Tim Southee X/Blackcaps
क्रीडा

Tim Southee: लावा ताकद! साऊथीने टाकले 32 निर्धाव चेंडू, 37 वर्षात कोणालाही न जमलेला केला भारी रेकॉर्ड

Bangladesh vs New Zealand, 2nd Test: बांगलादेशविरुद्धच्या कसोटी सामन्यात साऊदीने गोलंदाजी करताना शानदार विक्रम केला.

Pranali Kodre

Bangladesh vs New Zealand, 2nd Test Match, Tim Southee bowled five consecutive maiden overs:

न्यूझीलंड संघ सध्या बांगलादेश दौऱ्यावर असून कसोटी मालिका खेळत आहे. बांगलादेश आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसरा सामना ढाका येथे बुधवारी (6 डिसेंबर) सुरु झाला आहे. या सामन्यातील पहिल्याच डावात न्यूझीलंडचा कर्णधार टीम साऊदीने एक मोठा पराक्रम केला आहे.

या सामन्याच्या पहिल्या दिवशी गोलंदाजांचे वर्चस्व राहिल्याचे दिसले होते. दरम्यान, बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र बांगलादेशचा पहिला डाव 66.2 षटकात 172 धावांवर संपुष्टात आला.

यावेळी साऊदीने 5.2 षटके गोलंदाजी करताना एकही धाव न देता एक विकेट घेतली. त्यामुळे त्याने एका डावात कमीत कमी 30 चेंडू टाकल्यानंतरही एकही धाव न देण्याचा पराक्रम केला. गेल्या 37 वर्षात कसोटीमध्ये एका पराक्रम करणारा तो पहिलाच गोलंदाज ठरला.

यापूर्वी अखेरीस असा कारनामा 1986 साली ऑस्ट्रेलियाच्या पीटर रेमंड स्लीप यांनी केला होता. त्यांनी इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात 5 षटके गोलंदाजी करताना एकही धाव दिली नव्हती.

दरम्यान, असा पराक्रम भारताच्या विजय हजारे आणि रमेशचंद्र गंगाराम नाडकर्णी यांनीही केला आहे. विजय हजारे यांनी 1951 साली इंग्लंडविरुद्ध 5 षटकात एकही धाव दिली नव्हती. तसेच नाडकर्णी यांनी 1962 साली इंग्लंडविरुद्धच 6.1 षटके गोलंदाजी करताना एकही धाव न देता एक विकेट घेतली होती.

सामन्याबद्दल सांगायचे झाले, तर बांगलादेशकडून पहिल्या डावात मुशफिकूर रहिमने सर्वाधिक 35 धावा केल्या, तर शहादत हुसैनने 31 धावा केल्या. तसेच मिचेल सँटेनर आणि ग्लेन फिलिप्स यांनी प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या.

त्यानंतर फलंदाजीला उतरलेल्या न्यूझीलंडनेही पहिल्या दिवसाखेरपर्यंत पहिल्या डावात 12.4 षटकात 55 धावांत 5 विकेट्स गमावल्या. बांगलादेशकडून मेहदी हसन मिराजने 3 आणि तैजुल इस्लामने 2 विकेट्स घेतल्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mumbai-Goa Highway वर भीषण अपघात! भरधाव कारनं दोन अल्पवयीन मुलींना उडवलं, दोघींचीही प्रकृती गंभीर Watch Video

'धुरंधर' स्टाईल फायरींगनं हादरला पाकिस्तान! जैश-ए-मोहम्मदच्या बड्या कमांडरचा खेळ खल्लास; अज्ञात बंदूकधाऱ्यांनं काढला काटा VIDEO

VIDEO: जखमी चेहरा, पाठीवर रडणारी बहीण, पुराचा हाहाकार! नेपाळमधील 'तो' 50 सेकंदांचा व्हिडिओ व्हायरल; तुमचेही पाणावतील डोळे

नो बॉलनंतर 'फ्री हिट' नको, गोलंदाजाला दंड ठोठवावा! सुनील गावसकरांची मोठी मागणी

Terrorist Secret Communication: गुप्त संवादासाठी अश्लील संकेतस्थळांचा वापर, दहशतवाद्यांची नवीन कार्यपद्धती; सोशल मीडियाला शोधला नवीन पर्याय

SCROLL FOR NEXT