Tim Cook Enjoys IPL 2023 Match Twitter/ @CricCrazyJohns
क्रीडा

IPL 2023, DC vs KKR: Apple चे सीईओ टीम कुक यांनी लुटला आयपीएल मॅचचा आनंद

Tim Cook Enjoys IPL 2023 Match: इंडियन प्रीमियर लीगच्या 16 व्या मोसमातील 28 वा सामना आज दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात खेळला जात आहे.

Manish Jadhav

Tim Cook Enjoys IPL 2023 Match: इंडियन प्रीमियर लीगच्या 16 व्या मोसमातील 28 वा सामना आज दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात खेळला जात आहे. दोन्ही संघांमधील हा सामना दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळला जात आहे.

दरम्यान, अॅपलचे सीईओ टिम कुक बॉलीवूड अभिनेत्री सोनम कपूर आणि तिचा पती आनंद आहुजा यांच्यासोबत दिल्लीत आयपीएल मॅच पाहताना दिसले.

भारतातील दुसऱ्या अॅपल स्टोअरचे उद्घाटन केल्यानंतर, टीम कुक IPL सामन्याचा आनंद घेताना दिसले.

दुसरीकडे, कोलकाता नाईट रायडर्सचा (Kolkata Knight Riders) संघ गुणतालिकेत सातव्या स्थानावर आहे, तर दिल्ली कॅपिटल्सचा संघ शेवटच्या स्थानावर आहे.

अशा परिस्थितीत या दोन्ही संघांना हा सामना जिंकून आपली स्थिती सुधारायची आहे. या सामन्यात दोन्ही संघांमध्ये चुरशीची लढत होत आहे.

अॅपलचे सीईओ टिम कुक बॉलीवूड अभिनेत्री सोनम कपूर आणि तिचा पती आनंद आहुजा यांच्यासोबत दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) आणि कोलकाता नाइट रायडर्स यांच्यातील सामना पाहण्यासाठी नवी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियममध्ये दाखल झाले.

यावेळी ते दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या इतर मान्यवर आणि अधिकाऱ्यांसह व्हीआयपी बॉक्समध्ये बसले होते.

तसेच, कुक यांनी दिल्लीतील सिलेक्ट सिटीवॉक शॉपिंग मॉलमध्ये भारतातील दुसरे अॅपल स्टोअर लॉन्च केले. दिल्ली कार्यक्रमापूर्वी, कुक यांनी मुंबईतील बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये भारतातील पहिले अॅपल स्टोअर लॉन्च केले होते. भारतात आता अॅपलचे दोन स्टोअर्स आहेत.

त्याचबरोबर, आपल्या भेटीदरम्यान, कुक यांनी उद्योगपती मुकेश अंबानी यांची दक्षिण मुंबईतील अँटिलिया येथील निवासस्थानी भेट घेतली आणि नंतर नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी भेट घेतली.

स्मार्टफोन आणि इलेक्ट्रॉनिक्ससाठी सर्वात वेगाने वाढणाऱ्या बाजारपेठेपैकी एक असलेल्या भारतीय बाजारपेठेतील आपले स्थान मजबूत करण्यासाठी अॅपलची एक महत्त्वाची वाटचाल म्हणून कुक यांच्या भेटीला पाहिले जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT