज असेल. अशा स्थितीत मोठी भागीदारी दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी खेळण्याचा आत्मविश्वास नक्कीच देऊ शकते. कर्णधार डीन एल्गर 52 धावा करून क्रीजवर उभा आहे. पहिल्या डावातही दक्षिण आफ्रिकेच्या खालच्या फळीतील फलंदाजांनी संघाची धावसंख्या 200 च्या जवळ नेली.

भारतीय संघालाही हे माहीत असून ते विजयापासून 6 विकेट दूर आहे. टीम इंडियाच्या गोलंदाजांनी या कसोटीत आतापर्यंत शानदार गोलंदाजी केली असून, पाचव्या दिवशीही त्यांच्याकडून उर्वरित 6 विकेट लवकर काढण्याची सर्वांना अपेक्षा असेल. सेंच्युरियनच्या मैदानावर पाचव्या दिवशी फलंदाजी करणे सोपे नाही, अशा स्थितीत टीम इंडियाला मालिकेत 1-0 अशी आघाडी घेण्याची सुवर्णसंधी आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Telangana Accident: किंकाळ्या अन् आक्रोश! अनियंत्रित बसची कंटेनरला जोरदार धडक, 6 ठार, 20 जखमी; तेलंगणात भीषण अपघात

Goa Drug Racket: आशा, रोविनानंतर आता पोक्सो कैदी योगेश मांद्रेकरही अटकेत; कोलवाळ जेल ड्रग्स प्रकरणात तिसरी कारवाई

Goa Municipal Elections: विधानसभेपूर्वीच पालिका निवडणुका! 11 नगरपालिकांसाठी कोर्टाचा मोठा आदेश, 4 जानेवारीपर्यंत निकाल

Operation Sindoor: ''शेवटचा वार भारताचाच असणार होता''!, 'ऑपरेशन सिंदूर'बाबत माजी CDS अनिल चौहान यांचा धक्कादायक खुलासा; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानची दैना VIDEO

Horoscope 26 August 2026: बुधवार 'या' राशींसाठी ठरणार वरदान! करिअरमध्ये मिळणार गरुडभरारीची संधी; उत्पन्नाचे नवे मार्ग खुले होणार

SCROLL FOR NEXT